नमस्कार मित्रांनो,
बऱ्याचदा अस होतं की आपल्या घरातील लोक, आपल्या घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने न वागता भांडखोर वृत्तीने वागू लागतात. छोट्या छोट्या कारणावरून घरातील सदस्यांमध्ये भांडण होतात. वादविवाद होतात. भांडण तंटे होतात. यामुळे घरात शांतता राहत नाही. सासू सूनेत होणारे वाद, भावांमध्ये होणारे वाद, बहिणी किंवा भाऊ बहिणी यांच्यात न पटणे, पिता पुत्र यांच्यात भांडण होते आणि त्यातून वाद निर्माण होतात.
आपले सगे सोयरे आहेत, ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते आहे. त्यांच्याशी अशा प्रकारे वाद होण्याचे कारण काय? ज्यांना आपण प्रेम भावाने वागवले पाहिजे त्यांच्याशी आपली अशी भांडण वादविवाद का बरं होत असतील. जरा आपण आपल्या वास्तू मध्ये, घरामध्ये डोकावून या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. कधी कधी आपल्या घरामध्ये आपल्या वास्तू मध्ये असे काही दोष असतात.
की या दोषांमुळे आपल्या घरात अशांती असते. अस्थिरता असते. आणि त्याचा परिणाम म्हणून ही नकारात्मक ऊर्जा असते. या नकारात्मक उर्जेचा परिणाम म्हणून आपल्या घरातील माणसांचे मानसिक संतुलन ठीक राहत नाही. त्यांचे मनावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडून ते एकमेकांशी भांडू लागतात. मित्रानो आपण जर माघार घेतली तरी समोरचा माघार घेत नाही.
याला कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तू दोष. तर असे कोणते वास्तू दोष असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे होतात. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपरा पाहायचा आहे. या ईशान्य कोपऱ्यात आपण जर नको असलेल्या वस्तू ठेवल्या असतील किंवा भंगार साहित्य ठेवले असेल, जर त्या ठिकाणी स्टोअर रूम तयार केला असेल.
तर पहिली गोष्ट हे नको असलेल्या गोष्टी, भंगार वस्तू, फुटलेल्या तुटलेल्या वस्तू जर जमा केल्या असतील तर त्या तात्काळ हलवा. मित्रानो ईशान्य कोपऱ्यात जर अशा वस्तू असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. आणि परिणामी घरातील सुख शांती दूर होते. शांततेचं वातावरण त्या ठिकाणी राहत नाही. दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी घरात ईशान्य कोपरा नसतो.
जागेची कमतरता असल्याने लोक कशाही प्रकारचे बांधकाम करतात. अगदी त्याला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. आणि ईशान्य दिशेला जरा डोकावून पाहा. जर ईशान्य कोपरा नसेल जर तो काढून टाकले ला असेल तर मित्रानो जरा सावध रहावे लागेल. ईशान्य कोपरा घरात नसेल तर त्या घरात सुख शांती लाभत नाही. ईशान्य कोपरा जर नष्ट झालेला असेल तर त्या घरातील पिता पुत्र यांच्या मध्ये भांडणं होतात.
पिता व पुत्र एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत. अविश्वासाचे वातावरण नेहमी राहते. ईशान्य कोपरा आपल्या घराला असायला हवा. ईशान्य कोपऱ्यात गरमी उत्पन्न करणारे उपकरण म्हणजे गॅस किंवा ओवन ठेवू नका. किंवा थंड उत्पन्न करणारे उपकरण म्हणजे फॅन किंवा फ्रिज असे उपकरण सुद्धा त्या ठिकाणी ठेवू नये. जर ते त्या ठिकाणी असतील तर आपल्या घरातील पुत्र आहे तो आज्ञाधारक निघत नाही.
परिणामी पिता पुत्र मध्ये सतत खटके उडतात. त्याचा परिणाम म्हणून त्या घरात अशांती निर्माण होते. मित्रानो जो फ्लॅट आपण विकत घेतलेला आहे. ज्या प्लॉट वर बांधकाम केलेले आहे आपल्या घराचे तो प्लॉट सूर्य भेदी नसावा. सूर्य भेदी प्लॉट म्हणजे ज्या प्लॉट ची लांबी पूर्व पश्चिम जास्त असते. आणि उत्तर दक्षिण कमी असते. असा जो निमुळता प्लॉट असतो. अशा प्लॉट ला सूर्य भेदी प्लॉट असे म्हणतात.
<
असा जर प्लॉट असेल तर त्या घरामध्ये सुद्धा अशांतता आणि भांडणे ही होत राहतात. ईशान्य कोपऱ्यात चुकूनही कचराकुंडी ठेवू नये. अनेक जण कचरा ठेवण्यासाठी हा कोपरा वापरतात. त्या ठिकाणी असेल तर काढून टाका. कचरा कुंडी असल्याने घरातील सदस्यांमध्ये ईर्ष्या भाव उत्पन्न होतो. ते एकमेकांचा तिरस्कार करू लागतात. एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. एकमेकांवर जळण्याची वृत्ती निर्माण होते.
राग आणि लोभ हे दोन गुण घरातील सदस्यांमध्ये वाढतात. हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते करायला हवे. ईशान्य दिशेचा उपाय आज आम्ही सांगितला आहे. तो तुम्ही करायचा आहे. तुमचे घरात सुख, शांती, समाधान नक्की मिळेल. घरातील वादविवाद नक्की कमी होतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.