कावळा गाय कुत्रा यांना पोळी खाऊ घातल्याने काय घडते?

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मात मुक्या प्राण्यांवर दया करावी. त्यांना भोजन द्यावे अशी शिकवण दिली जाते. आपण झाडांचे, वनस्पतींचे पूजन करतो त्याप्रमाणेच नागपंचमीला नागाचे, बैलपोळ्याला बैलाचे, श्राद्धाच्या वेळी कावळ्याचे या सर्वांचेच पूजन करून त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण कासवाला ही देव मानतो, गाईला तर आपण माता म्हणतो म्हणजे आपला हिंदू धर्म आपल्याला सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव शिकवतो.

आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी असा शोध लावला होता की, प्र त्ये क प्राण्याची वागणूक त्याचे आचरण याचा काही ना काही प्रभाव नक्कीचअसतो. गायीचे म ह त्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आजच्या या माहितीमध्ये आपण गाय, कावळा, कुत्रा व मुग्यांना भोजन दिल्याने काय होते हे पाहणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात गायीविषयी. गाय आपल्या हिंदू धर्मात खूप पूजनीय मानली जाते. गायींमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते.

असे मानले जाते की, 84 लाख युनिकुन जन्म घेऊन आत्मा गाईच्या रूपात शेवटचा जन्म घेते. म्हणजेच गाय लाखो युनिकुनपैकी असा एक भाग आहे जेथे आत्मा स्थिर होते व पुढील युनिस सज्ज होते. ज्या जागेवर आपल्याला आपले घर बांधण्याची इच्छा आहे अशा ठिकाणी पंधरा दिवस गाय व वासरू ठेवल्यास ती जागा पवित्र होते. तेथून सर्व प्रकारच्या आसुरी शक्‍ती नष्ट होतात. गाईंमध्ये स का रा त्म क ऊर्जा भरलेली असते.

आपण एखाद्या शुभ कार्यासाठी जात असताना जर रस्त्याने गाय व वासरू एकत्र दिसले तर ते काम यशस्वी झालेच म्हणून समजा. गायीने अचानक तिची शेपटी जर आपल्याला मारली तर हे खूप शुभ असते. हिंदू धर्मात कुत्र्याला यमाचा दूत मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्यास भैरवनाथ प्र स न्न होतात आणि आकस्मित येणाऱ्या संकटांपासून ते आपले रक्षण करतात. अशी मान्यता आहे की जर आपण कुत्र्याला आनंदी ठेवले तर ते आपल्या आसपास यम देवांनाही येऊ देत नाही. कुत्र्याला भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत आधीच मिळतात.

कुत्र्याला दररोज भोजन दिल्याने आपल्याला शत्रूचे भय राहत नाही. कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते असेही मानले जाते. तसेच घरात कोणी आजारी असेल तर त्याचा आजार कुत्रा स्वतःवर घेतो असेही म्हणतात. कुत्रा पाळल्याने केतू ग्रहाचा प्रभाव अशुभ प्रभाव नष्ट होतो. पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला देणे खूप शुभ असते. कावळ्याला आपले पित्र मानतो. पुराणांमध्ये आलेल्या कथेनुसार कावळ्याने अमृताची चव चाखली होती. म्हणून अशी मान्यता आहे की कावळ्याचा मृत्यू कधी ही नैसर्गिक होत नाही.

आजारपण, वृद्धापकाळ यामुळे कावळ्यांचा मृत्यू होत नाही. तर कावळ्याचा मृत्यू आकस्मितच होतो. कावळ्यालाही भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे म्हणजे आपल्या पितरांना भोजन दिल्याप्रमाणे आहे. कावळ्याला भोजन दिल्याने कितीतरी प्रकारचे फायदे होतात. कावळ्यांना भोजन दिल्याने सर्व पितरदोष व कालसर्प निघून जातात. शनिदेवांना प्र स न्न करण्यासाठी कावळ्याला भोजन द्यावे. कारण कावळा हा शनि देवांचे वाहन आहे.

दारात कावळा ओरडल्यास घरी पाहुणे नक्कीच येतात. घराच्या उत्तर दिशेला कावळा काव काव करीत असेल तर घरात लक्ष्मीचे आगमन होते. पूर्व दिशेला कावळा काव काव करीत असेल तर शुभ वार्ताहार कानावर पडते तर पश्चिम दिशेला ओरडला तर वाईट बातमी ऐकायला मिळते. कावळ्याला भोजन दिल्यास हरीशट व शत्रूचा नाश होतो. आता जाणून घेऊयात मुग्यांविषयी. आपण मुंग्यांना एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त म ह त्त्व देत नाही. आपल्या आसपास कितीतरी मुंग्या असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

परंतु नरनीट लक्ष दिले तर मुग्या फार मेहनती व एकतेने राहणारे जीव आहेत. या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात. परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या व काळ्या मुंग्या याच दोन प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो. मुंग्या स्वतःच्या वजनाच्या शंभर पट अधिक वजन उचलू शकतात. इतकी क्षमता त्यांच्यामध्ये असते. लाल मुंग्यांना अशुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते. परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. मुंग्यांना पिठात साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात.

हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्रभोजनाचे पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्या प्रति कृतज्ञ होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाच्या परिणाम म्हणून आपल्या प्र त्ये क संकट व बाधीपासून संरक्षण होते. ज्यांच्या तोंडात अंडी आहे असे लाल मुंग्यांची रांग बघणे खूपच शुभ असते. जे चिमण्यांना दाणे टाकतात व मुंग्यांना पीठ साखर खायला देतात परंभागाची प्राप्ती करतात.

मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली कर्जापासून मुक्तता होते. म्हणून दररोज अंघोळ झाल्यानंतर चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी आणि नंतरच चहा घ्यावा. हा रोजचा नियम करून घ्यावा. गाईला हिरवा चारा खायाला दिल्यास घरातील सर्व प्रकारच्या पिडा, बाधा व अडचणी निघून जातात. गाईला गरम पोळीवर साजूक तूप लावून त्यावर थोडीशी चणाडाळ व थोडासा गुळाचा खडा ठेऊन खायला दिल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्र स न्न होते.

गाईला भोजन दिल्यास सर्व देवीदेवतांच्या आ शी र्वा द आपल्याला मिळतो. प्र त्ये क एकादशीला गाईला हिरवा चारा खायला दिल्यास जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. कुत्र्याला भोजन दिल्यास शत्रुपीडा निघून जाते. कावळ्याला भोजन दिल्यास आपले पित्र आपल्यावर प्र स न्न होतात. पक्षांना दाणे टाकल्यास आपल्याला नोकरी व्यवसायात फायदा होतो. मुंग्यांना साखर दिल्यास कर्जापासून मुक्ती मिळते तर माशांनापिठाचे गोळे खायला दिल्यास आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *