उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? जाणून घ्या ऊसाच्या रसाचं सिक्रेट

नमस्कार मित्रांनो,

ठळक मुद्दे
1) वजन वाढण्यास ऊसाच्या रसातील कॅलरीजचं जास्त प्रमाण कारणीभूत ठरतं. 2) ऊसाच्या रसातील पोषक घटकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढते. 3) ऊसाच्या रसानं त्वचा तरुण दिसते.

उन्हानं पाणी पाणी करणाऱ्या जिवाला ऊसाचा रस प्याल्यानं शांतता मिळते हा प्रत्येकाचा दर ऊन्हाळ्यातला अनुभव. एक परवडणारं थंडं पेय म्हणून ऊसाचा रस लोकप्रिय आहे. ऊसाचा रस प्याल्यानं छान वाटतं, तहान भागते हे खरं पण ऊसाचा रस कसा प्यावा, कधी प्यावा, ऊसाचा रस पिऊन वजन वाढतं की कमी होतं अशा अनेक प्रश्नांच गोंधळ अनेकांच्या मनात असतो.

ऊसाचा रसं पिणं हे आरोग्यासाठी चांगलं हे अनेकांना माहीत असतं, पण कसं हे मात्र सांगता येत नाही. हैद्राबाद स्थित क्लिनिकल आहारतज्ज्ञ डाॅ. दीपिका रानी ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगतात आणि वजनाशी निगडित ऊसाच्या रसाचा गोंधळही सोडवतात.

ऊसाचा रस फायदेशीर की तोट्याचा?
दीपिका रानी म्हणतात, ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र ऊसाचा रस प्रमाणापेक्षा जास्त प्याला तर वजन वाढण्याचा धोका असतो. ऊसाच्या रसान वजन वाढण्यामगे ऊसाच्या रसातील कॅलरीज कारणीभूत असतात.

ऊसाच्या रसात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातील फॅटस वेगानं वाढतात. मात्र ऊसाचा रस प्रमाणात प्याल्यास वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ऊसाच्या रसाद्वारे शरीराला नैसर्गिक साखर मिळते. ऊसाच्या रसानं शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास, कमी होण्यास ऊसाच्या रसाचा उपयोग होतो.

ऊसाचा रस प्याल्यानं शरीराला थंडावा मिळतो सोबतच ऊसाच्या रसामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. ऊसाच्या रसातील पोषक घटकांचा उपयोग शरीरातील ऊर्जा वाढण्यासाठी होतो. यकृताशी संबंधित समस्या ऊसाच्या रसानं ठीक होतात. ऊसाच्या रसातील गुणधर्मांमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखलं जातं.

ऊसाचा रस प्याल्याने रसातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नीज हे पोषक घटक शरीराला मिळतात. ऊसाच्या रसात फ्लेवोनाॅइडस हे ॲण्टिऑक्सिडण्ट कॅन्सरचा धोका कमी करतात. शरीराला दीर्घकाळ ताकद मिळण्यासाठी , स्नायू मजबूत होण्यासाठी कर्बोदकांची गरज असते.

ऊसाच्या रसात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यात व्यायामानंतर शरीरा आर्द्रता निर्माण करण्यास इतर स्पोर्टस ड्रिंकच्या तुलनेत ऊसाचा रस फायदेशीर ठरतो. ऊसाच्या रसात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यानं पचन सुधारण्यास, पोटाचं आरोग्य नीट राहाण्यास फायदा होतो.

त्वचेवर सूर्याच्या अति नील किरणांचा आणि फ्री रॅडिकल्सचा प्रभाव पडून त्वचेवर वय वाढण्याची लक्षणं दिसतात. ही लक्षणं कमी करण्यासाठी ॲण्टिऑक्सिडण्टसची गरज असते. ऊसाच्या रसानं ही गरज पूर्ण होते. ऊसाच्या रसानं त्वचा तरुण दिसते.

ऊसाचा रस प्याल्यानं त्वचेला फायदा मिळतोच पण अधिक फायद्यासाठी ऊसाचा रस चेहेऱ्याला लावताही येतो. 2-3 चमचे ऊसाच्या रसात चिमूटभर हळद घालावी. हे दोन्ही एकत्र करावं. मिश्रण चेहऱ्यावर लावावं. 10-15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा.

प्रमाणात प्याल्यास ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. मात्र प्रमाणापेक्षा अधिक रस प्याल्यानं वजन वाढण्यासोबतच इतर आरोग्यविषयक समस्याही निर्माण होतात. ऊसाच्या रसात पाॅलिकोसनाॅल नावाचा घटल असतो , जो शरीरासाठी अपायकारक मानला जातो. म्हणूनच ऊसाचा रस जास्त प्याल्यास उलटी होणं, चक्कर येणं , मळमळणं असे त्रास होतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *