नमस्कार मित्रांनो,
काही लोक असे असतात जे आयुष्यभर कष्ट करतात. खूप परिश्रम करतात. अगदी जमीन आणि आकाश एक करतात. मात्र तरीसुद्धा ते श्रीमंत होत नाहीत. त्यांच्या घरात कधीच पैसा येत नाही आणि जरी नशिबाने पैसा आलाच तर तो टिकत नाही.
चला तर पाहुयात असे पाच व्यक्ती कोण आहेत. हिंदू धर्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की या पाच व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या ते श्रीमंत होत नाहीत आणि त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती मळकट कपडे घालते.
जी व्यक्ती सतत मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. जर तुमचा व्यवसाय असा आहे की तुम्हाला मळकट कपडे घालावे लागतात किंवा तुम्ही घातलेले कपडे मळकट होतातच.
काम, परिश्रम, कष्ट हे ईश्वराचे एक रूप आहे आणि म्हणून कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत असेल तर ते मान्य आहे. मात्र कष्टाची कामे न करता सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाहीत.
दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे. ज्याच्या तोंडून सतत अपशब्दच बाहेर पडतात. दुसऱ्याचे मन जो वारंवार दुखावतो. ज्याच्या तोंडात नेहमी शिव्या असतात. शाप असतात. दुसऱ्याबद्दल सतत मनात वाईट असते अश्या कठोर मनाचा मनुष्यसुद्धा श्रीमंत होत नाही.
आणि नशिबाने जरी त्याच्याकडे पैसा आला तर माता लक्ष्मी अशा व्यक्तीच्या घरात जास्त दिवस वास करत नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती सुर्योदयासमयी किंवा सूर्यास्तासमयी झोपलेली असते. सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्य उगवत आहे. सकाळच्या वेळी तेव्हा जर एखादा मनुष्य झोपलेला असेल तो कधीही आयुष्यामध्ये श्रीमंत होत नाही.
जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची सुद्धा. जो व्यक्ती सूर्यास्त झाला तरी झोपलेला असतो त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही. माता लक्ष्मीच्या आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त.
या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते.
या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात आणि या दोन वेळेला केलेले कार्य नेहमी सफल होतं आणि म्हणून या दोन वेळा आपण झोपण्यासाठी नक्की टाळा.
चौथी गोष्ट, ज्या व्यक्ती पाय न धुताच झोपतात. अस्वच्छ पायाने झोपतात अश्या व्यक्तीच्या घरात रोगराई वाढते. आजार वाढतात आणि त्याचा भरपूर पैसा हा आरोग्यासाठी खर्च होतो. स्वच्छता हे फार महत्त्वाचे असते.
भारत सरकारने सुद्धा स्वच्छतेसाठी खूप उपक्रम राबवलेले आहेत. आपण त्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. हिंदू धर्मशास्त्राचा जर विचार केला तर ते असं मानतं की जो व्यक्ती पाय न धुता झोपतो त्या व्यक्तीच्या जीवनात आजारपण वारंवार येतो.
तसेच याबाबतीतील अजून एक चूक अशी की जे लोक ओल्या पायांनी झोपतात त्यांना आयुष्यात नशीब साथ देत नाही. आपण पाय स्वच्छ केले मात्र पाय न पुसता ओल्या पायाने जरा पण झोपलो तरीसुद्धा गरिबी नक्की येते.
अनेक जण या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत. मात्र हेच सत्य आहे आणि आपण अनुभव घेऊन याचा पडताळा घेऊ शकता.
आणि पाचवी गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे लोक ही चूक करतात. जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेले तेल अन्य अवयवांवर जसे की हात किंवा पाय यावर चोळते किंवा लावते त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचे स्थान राहत नाही.
मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की डोक्यावर तेल लावताना जे तेल असतं, हातावर उरलेलं तेल ते हाताला आणि पायाला लावतात. हिंदूधर्म शास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचे स्थान हे कधीच निर्माण होत नाही.
अजून एक या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो की जे लोक चालता चालता त्यांच्या नखाने गवत तोडतात, तृण तोडतात किंवा बसल्याबसल्या आपल्या नखांनी जमीन उकरतात अशा व्यक्तींच्या जीवनात सुद्धा पैसा कधीच टिकत नाही.
मित्रांनो या गोष्टी विश्वसनीय वाटत नाहीत. विश्वास लवकर बसत नाही मात्र आपल्या ऋषी-मुनींनी, तत्त्व व्यक्तींनी अनेक वर्ष साधना करून अनेक वर्षांच्या अनुभवाचा सार एकत्र करून या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आपण ही या गोष्टी अनुभव घेऊन पहा तुम्हाला नक्कीच विश्वास होईल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.