कोणत्या 5 राशींच्या व्यक्ती या उत्तम नेतृत्व करतात.

नमस्कार मित्रांनो,

नेतृत्व करण्यासाठी बुद्धिमत्ता, विचार, जोखीम घेण्याची क्षमता भरपूर आत्मविश्वास अस गुण असणं आवश्यक असतं. मित्रांनो प्रत्येकामध्येच हे गुण असतात असं नाही. पण काही राशी मात्र अशा आहेत ज्यांच्यामध्ये हे गुण असतात. मग कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

नेतृत्व कौशल असणं ही साधी गोष्ट नाही. कारण नेतृत्व कौशल्याची गरज ही राजकीय नेता असो, तुमचा लीडर असो किंवा कुठल्याही मोठ्या कामाच नेतृत्व करताना लागतेच लागते. इतकंच कशाला तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला नेतृत्व गुणांची आवश्यकता भासते.

पण मित्रांनो हे नेतृत्व गुण काहीजणांकडे मूळातच असतात तर काहीजण बाहेरन आत्मसात करतात आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत की, जन्मतःच हे गुण कुणाकडे असतात कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.

1) मेष रास – मेष राशीचा स्वामी मंगळ असून त्यांच्या जातकांमध्ये धैर्याची कमतरता नसते. म्हणूनच ही लोकं जोखीम पत्करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. या व्यक्ती कुशल राजकीय नेता, उत्तम प्रशासक, अधिकारी, मॅनेजर बनतात. याशिवाय मेष राशीच्या व्यक्ती संरक्षण क्षेत्रातही फार नाव कमावतात. या व्यक्तीमध्ये जन्मतःच नेतृत्व गुण असतात असं म्हणायला हरकत नाही.

2) सिंह रास – या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या व्यक्तीमध्ये सुद्धा अप्रतिम नेतृत्व कौशल्य असतं. या व्यक्तीचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक असते की, लोक अगदी सहज ज्या व्यक्तींना आपला लीडर मानतात. हे लोक स्वतःच्या मर्जीचे मालक असतात आणि त्यांचा स्वभावही अत्यंत खडक असतो.

3) वृश्चिक रास – मंगळ हा या राशीचा स्वामी असतो. या व्यक्ती खूपच उत्साही आणि भांडखोर असतात. चांगला लीडर असण्यासोबतच या व्यक्ती स्वार्थी सुद्धा असतात. म्हणूनच यश प्राप्त करणे यांच्यासाठी आणखीनच सोपं होतं. त्याचबरोबर मंगळ दोष असल्यास तर या व्यक्ती तापट आणि गर्विष्ठ सुद्धा असतात.

4) मकर रास – या राशीचा स्वामी शनी असून या राशीच्या व्यक्ती मेहनती आणि प्रामाणिक असतात. या व्यक्ती खूपच उत्साही असतात आणि ठरवलेली गोष्ट पूर्ण करूनच दाखवतात. हे अतिशय न्यायी सुद्धा असतात. कुणावरही अन्याय होवू देत नाहीत. तसेच दुसऱ्यांसाठी लढायला सुद्धा पुढे असतात. त्यामुळेच ही लोकं चांगला लीडर बनतात.

5) कुंभ रास – शनी हा या राशीचा स्वामी आहे या व्यक्तींमध्ये इतकी ताकद असते की ते स्वतःच्या हिमतीवर एखादे साम्राज्य उभे करू शकतात. या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतात आणि चांगल्या लीडर सिद्ध होतात. या होत्या त्या 5 राशी.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *