या पाच गोष्टी दिसल्या त्या समजून जा, तुमचे नशीब जोरदार पलटणार आहे.

नमस्कार मित्रांनो,

जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. कदाचित म्हणूनच मुले घराबाहेर जात असतील तर आई त्यांना दही साखर खायला देते. म्हणजे मुलांचा दिवस चांगला जाईल.

पुराणांमध्ये अशा काही वस्तूंचे वर्णन केलेले आहे ज्या घटना घडल्यास आपला संपुर्ण दिवस चांगला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू सांगणार आहोत ज्या तुम्हाला सकाळी दृष्टीस पडल्या तर समजुन जा तुमचा आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे.

सकाळी उठल्यावर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांना बघणे खूपच शुभ समजले जाते. आपल्या आता देवी लक्ष्मी, देवी सरस्वती व श्री हरी विष्णूंचा वास असतो. म्हणून सकाळी-सकाळी तळहातांना बघणे म्हणजे या तिन्ही देवी-देवतांचे दर्शन केल्यासारखे होते व आपला दिवस शुभ जातो.

घरातून बाहेर पडल्यावर जर तुम्हाला एखादी गाय दिसली. तर खूप शुभ असते. जर एखादा गवळी गाईचे दूध काढतोय. असे दिसल्यास खूप शुभ असते. तसेच गाईचे वासरू दूध पिताना दिसणे ही शुभ असते.

सकाळी-सकाळी पक्षी दिसणे किंवा पक्ष्यांचा कलकलाट ऐकू येणे शुभ असते. याबरोबरच तुम्हाला सकाळच्या वेळी पांढरी फुले, हत्ती किंवा आपला एखादा मित्र दिसला तर तेही खूप शुभ असते.

सकाळी-सकाळी तुम्हाला एखाद्या ठिकाणी यज्ञ होताना दिसणे हे ही शुभ असते. अग्नी दिसणे ही शुभ असते आणि त्यातल्या त्यात हा अग्नि होमकुंडातला असेल तर खूपच चांगले असते. सकाळी अग्नी दिसल्यास तुमच्या जीवनातील वाईट दोष निघून जातात व तुमचे जीवन पवित्र होते.

पुराणात सवाशीण स्त्रीला देवी मानले गेले आहे. सकाळी सवाशीण स्त्री दिसणे ही शुभ मानले गेले आहे. परंतु ती स्त्री घरातील नसावी. तर बाहेरचे एखादी सवाशीण स्त्री दिसली तर ते शुभ असते. जर रस्त्याने जाताना एखादी सवाशीण स्त्री नजरेस पडल्यास ते खूप शुभ असते.

एखाद्या मंदिरात आरती सुरू असेल आणि तुम्ही ते पाहिल्यास खूप शुभ असते. आरती ऐकल्याने आपल्या मनातील सर्व विकार दूर होतात. मंदिरात सकाळी घंटानाद होतोय आणि तो कानावर पडणे हे ही शुभ असते.

तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर निघालात व रस्त्यावर तुम्हाला एखादे मंदिर लागल्यास ते खूप शुभ असते व तुमचे काम नक्कीच पूर्ण होते. हे आपले काम पूर्ण होण्याचे संकेत आहे.

सकाळी शेण, सोने व तांबे यांना बघणे सुद्धा शुभ मानले जाते. या वस्तू तुम्हाला निसर्गाशी जोडून ठेवतात व तुमचा दिवस शुभ बनवतात.

सकाळी सूर्योदय म्हणजे सूर्य उगवताना बघणे व त्याचे दर्शन करणे शुभ मानले गेले आहे. यामुळे शरीरात स्फूर्ती संचारते व आपला उत्साह वाढतो. हिरवेगार गवत बघणेही शुभ असते. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

जर सकाळच्या वेळी एखाद्या नदीचे दर्शन झाले तर तेही खूप शुभ असते. नदी चा अर्थ प्रगतीकडे वाटचाल असा असतो. नदी जशी वाहत असते त्या प्रमाणे आपले जीवनही वाहत जाते. आपले जीवन हे नदीप्रमाणे सहनशील आणि धाडसी असावे.

तर मित्रांनो यापैकी एक तरी वस्तू सकाळी सकाळी आपल्याला दिसावी व आपला दिवस ही शुभ आणि आनंदी आणि उत्साहाचा जावा.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.