नमस्कार मित्रांनो,
आयुष्यात कितीही प्रयत्न केला तरी वाट्याला दुःख येत असेल, निराशा येत असेल, टेंशन येत असेल तर कुठे ना कुठे या सहा चुकांपैकी कोणती ना कोणती चूक करत असाल कारण या सहा चुका करणारा माणूस यावर्षीच नाही तर आयुष्यभर दुःखात आणि टेंशन मध्ये राहील. कारण जो कोणी हे सहा मार्ग निवडतो तो फक्त दुःखाच्या दिशेने वाटचाल करत असतो.
मी असे म्हणत नाही की तुम्ही मुद्दामहून या चुका करता पण कधी कधी अनवधानाने सुद्धा आपल्याकडून या चुका होऊ शकतात. आणि शेवटच्या दोन चुका तर आजच्या काळात सर्वात दुःखाचे कारण आहे.
आपल्या घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगणे: मित्रानो प्रत्येकाच्या घरात छोटे मोठे वाद हे होत असतात. पण तुम्ही जर घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगत असाल तर तुम्हाला पश्र्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. कारण बाहेरची लोक तुम्ही संगितलेल्या गोष्टीचा मजाक बनवतील. त्याचा फायदा घेतील खास करून नवरा बायको मधील गोष्टी चुकूनही सांगू नयेत.
शक्यता आहे की सहानुभूती मिळवण्याच्या हेतूने तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी दुसऱ्यांना सांगता पण समोरचा त्या लायकीचा नसेल तर तो तेल मसाला लावून चार चौघांमध्ये त्या गोष्टीचा बोभाटा करेल. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातून सुख, शांती निघून जाईल. त्यामुळे आतापासून तुमच्या घरातील गोष्टी घरापर्यंत सीमित ठेवा. हा तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून नक्की सल्ला घ्या.
दुसऱ्याची निंदा ए न्जॉ य करणे: मित्रानो आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही दोष हे असतातच त्यामुळे आपल्या मध्ये दोष असताना दुसऱ्याची निंदा करणे. अत्यंत चुकीचे आहे. जर तुमच्यासमोर कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल दुसऱ्या बद्दल वाईट साईट बोलत असेल आणि तुम्ही त्याचा आनंद घेत असाल तर कुठे ना कुठे तुम्ही मनामध्ये नकारात्मकता पेरत असता.
त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांबरोबर राहता ते दुसऱ्याची निंदा नालस्ती करतात. सतत दुसऱ्यांची चेष्टा करतात. तर तुम्ही कधीच दुःखी राहू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांबरोबर राहणे सोडून द्या. जर अशा लोकांबरोबर राहणे मजबुरी असेल तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. थोडक्यात ज्यामुळे तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. अशी लोक किंवा ठिकाणांपासून लांब रहा.
घडून गेलेल्या गोष्टींची आठवण करून, दुःखी होत राहणे: गेली दोन वर्ष अशी होती प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही वाईट घटना घडून गेल्या. कोणाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. कोणी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले. कोणाची नोकरी गेली. कोणाचा व्यवसाय बुडाला. अनेक दुःखद घटना घडून गेल्या पण आता त्या भूतकाळात जमा झाल्या आहेत.
कारण जे काही घडले त्यात बदल करणे शक्य नाही. त्यामुळे सतत त्या गोष्टी आठवून दुःख करत बसने आपल्या तर दुःखी करतेच पण आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा सुखी राहू शकत नाही. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टींतून शक्य असल्यास शिकवण घ्या. आणि पुढे चालत रहा.
<
वेळेचा आदर न राखणे: मित्रानो वेळ ही वाळू सारखी आहे. जी आपल्या हातातून निसटत जाते. आणि जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते. तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण तेव्हा आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक नसतो. सांगायचा मुद्दा हा की आज तुम्ही वेळेचा आदर केला नाही. तर उद्या वेळ तुमचा आदर करणार नाही. त्यामुळे वेळ फालतू मध्ये खर्च करू नका. आज अनेक साधने आहेत जी तुमचा वेळ खाण्यासाठी तयार आहेत.
एक लक्षात ठेवा. गेलेले पैसे परत कमवू शकतो. गेलेली इज्जत चांगली कामे करून परत मिळवू शकतो. पण गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे नंतरचे आयुष्य फक्त पश्र्च्याताप आणि दुःखात घालवायचे नसेल तर वेळेचा आदर करायला शिका. कारण आतासुद्धा या क्षणाला वेळ निघून चालली आहे.
आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करणे: आजच्या काळात माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण त्याचे दुःख नाही. तर दुसऱ्याचे सुख बघून दुःखी होणे हे आहे. जेव्हा लोक आपली तुलना दुसर्याबबरोबर करतात. तेव्हा त्यांना वाटते समोरचा आपल्यापेक्षा जास्त खुश आहे. आनंदी आहे. आज फेसबुक, इंस्टा च्या काळात हे सर्रास चालू आहे. मित्रानो या जगात असे कोणी नाही की ज्याला आयुष्यात काही समस्या नाहीत.
दुःख नाही. कारण सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. दुसरं म्हणजे जी लोक सोशल मीडिया वर वेगवेगळे फोटो टाकत असतात ते सर्वच आयुष्यात खुश असतील असे नाही. वास्तवता वेगवेगळी असू शकते. मी असे अनेक लोक बघितले आहेत की जे फक्त लोकांना दाखवण्यासाठी फोटो टाकत असतात की बघा, आम्ही किती खुश आहे. पण वास्तवता वेगळीच असते. त्यामुळे आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल. तर आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करणे बंद करा.
दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवणे: जेवढे आपण दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो तेवढे आपण जास्त दुःखी होतो. अपेक्षा हे साऱ्या दुःखाचे मूळ आहे. आता तुम्ही म्हणाल जवळच्या माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही का? ती जरूर ठेवा. पण आग्रह धरू नका की ती अपेक्षा पूर्ण होईल. कारण त्रास तुम्हालाच होणार आहे. समजा बायकोने अपेक्षा ठेवली की नवऱ्याने प्रत्येक फोन उचलला पाहिजे. माझ्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिला पाहिजे.
माझ्या प्रत्येक फोटोला लाईक केले पाहिजे. मला रोज गजरा आणला पाहिजे. मला रोज फोन करून विचारपूस केली पाहिजे. वगैरे वगैरे यापैकी एक जरी अपेक्षा पूर्ण झाली नाही तर दुःखी कोण होणार आहे. हा नियम नवऱ्याला सुद्धा लागू होतो. त्यामुळेत्यामुळे समोराच्यांकडून कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवायच्या च असतील तर स्वतः कडून ठेवा. कारण ते पूर्ण करण्याचे नियंत्रण स्वतः च्याच हातात असते
मित्रांनो या होत्या त्या सहा चुका. ज्या दुःखात आणि टेंशन मध्ये ठेवतात. यापैकी कोणती चूक सर्वात जास्त दुःख देणारी असेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.