नमस्कार मित्रांनो,
वास्तू शास्त्रात आपल्या घराच्या खिडक्यांना खूप महत्व आहे. आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घराच्या खिडक्या कश्या असाव्यात. कोणत्या दिशेला असाव्यात, खिडक्यांची संख्या किती असावी, आणि इतर अनेक नियम.
खिडक्या हा वास्तुशास्त्रातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. खिडक्या जर योग्य दिशेला असतील तर आपल्याला भरपूर धन संपत्ती मिळू शकते. आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहू शकते. आरोग्य चांगले असेल तर त्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान नांदू शकते.
मात्र चुकीच्या दिशेला असलेल्या खिडक्या घरामध्ये अशांती, असमाधान, धनसंपत्ती मध्ये घट, आरोग्य मध्ये बिघाड यासारख्खा समस्या निर्माण करतात.
आणि म्हणूनच वास्तू शास्त्रानुसार घराच्या खिडक्यांच्या संबंधीतले काही महत्वाचे नियम आज आपण पाहणार आहोत.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार खिडक्यांना त्या घराचे डोळे असे संबोधले जाते. म्हणजेच आपल्या घराच्या खिडक्या या आपल्या घराचे डोळे आहेत. आणि म्हणूनच या खिडक्यांचा आणि वास्तूसौख्याचा जवळचा संबंध आहे.
मित्रांनो घराला खिडक्या किती असाव्यात हे पाहण्या पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपल्या घराच्या खिडक्या या कधीही दक्षिण दिशेला ठेऊ नयेत.
दक्षिण दिशा ही मृ त्यू ची देवता यम यांची दिशा आहे.
यम देवतेची दिशा म्हणून दक्षिण दिशेला मान्यता आहे. आणि म्हणूनच दक्षिण दिशेला असलेल्या खिडक्या आपल्या घरात वाईट फळ घेऊन येतात. त्याचे वाईट दुष्परिणाम आपल्या घरात दिसून येतात.
अनेकदा तर त्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचा मृ त्यू ओढवण्याचा प्रसंग सुद्धा ओढवू शकतो. वारंवार अप घात होणं यासारख्या घटना घडतात.
या सर्वाला कारण आपल्या घरातील दक्षिण दिशेला असणाऱ्या खिडक्या असू शकतात. मित्रांनो तुमच्या ही घराला अशा खिडक्या असतील तर त्या ताबडतोब बुजवून टाका.
मित्रांनो दुसरी दिशा आहे पूर्व दिशा. घराला पुर्वे कडे खिडक्या असतील तर त्याने आपल्या घरातील सदस्यांची बुद्धिमत्ता वाढते. ज्यांच्या घरात विद्यार्थी दशेतील मुले आहेत त्यांनी तर आवर्जून पूर्व दिशेला खिडक्या असतील याची काळजी घ्यावी.
मित्रांनो पूर्व दिशेला खिडकी असण्याचा दुसरा फायदा म्हणजे पूर्व दिशेला खिडक्या असल्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होते. आपल्या घरात रोगराई नावाला सुद्धा राहत नाही.
एकतर बुद्धिमत्ता वाढी साठी व दुसरा म्हणजे रोगराई निवारण्यासाठी पूर्व दिशेला असलेल्या खिडक्या अतिशय लाभकारी ठरतात.
मित्रांनो जर आपल्या घरात धनसंपदा येत नसेल, पैसा येत नसेल आणि आलेला पैसा टिकत नसेल तर आपल्या घरातील खिडक्या आपण उत्तर दिशेला ठेवल्या पाहिजे.
ज्या घराच्या खिडक्या उत्तर दिशेला असतात त्या घरात पैश्यांचा योग चालू राहतो. भरपूर पैसा त्या घरात येतो. आर्थिक चिंता त्या घरात कधीही राहत नाही. म्हणूनच उत्तर दिशेच्या खिडक्या या आपल्याला आर्थिक लाभ देण्यात अग्रेसर असतात.
मित्रांनो, आता जाणून घेऊयात पश्चिमेला खिडक्या असतील तर काय होईल?
पश्चिम दिशेला असलेल्या खिडक्या मध्यम प्रतीचे फळ देतात. थोडक्यात वाईट पण नाही पण त्यामुळे जास्त फायदा होईल असेही नाही. मध्यम प्रतीचे फळ आपल्याला मिळू शकत.
आता जाणून घेऊया आपल्या घराला खिडक्या किती असाव्या.
मित्रांनो तुम्ही कितीही खिडक्या ठेऊ शकता. फक्त त्या समप्रमाणात असाव्यात. म्हणजेच दोन, चार, सहा,आठ अशा सम संख्येत खिडक्या असाव्यात.
मात्र यासाठी अपवाद म्हणजे दहा,वीस या दहाच्या पटीतील संख्यात खिडक्या ठेऊ नका, ते अशुभ मानलं जात. आणि खिडक्यांची संख्या विषम तर अजिबात ठेऊ नका. म्हणजे एक, तीन,पाच,सात या विषम संख्येत घराच्या खिडक्या नसाव्यात.
मित्रांनो आपल्या घराला ज्या खिडक्या आहेत, त्या खिडक्यांच्या ज्या काचा असतील त्या कधीही फुटक्या, तडा गेलेल्या नसाव्यात.
मित्रांनो काही कारणाने जर खिडकीची काच फुटली तर ताबडतोब दुरुस्त करून घ्या. करण अश्या घरात अनेक अडचणी उद्भवू शकतात.
पुढची गोष्ट खिडक्या या एका लेवल वरती असाव्यात. एक खिडकी खाली एक खिडकी वर असा नको. यामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकत. अश्या घरात चोरीचे प्रमाण पण अधिक असत, चोरी होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच खिडक्या एक लेवल मध्ये असाव्यात.
मित्रांनो आता शेवटची गोष्ट म्हणजे खिडक्यांना रंग द्यायचा की नाही?
मित्रांनो खिडक्यांना तुम्ही रंग आवश्य देऊ शकता. या बद्दल कोणतेही नियम नाहीत. मात्र खिडक्या या नेहमी घराच्या आतील बाजूस उघडणाऱ्या असाव्यात. सध्या ट्रेंड आलाय की खिडक्या बाहेरील बाजूस उघडतात. पण हे चुकीचं आहे.
वास्तू शास्त्रात सांगितलं आहे की खिडक्याची दारं ही नेहमी आतील बाजूस उघडणारी असावीत.
तर मित्रांनो वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम आपण पाळले तर आपण सुद्धा आरोग्यदायी, आनंददायी, प्रसन्न व धन संपत्ती पूर्ण जीवन जगू शकतो. आपल्याला व आपल्या कुटुंबाला या गोष्टींचा लाभ नक्कीच होईल.
मित्रांनो हे उपाय, नियम आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. फोकस मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.