जे मागाल ते मिळेल ११ दिवस करा पाठ

नमस्कार मित्रांनो,

हनुमान चाळीसाचा केवळ 11 दिवस पाठ, आपल्या मनातील कोणतीही इच्छा, मनोकामना नक्की पूर्ण करतो. हनुमान चाळीसाचा 11 दिवसाचा हा पाठ तुम्ही घरातही करू शकता किंवा आपण राहत असलेल्या परिसरात एखादे हनुमानाचे मंदिर असेल तिथे जाऊन केल्यास अती उत्तम. मात्र आपल्या घरात केलेतरी सोयीस्कर ठरेल.

अनेकांच्या मनात प्रश्न असेल की, हा उपाय स्त्रिया, महिला करू शकतात का? अगदी मनात कोणतीही कुशंका निःशंका न आणता महिलासुद्धा हा उपाय करू शकतील. केवळ एका गोष्टीचा आपण स्मरण ठेवा, हनुमंताला शेंदूर आपण लावायचे नाही आहे आणि लाल वस्त्र चढवायचे नाही आहे. या दोन गोष्टी वगळता आपले महिन्यातील जे पाच दिवस असतात मासिक धर्माचे. यावेळी कृपया हनुमंताची पूजा करू नये. हे पाठ करताना व्रत, उपवास करण्याची काही आवश्यकता नाही.

नित्यनेमाने हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे. यासाठी आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व या दरम्यानची जी दिशा आहे. त्या दिशेला, जरी आपले देवघर तिथे असेल तर आपण तो कोपरा ती जागा साफ, स्वच्छ करायची आहे. नंतर एक पाट तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंथरूण हनुमंताची मूर्ती किंवा एखादा फोटो ठेवायचा आहे.

ह्या मुर्तीजवळ प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांचीही मूर्ती किंवा फोटो ठेवलेत तर अतीउत्तम होईल. मित्रांनो, पहिल्या दिवशी शक्यतो मंगळवारी हा उपाय करण्यास आपण प्रारंभ करा. आठवड्याच्या कोणत्याही वारी करू शकता परंतू मंगळवार हा शुभ मानला जातो, किंवा शनिवारीदेखील करू शकता. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अगदी कोणत्याही प्रकारचे संकट, दुःख असू दया, समस्या असू दया.

शनीची साडेसाती,महादशा असू दया, हया सर्वांचे निवारण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तर अशाप्रकारे हनुमंताची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर, त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करा. लाल फुले, दोन साबुत लवंगा अर्पण करायच्या आहेत. प्रसाद, नैवेद्य म्हणून गूळ फुटाणे किंवा गूळ, भाजलेले हरबरे त्याठिकाणी दाखवायचे आहे.

तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम आहे. सर्वश्रेष्ठ काळ्या तिळाचा दिवा लावू शकता नसेल तर सफेद तिळाचादेखील दिवा लावू शकता. तिळाचे तेल नसेल उपलब्ध तर तुपाचा दिवा लावू शकता. तर असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक तांब्या ठेवायचा आहे, जर हा तांब्या तांबिया या धातूचा बनला असेल तर अतीउत्तम.

हा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये एक शिक्का टाकायचा आहे, कितीही एक रुपयाचा, दहा रुपयाचा आणि एक साबुत लवंग म्हणजे जिला फूल आहे, तुटलेली नाही आहे अशी लवंग त्या तांब्याच्या पाण्यात टाकायची आहे. त्यावरती झाकण ठेवायचे आहे. त्यानंतर हनुमान चाळीसाचा पाठ करण्यास आपण प्रारंभ करायचा आहे. मित्रांनो, दररोज एक निश्चित वेळ ठरवा.

त्या निश्चित वेळी आपण हनुमान चाळीसाचा पाठ करायचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता, मात्र सकाळची वेळ आणि सूर्य मावळ्यानंतरची जी वेळ आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. किंवा रात्री किमान 10,11,12 वाजता जरी हा उपाय केला तरीही चालेल. मात्र त्याचवेळी सलग 11 दिवस हा पाठ करावा.

<
जर आपण रात्री 9 वाजता हा पाठ करत आहात, तर दररोज रात्री 9 वाजताच त्याच ठराविक वेळी हा हनुमान चाळीसाचा पाठ आपणास करावा. वेळेमध्ये बदल करता कामा नये. हा उपाय करण्याआधी स्वच्छ स्नान करावे. शक्यतो लाल रंगाची वस्त्र आपण स्वतः परिधान करावे. आणि हा उपाय करण्यास प्रारंभ करावा. हनुमान चाळीसाचा सलग 3 वेळा पाठ आपण करायचा आहे.

हनुमानाचा पाठ केले ठीक आहे, मात्र जर तुमची इच्छा असेल तर हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता किंवा जय श्रीराम जय श्रीराम असे 11 वेळा बोलू शकता. तुपाचा दिवा ओवळा. हनुमानाचा हा 3 वेळा पाठ केल्यानंतर जो नैवेद्य आहे, तो आपल्या कुंटुंबीयामध्ये वाटप करुन खा. अशाप्रकारे नित्यनेमाने 11 दिवस हा हनुमान चाळीसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर तांब्यामध्ये जो आपण टाकलेला शिक्का आणि लवंग काढायची आहे.

तसेच हा शिक्का आणि लवंग कायम आपल्याजवळ ठेवायचे आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी जाल, तेव्हा हा शिक्का आणि लवंग तुमच्या पर्समध्ये, पाकीटमध्येफक्त ठेवा. मात्र या शिक्क्याजवळ आणि लवंगजवळ अशी कोणतीही अशुभ धार्मिक वस्तू जवळ येणार नाही, याची काळजी घ्या. तसेच हे जे पाणी आहे तांब्यामधले महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे पाणी थोडेसे प्या आणि मग बाहेर पडा.

हनुमान चाळीसाची ताकत काय आहे. हनुमान चाळीसाचा प्रभाव काय आहे हे तुम्हाला समजून जाईल.हा उपाय 11 दिवस केल्यानंतर दर मंगळवारी, दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायला विसरू नका. कारण हनुमानाच्याच कृपेने तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहेत, संकटे आहेत, हे सर्व काही आहे त्याची स्फुरतता होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.