नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. घर बांधताना वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक ऊर्जा राहते, असे वास्तुशास्त्र तज्ज्ञांचे मत आहे.
अशा स्थितीत घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी घरात काही बदल केले पाहिजेत.
कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात. घरातील आनंदी वातावरण नाहीसं होतं.
घरातील देव्हारा – वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.
घड्याळाची दिशा – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी घड्याळ लावले नसेल तर जीवनात अनेक आर्थिक समस्या येतात. वास्तूनुसार घरामध्ये घड्याळ कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं चांगलं मानलं जातं.
तुळस – हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावावे, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. याशिवाय घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. सोबतच घरात आनंद अबाधित राहतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.