केतू ग्रह 2023 पर्यंत तूळ राशीत ठाण मांडणार, या 3 राशींच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता

नमस्कार मित्रांनो,

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसा, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. या राशी बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होतो. तसेच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. 12 एप्रिल 2022 रोजी छाया ग्रह केतूने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

हा ग्रह तूळ राशीत दीड वर्षे म्हणजेच 2023 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे केतूच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा तीन राशी आहेत त्यांना फायदा होऊ शकतो.

मकर राशी – केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण केतू ग्रह तुमच्या अकराव्या भावात भ्रमण करत आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. अनेक नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळवू शकता. यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. व्यवसायात नवीन करार पूर्ण करू शकता. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

कर्क राशी – केतू ग्रह तुमच्या राशीत चौथ्या भावात भ्रमण करत आहे. या स्थानाला सुखाचे घर म्हटले जाते, त्यामुळे केतू ग्रहाची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. विविध भाषा शिकण्यात रस आहे किंवा अनुवादक म्हणून करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ खूप चांगला आहे.

यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळेल. यासोबतच तुम्हाला यावेळी आईची पूर्ण साथ मिळेल.

कुंभ राशी – केतू ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीतून नवव्या भावात प्रवेश करत आहे. हे स्थान भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच जे काम हाती घेतलं असेल त्यात यश मिळेल.

तुम्ही व्यावसायिक कामानिमित्त बाहेर कुठेतरी प्रवास करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. ज्यांची वेतनवाढ थांबली होती, त्यांना यावेळी पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.