उरलेले पीठ कधीही ठेवू नये, नाहीतर असे घडू शकते!

नमस्कार मित्रांनो,

आज काल सर्वांचे जीवन अगदी धावपळीचे झाले आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया घर सांभाळत असतं तर पुरुष बाहेरची कामे सांभाळत असतं. आता तसे काहीही राहिलेले नाही. जीवनमान बदले तश्या गरजाही बदल्या. आणि आता पुरुषांबरोबरच स्त्रियाही घराबाहेर पडून चार पैसे कमावतात. आज काल स्त्री व पुरुष दोघांनी मिळून काम केले तरच घराचा खर्च अगदी व्यवस्थित चालतो.

म्हणून स्त्रियांनाही 8 ते 10 तास घराबाहेर पडावेच लागते. त्यामुळे स्त्रियांना घरात पूर्ण वेळ काम करणे शक्य नसते. मग घरी येऊन स्त्रियांची कामे आवरण्याची घाई होते. बहुतेक स्त्रियांना सकाळी लवकर ऑफिसला जायायचे असल्याने रात्रीच सकाळी बनवायच्या स्वयंपाकाची तयारी त्या करून ठेवतात.

त्यात भाजी निवडणे, चिरणे, मसाला वाटण करणे इत्यादी सर्व तयारी त्या करून ठेवतात. इथपर्यंत ठीक आहे. परंतु काही स्त्रिया सकाळी लवकर चपात्या करण्यासाठी कणिक रात्रीच मळून फ्रीजमध्ये ठेऊन देतात आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पिठाच्या पोळ्या बनवतात हे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे तर आहेच. त्याशिवाय शास्त्रीय दृष्टयाही अयोग्य आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्याबरोबर पिठाच्या गोळ्याचे पुतळे दिले जातात ते म्हणजे पिंड. पिठाचा गोल गोल गोळा करून पिंड तयार केले जाते. म्हणजे जो गोल गोळा असतो तो पिंड समान असतो आणि आपण पिठाचे कणिक करून ती मस्त गोल गोल पिंडासारखी बनवून डब्यात पॅक करतो आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो.

या कणक्याच्या गोळ्यावर प्रेताचा हक्क होतो. तो गोळा पिंडा समान बनतो आणि दुसऱ्या दिवशी आपण तोच गोळा बाहेर काढून त्याच्या पोळ्या करतो आणि खातो. अशा कणक्याच्या पोळ्या खाल्याने आपल्या घरात भांडण तंटे व वाद विवाद उत्पन्न होतात. किंवा डोके दुखी, कंबर दुखी आणि गुडघे दुखी असे विकार जडतात.

कारण या पिठाच्या गोळ्यावर आपला अधिकार नसून प्रेताचा अधिकार असतो. तो गोळा त्यांच्या हिस्स्याचा बनतो. आणि जर आपण त्यांच्या वाट्याचे अन्न खाल्ले तर ते आपल्याला त्रास देतात. म्हणून कधीही चुकूनही रात्री भिजवत ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या करू नयेत. सकाळी जर पिठ भिजवले त्याच्या पोळ्या आपण संध्याकाळी करू शकतो. परंतु रात्री कणिक मळून त्या पीठाचा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर कधीही वापर करू नये.

हे शास्त्रीय दृष्ट्यापण चुकीचे आहे. त्याशिवाय रात्रभर भिजवलेल्या पिठाचा गोळा तसाच ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया म्हणजेच जीवजंतूची वाढ होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच पिठाच्या पोळ्या करून खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे विकार जडतात, पोटाच्या समस्या निर्माण होतात पचनक्रियेशी संबंधित अडीअडचणी वाढतात. डोके दुखी, चक्कर येणे, गरगरणे, मळमळणे अशा अनेक समस्या उद्भवतात.

म्हणून सकाळी 10 मिनिटे लवकर उठावे परंतु रात्रीच पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवू नये. जेवढे लागेल तेवढेच पीठ त्यावेळी भिजवावे व लगेचच त्याच्या पोळ्या कराव्यात. कारण ताजे ताजे बनवलेले अन्न शरीरासाठी पोषक असते. त्याशिवाय त्यात जीवजंतू व बॅक्टेरियाचाही धोका नसतो. तसेच धर्म शास्त्रीय दृष्ट्याही हे योग्य आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *