जीवनात कोणत्या पाच चुका या तुम्हाला गरिबी करतात?

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रासले आहात का? कितीही उपाय केले तरी पैशांची चणचण घरात कमी होत नाही असं तुम्हाला वाटतं का? मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो बरीच लोक असे म्हणतात की, आम्ही कितीही देवपूजा केली, कितीही देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा घरात माता लक्ष्मीच आगमन होत नाही.

आमच्या आर्थिक समस्या काही केल्या सुटत नाहीत आणि त्यासाठी अगदी पौर्णिमा, अमावस्या या दिवशी सर्व प्रकारचे ज्योतिषी उपायही करून पाहिले जातात. पण तरीसुद्धा त्याचा लाभ काही मिळत नाही.

त्याचबरोबर देवाची उपासना, तसेच रोजच्या रोज देवाची पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चांगले परिणाम घरांमध्ये दिसून येत नाही आणि मग त्या व्यक्तींच मन अजून खिन्न होत जात. काय करावं ते त्यांना समजत नाही. आपल्या हातून काही चूक होते आहे का असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.

मित्रांनो काही चुका अशा आहेत ज्या कळत नकळत आपल्या हातून होत असतात आणि ज्या व्यक्तींच्या हातून या चूका होतात त्यांनी कितीही देव देव केल तरीसुद्धा त्याचा योग्य परिणाम त्यांना मिळत नाही. मग कोणत्या आहेत त्या चुका चला जाणून घेऊया.

पहिली गोष्ट अशी आहे की, आपण रोज देव पूजा करतो पण त्या देवघरात आपली इष्टदेवता आहे का याकडे आपण कधीही लक्ष देत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो पण आपल्या कुलदेवाच नामस्मरण आपण करत नाही.

आपल्या कुलदैवतांची पूजा रोज करत जा आणि त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांचे आ शी र्वा द आपल्याला मिळतात. आपली चांगली प्रगती होते त्यामुळे कुलदेवतेची आराधना महत्वाची आहे. सगळ्या समस्या कुलदेवता दूर करते.

दुसरी गोष्ट अशी आहे की, जर आपण घराबाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य दरवाजासमोर आपलेच चपला किंवा बूट असतील आणि ते पालथ्या पडलेल्या असतील तर ते लगेच सरळ करा. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही त्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको.

आपल्या मुख्य दरवाजासमोर अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. आपल्या घरात माता लक्ष्मीच आगमन होत नाही. ही गोष्ट जरी छोटीसी वाटत असली तरी त्याचा परिणाम मोठा असतो. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष दिलं जावं.

तिसरी गोष्ट अशी आहे की, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य वागणूक देणं. मित्रांनो बऱ्याचदा आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण त्यांच्या तोंडावर खूप गोड गोड बोलतो पण मनातून मात्र आपल्याला असं वाटतं की, हे आता का आले आहेत.

त्यांच्याबद्दल वाईट विचार आपल्या मनात येतात. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अतिथी हा देवासमान असतो. त्यामुळे त्यांचा अपमान होईल असं कधीही वागू नये आणि त्यांची सेवा मनापासून करावी.

चौथी गोष्ट आहे आपल्या खाण्यापिण्यासंबंधी आपण घरात अन्न शिजवतो आणि त्याचं सेवन करतो. पण काही वेळेस आपल्या हातून अन्नाची नासाडी होते. आपल्या घरातून अन्न घराबाहेर टाकले जाते.

त्यामुळे अन्नपूर्णादेवी नाराज होते आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीच वास्तव्य नसत त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहत नाही. त्यामुळे घरात गरिबी येते याच कारणांमुळे अन्नाची नासाडी करू नये असं म्हटलं आहे.

पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता. बऱ्याच जणांना अशी सवय असते की, न लागणारे सामान सुद्धा घरात साठवून ठेवलं जाते. घरातील लोक भंगार साठवून ठेवतात त्या घरात महालक्ष्मीचे वास्तव्य कधीही नसते.

कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते. त्यामुळेच आपण दिवाळीत सगळ्यात आधी साफसफाई करतो. त्यामुळे घरात विनाकारण भंगार साठवून ठेवू नये आणि घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *