नमस्कार मित्रांनो,
चक्कर येणे, गरगरने, भोवळ येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे ही जरी क्षुल्लक बाब वाटत असली तरी हे लक्षण कुठल्या तरी मोठ्या आजाराचे असू शकते. परंतु कधी-कधी पित्त जरी वाढलेले असेल, तरी उठता-बसता अंधारी येणे असे प्रकार घडतात.
अनेक छोट्या मोठ्या आजाराचे लक्षण गरगरने हे जरी असले तरीही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी सुरुवातीला असे काही घरगुती सोपे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. बऱ्याच वेळा उठताना बसताना अचानक अंधारी येते, चक्कर येते असे शक्यतो मेंदूला कमी रक्तपुरवठा झाल्याने देखील होतो.
अशावेळी सुरक्षित ठिकाणी काही वेळ झोपून हृदय आणि मेंदू समांतर पातळीत आणून काही वेळातच चक्कर येणे, भोवळ येणे त्वरित थांबते. पण चक्कर येण्याची समस्या जर सतत सुरू होत असेल तर आपण असा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत.
ज्यामुळे तुमची चक्कर येण्याची समस्या कायमची नष्ट होऊ शकते. तर पाहूया हा उपाय कसा बनवायचा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे धने पावडर घरगुती बनवलेली धने पावडर आपण आपल्या उपायासाठी वापरायचे आहे.
दररोजच्या जेवनाची चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर किंवा धने पावडर वापरत असतो पण औषधी म्हणून वापर करताना अशा पद्धतीने याचा वापर केल्याने आपल्या शरीराला याचा निश्चितपणे फायदा होतो. धन्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात.
त्याचप्रमाणे प्रमाणात बॉडी ग्लूकोज लेवल मध्ये राहते. जेणेकरून चक्कर येणे भोवळ येणे डोळ्यापुढे अंधारी येणे या समस्या नष्ट होतात. यामध्ये विटामिन सी आणि फॉलिक ऍसिड रक्ताची कमतरता देखील भरून काढण्यास मदत करतात.
रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याची क्षमता या धन्यामधील घटकांमध्ये असते. आपण आपल्या उपाय साठी एक ग्लास कोमट असे हलके पाणी घेऊन, त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आवळा पावडर आवळा पावडर कोणत्याही मेडिकल मध्ये उपलब्ध होईल.
आवळ्याला आयुर्वेदातील रसायन म्हटले जाते. म्हणजेच शरीराच्या शेवटच्या पेशींपर्यंत जाऊन पोषण करण्याचे काम आवळा करतो. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा आवळा पावडर ग्लास मध्ये टाकायची आहे. आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत.
<
आता हे मिश्रण रात्रभर किंवा किमान सहा ते सात तास असेच झाकून ठेवायचे आहे. सहा ते सात तासानंतर गाळून घ्यावे किंवा तसेच देखील पिऊ शकता. यामध्ये तुमच्या आवडीनुसार एक चमचा खडीसाखर पावडर किंवा एक किंवा दोन चिमूट इतके काळे किंवा सैंधव मीठ देखील सुद्धा ॲड करू शकता टाकू शकता.
सकाळी उपाशी पोटी केव्हा जेवणाआधी किमान दोन ते तीन दिवस हा उपाय केला तर चक्कर येणे भोवळ येणे अंधारी येणे गरगरणे अशा समस्या मुळापासून नष्ट होतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.