या झाडांची पूजा करा लग्नाचे योग जुळून येतील सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रानो,

आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तूला महत्त्व दिले गेलेले आहे. त्यात प्राणी, पक्षी ,झाडेझुडपे अशा सर्वच वस्तू येतात.

हिंदू धर्मात खूप झाडांना पूजनीय समजले जाते. प्रत्येक झाडाच्या पूजेचे महत्त्व वेगवेगळे आहे व त्याचे पुण्यही वेगवेगळे आहेत.

आता आपण बघूयात कोणत्या झाडाची पूजा केल्याने, त्याचे काय काय फळ मिळते. तुळस हिंदू संस्कृतीत तुळशीला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे व सर्व पूजामध्ये तुळशीला अग्रस्थान दिले गेलेले आहे.

ज्या घरात तुळशीची रोज पूजा केली जाते देवी लक्ष्मी ते घर सोडून कधीच जात नाही.त्या घरात नेहमी सुख व समृद्धी राहते. पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानले गेलेले आहे.

याची पूजा केल्याने शरीर दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच विष्णु जी यांची कृपा सदैव आपल्यावर राहते. कडुलिंब याची पूजा केल्याने पत्रिकेत काही दोष असल्यास ते दूर होतात व आजारांपासून नही मुक्तता मिळते.

आणि घरात सुख व शांतता कायम राहते. वडाचे झाड याला बर्गत असेही म्हटले जाते. याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते. म्हणूनच स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मुलांविषयी काही समस्या असतील त्याही दूर होण्यास मदत होते. हे झाड खूप पवित्र आहे.

बेलाचे झाड या झाडाचे पान व फळ दोन्ही महादेवाला अर्पण केले जाते. नोकरीत बढती मिळवण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते. यामुळे नोकरीचे योग लवकर बनतात. तसेच अकाल मृत्यु पासूनही आपले संरक्षण होते.

आवळा हे झाड श्री विष्णूच्या थुंकीपासून निर्माण झाले आहे.या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धन संबंधी अडचण कधीही येत नाही. त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

अशोक या झाडाकडे आपण शोभेचे झाड म्हणूनच बघतो. या झाडाची पूजा केल्याने ही सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहते. एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी या झाडाची पूजा केली जाते.

केळीचे झाड ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील त्यांनी या झाडाची पूजा केल्यास त्यांना नक्कीच फायदा होतो व गुरु संबंधी सर्व दोष दूर होतात. शिवाय या झाडाची पूजा केल्याने विवाहाचे योग जुळून येतात.

शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळतो व कोर्टात केस चालू असेल त्यात यश मिळते. दसऱ्याच्या दिवशी या झाडाची विशेष पूजा केली जाते. लाल चंदन सूर्याशी निगडीत ग्रहदोष दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या झाडाची विधीवत पूजा केली जाते.असे केल्याने प्रमोशनचे योग बनतात. धन्यवाद,

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *