नमस्कार मित्रांनो,
प्राचीन काळी भारतात सृत्केतू नावाचे महात्मा होऊन गेले. त्यांनी भारतात विवाह संस्था सुरू केली. लग्नामध्ये घ्यावयाचे सातफेरे, मंगळसूत्र, मंडंप, बांगड्या, कुंकू तिलक या सर्व परंपरा सृत्केतू यांनी सुरू केल्या आहेत.
त्यांनी एकाच गोत्रात विवाह करण्यास मनाई केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर एकाच गोत्रात विवाह संपन्न झाले तर उत्पन्न होणारी संतती, मुलेबाळे रोगी आणि दुर्बल उपजतील. म्हणून एका गोत्रात विवाह कदापी करू नये.
सृत्केतू पुढे असे म्हणतात की, भाच्याने आपल्या मामाचे चरणस्पर्श कदापी करु नये. भाचा हा त्याच्या मामासाठी अत्यंत पूज्य असायला हवा. जेव्हा जेव्हा एखादा भाचा त्याच्या मामाचे चरणस्पर्श करतो, पाया पडतो अशावेळी मामाने कितीही पुण्य केलेले असू दया.
या पुण्याचा नाश होतो. अगदी 100 गाई जरी त्यांनी दान केलेल्या असू दया. दान दिलेल्या असल्यातरीही हे संपूर्ण श्रेय या एकाच चुकीनी नष्ट होते. म्हणून आपल्या भाच्याला आपल्या पाया कधीच पडू देऊ नये.
तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जावई यांनी आपल्या सासऱ्याचे चरणस्पर्श करू नये. अनेक ठिकाणी ही परंपरा दिसून येते की, जावई हे आपल्या सासऱ्याचे चरणस्पर्श करतात. ही गोष्ट सुद्धा अत्यंत चुकीची असल्याचे सृत्केतू महात्मा सांगतात.
जेव्हा जेव्हा जावई आपल्या सासऱ्याचे चरणस्पर्श करतो, तेव्हा सासऱ्यानी केलेले संपूर्ण पुण्य नष्ट होते. जावई यालासुद्धा यातून कोणतेही पुण्य प्राप्त होत नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.