जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील…

नमस्कार मित्रांनो,

स्वामी प्रिय भक्त हो हा अनुभव कोल्हापूरमध्ये राहणारे सायली दीपक बणगे या स्वामी सेवेकरी ताईंचा आहे.

ते सांगतात गेल्या महिन्यात मी जीवनात येणाऱ्या अडचणी आणि त्रासाला कंटाळून जीवन संपवण्यासाठी घरातून बाहेर पडले. थोड्या वेळातच प्रदीप दादा सोनवणे यांचा मला फोन आला.

आणि ते म्हणाले माऊली कुठे आहात कोणताही वाईट विचार न करता घरी जावा आणि घरी जायचं नसेल तर माझ्याकडे माझ्या घरी या राहायला.

मी ही तुमचं रक्ताचा भाऊ आहे आणि मला शांत व्हायला सांगितले व म्हणाले की, मी कामावर आहे पण मला स्वामींनी सांगितले की, ताईंना कॉल करा. माझं कॉल स्वतःहून तुम्हाला आला आहे.

त्यामुळे विचार करा घरी जावा आणि घरी गेल्यावर मला मेसेज करा घरी व्यवस्थित पोहोचली. म्हणून दादांमुळे मी वाचले आणि खरंच आहे दादांचा कॉल लवकर लागत नाही.

पण त्यांच्याकडे माझा नंबर नसताना पण मला त्यांचा फोन आला आणि मला मरता-मरता त्यांनी वाचवले. दादांना व स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.

तसेच मला एक स्वामींचा दुसरा अनुभव आला. रोज व्हाट्सअप ग्रुपवर येणारे अनुभव आणि दादांचे मेसेज मी वाचत होते. दादा खूप बिझी असतात त्यामुळे त्यांचा कॉल लवकर लागत नाही हे मला माहीत होते.

गेल्या आठवड्यामध्ये मला एक स्थळ आले आणि आमचा विचार पक्का झाला की आज आपण बोलनी करायची आणि लग्न ठरवायचे.

पण काय कसे माहीत असे वाटले की, हे सगळे प्रदीप दादांना सांगावे आणि मगच पुढे पाऊल टाकावे. कारण माझा काडीमोड झालेला आहे त्यामुळे पुन्हा आयुष्यात कोणतीही जोखीम नको होती. पण आलेले स्थळ खूप चांगले होते.

मी काल रात्री एक वाजता दादांचा डीपी चाफोटो पाहून हात जोडले आणि म्हणाले की, दादा मला तुम्हाला कॉल करून त्रास द्यायचे नव्हते. म्हणून आज तुम्हाला विनंती करते उद्या येणारे स्थळ चांगले असेल तरच ठरू दे.

कारण आता तुम्हीच माझे देव आहात. तुम्हाला योग्य वाटलेस तर ठरू दे लग्न. पण आज सकाळी मला विवाह मंडळातून फोन आला कि, मुलगा चांगला नाही आणि तो खूप जणांना फसवतो. खरंच मला पुन्हा एकदा दादांनी स्वामींनी वाचवले.

दादांच्या फोटोकडे पाहून जरी आपली अडचण सांगितली तरी आपण संकट मुक्त होतो. दादांना व स्वामी समर्थ महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ स्वामी.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.