श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
मित्रांनो अल्लकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे, स्वामी भक्त अल्लकोटमध्ये येतं होते. स्वामिनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले,या करकिर्तीमध्ये सोवळ्या ओवळ्याला कधीच महत्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टीची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून, स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर का एखादी अडचणीत असलेली बाई, गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे.
असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात, आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत, विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे, आई कधी विटाळशी होत नाही. अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात, जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता, असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलतं असत, मित्रांनो स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज एकणार आहोत, तर स्वामीभक्त चोळप्पा महाराज, आपल्या सर्वांना माहिती आहेत.
तर गोष्ट अशी आहे की, एकदा चोळप्पा महाराजांनी, त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीती प्रमाणे चोळप्पा महाराज, पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून, माठामध्ये पोचले. स्वामींना चोळप्पा यांनी नमस्कार केला. चोळप्पा यांनी आपल्या संकल्प याबद्दल सर्व काही स्वामीना सांगितले, आणि स्वामींची परवानगी मागितली, चोळप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळप्पा महाराजांना म्हणाले की, चोळ्या सत्यनारायण घालतोस छान, जेवण मात्र मी आणार, चोळप्पा स्वामींची बोलणे ऐकून खूप खुश झाले.
चोळप्पाने स्वामींची आज्ञा शिरसावंद्य पने मानली,आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले.त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून, पुढील महिन्यात ला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये, चोळप्पाचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले, त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तयारी करायची नाही, म्हणून चोळप्पा महाराजांची मनषा थोडी अस्वस्थ होती.
परंतु साक्षात, स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोट मध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते, पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते. आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होते, इकडे स्वामींना तेराव्याचं जेवायला कसं बोलायचं, म्हणून साळेकर द्विधा मनस्थिती मध्ये होते.तर दुसरीकडे चोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती, हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून, साळेकर यांच्या कडून तेराव्याचे जेवण मागून घेतले.
ते जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले, आणि सत्य नारायणाच्या पूजेला स्वामिनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला, सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळी मुकाटपणे जेवले, स्वामींन समोर बोलायची कोणाची हिम्मत झाली नाही. मित्रांनो अशी एक सोवळ्या, ओवळ्याची गोष्ट ऐकूया, राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती, एके दिवशी तीच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली, उद्या पासून सुरुवात करावी, असा ती विचार करत होती.
परंतु तिच्यासमोर दोनअडचणी होत्या, एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती, आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती, आता काय करावे यावर उपाय काय, असं म्हणून ति विचार करू लागली, शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरविले. आणि ती स्वामींकडे पोहोचली, मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून, काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले, राधे हे अडचण अमोशा तुमच्या लोकांसाठी असे काही नाही,आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखंलखीत, जा जाऊन गुरुचरित्र वाच.
वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस, आणि वाचून झाल की ते पिऊन टाक, अडचण बिड चण कुचं नही जावो इदरसे, स्वामींचा उपद्देश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली.त्यानंतर स्वामींनी सांगितल्या प्रमाणेतिने गुरुचरित्र माडले, पेलाभर दूध सुद्धा ठेवले, तिचा सप्ताह सुरळीत पार पडला. आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर, तिची मासिक पाळी सुरू झाली. श्री स्वामी समर्थ, मित्रांनो स्वामीना सुद्धा विटाळ, सोवळे, ओवळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास, अंधश्रद्धा धुडकावून लावत होते.
<
स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही, हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते, म्हणूनच त्यांनी आपल्या रजल्या, गाजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता, तो म्हणजे समाज सुधारणेवर, आणि समाज प्रबोधनावर, बकऱ्यांचा कोंबड्यांचा बळी देऊन, देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी, जरी हातात पत्ते घेतले, तरी देखील त्यांना ते सहन होत नसे.
दगडाला शेंदूर फासून गोर गरीबांना फसवणाऱ्यांचा तर त्यांनी नेहमीच धिकार केला. एकदा तर अशाप्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघूशंका केली. असे आपले स्वामी कायमच, अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची दोन रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती श्रद्धा, आणि आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धे मध्ये बदलते,हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.