घरात ठेवलेल्या या 3 वस्तू घरातील वास्तुदोष दूर करतात.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात वास्तुदोष आहेत का हे कसे ओळखावे यासंबंधी आम्ही यापूर्वीच माहिती दिलेली आहे. अनेकांनी सांगितलं की, वास्तुदोष आमच्या घरामध्ये आहेत त्या मला जाणवत आहेत. कारण घराची प्रगती होत नाहीये, घरात सतत काही ना काही तरी अस्वस्थता जाणवत आहे.

आपल्याच घरात आल्यानंतर जे आरामदायी वातावरण जाणवायला हवं ते तसे न जाणवता काहीतरी अस्वस्थता, अशांती असल्याचं जाणवतं हा वास्तुदोष आहे. कदाचित घराचं बांधकाम करताना काही बेसिक चुका झालेल्या असतील किंवा बांधकाम झाल्यानंतर घरांमध्ये अशा काही वस्तू आणून ठेवलेल्या आहेत की,

ज्यातून बाहेर पडणारी न का रा त्म क ऊर्जा आपल्या घरात दोष उत्पन्न करते यालाच आपण वास्तुदोष असं म्हणतो. या वास्तू दोषांच्या प्रभावी घरात लोक आजारी पडतात. किरकोळ कारणावरून मोठमोठी भांडणे होतात आणि परिणामी घरात नेहमी अशांतता नांदते आणि मग अशा घरात लक्ष्मी सुद्धा राहणं पसंत करत नाही.

मग अशा कोणत्या वस्तू आहेत असे कोणते उपाय आहेत की, ज्यामुळे आपण आपल्या वास्तुमधील हे दोष दूर करू शकतो. तर त्यातील 3 अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो या वस्तूंचा वापर जर आपण आपल्या घरामध्ये सुरू केल्या, वस्तू जर आपल्या घरात आपण ठेवल्या तर या वास्तू दोषांपासून आपल्याला बर्‍याच अंशी मुक्ती मिळेल.

यातील पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कापूर. मित्रांनो अनेक प्रकारच्या होम हवन यज्ञांमध्ये या कापराचा वापर अगदी सर्रास केला जातो. आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपल्या देवी देवतांची आरती करता तेव्हा त्या आरतीमध्ये कापराचा वापर आपण आवर्जून करा. कापरामुळे आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध आणि पवित्र बनतं.

सोबतच या कापरामध्ये आपण तीन चार लवंगा जर जाळ्या आणि संपूर्ण घरांमध्ये हा धूर जर आपण पसरविला तर त्यामुळे सुद्धा घरातील वास्तुदोष बऱ्याच अंशी निघून जातात. अत्यंत चांगला अनुभव या कापराचा अनेकांना आलेला आहे. तर ही एक वस्तू आपल्या घरात आपण सातत्याने ठेवायला हवी त्याचा वापर करायला हवा.

दुसरी गोष्ट म्हणजे सुपारी. तुम्हाला माहीत असेल की, पूजेमध्ये आपण सुपारीला गणपतीचे स्वरूप मानतो. गणपती म्हणून तिची आपण स्थापना करतो तिची पूजा करतो. तर सुपारी ही पूज्य आहे आणि तुमच्या घरात सतत या वास्तू दोषांमुळे कुणी ना कोणी आजारी पडत असेल, आजारपण आहे, आजारपण हटत नसेल तर अशा वेळी आपण या सुपारीचा वापर आपल्या घरामध्ये करू शकता.

मात्र या ठिकाणी काळजी आपण घ्या. देवाला ही सुपारी नैवेद्य म्हणून अर्पण करताना ती नेहमी साबूत म्हणजे अखंड असावी. फुटलेली सुपारी आपण देवांसाठी वापरू नये. खर तर सुपारी नव्हेच तर कोणतीही फळे ही कापून देवाला पण कधीच अर्पण करता कामा नये. नारळ मात्र याला अपवाद आहे.

जेव्हा आपण भोळेनाथाना महादेवांना नारळ अर्पण करतो तेव्हा तो साबूत म्हणजे न फोडता आपण अर्पण करावा लागतो मात्र कोणत्याही देवीला नारळ अर्पण करताना तो फोडून आणि त्यातील पाणी हे देवीच्या चरणी वाकूनच आपण तो देवीला अर्पण करायला हवा.

मित्रांनो नैवेद्याच्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट देवघरामध्ये आपल्या कितीही देवी देवतांच्या फोटो किंवा मूर्ती असू द्या आपण त्यांच्यानिमित्त एकच भोग अर्पण करायचा आहे. जे लोक नास्तिक आहेत ते म्हणतात की, देव भोग स्वीकार करत नाही. तुम्ही नैवेद्य ठेवता मग तो तर आहे तसाच आहे.

तो देवांनी स्वीकार केलेलाच नाही. एक लक्षात घ्या ज्याप्रकारे आपण फुलाचा सुगंध घेतो तर त्या फुलामध्ये काही कमतरता येते का? जेव्हा आपण एखाद्या फुलाचा वास घेतो सुगंध घेतो त्या फुलाच्या वजनामध्ये किंवा त्याच्या आकारामध्ये काही कमतरता येते का? अगदी त्याचप्रकारे देवाला वाहिलेला नैवेद्य सुद्धा देव अशाच स्वरूपात ग्रहण करतात की, त्या नैवेद्यामध्ये काहीही कमी झालेल आपल्याला दिसून येणार नाही.

थोडक्यात आपली भावना आपला देवाप्रती मला विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्वाची असते. तर जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तो संपूर्ण स्वरूपामध्ये आपण अर्पण करायचा आहे. फुटलेली सुपारी आपण देवाला कृपया अर्पण करू नका.

मित्रांनो देवाला नैवेद्य अर्पण का करावा? तर त्यामुळे घरामध्ये शांतता निर्माण होते घरामध्ये शांती येते. सत्य समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपलं मन आपल्याला मानसिक शांती लाभते. जर तुमच्याकडे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तुमची फार गरिबीची परिस्थिती आहे तर मानसिक भोग आपण अर्पण करा.

मानसिक म्हणजे मनातल्या मनात फक्त. कोणतीही वस्तू कोणताही पदार्थ ठेवण्याचे सुद्धा गरज नाही. तर 2 प्रकार सांगितले की, जे वास्तुदोष नष्ट करतात कापूर आणि सुपारी गोष्ट.

अजून एक गोष्ट म्हणजे कलावा किंवा मौधी. आता कलावा म्हणजे काय तर आपल्या हातामध्ये आपण जो लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधतो, हा धागा सुद्धा सातत्याने आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराजवळ किंवा आपल्या घरामध्ये आपण ठेवत चला.

मित्रांनो अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचे परिणाम याने प्राप्त होतात आणि घरातून वास्तु दोष हे निघून जातात. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा एखाद्या मंत्राचा जप करणं, एखादं पाठ करणं मग श्री विष्णू सहस्त्र नाम असेल, श्री सूक्त असेल असे वेगवेगळेपाठ करणं, यज्ञ करणं, हवन करणं,

गोरगरिबांना दानधर्म करण या गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिला तर वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वास्तुदोष हे शिल्लक राहणार नाहीत. आपलं घर हे सुखी समृद्ध आणि त्या घराची बरकत नक्की होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *