नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो भारतात कित्येक लोक रोज पूजाअर्चा करत असतात. आपल्या जीवनातील दुःख, संकटे कष्ट दूर करण्यासाठी अनेक प्रकारे व्रत उपासना करत असतात. त्यांना वाटत असतं की पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यामध्ये सुख-शांती-समाधान येऊ शकेल.
आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वैज्ञा निक दृष्टिकोनातून पिंपळाच्या झाडाकडे पाहिले गेल्यास, हे झाड मानवासाठी उपयुक्त सिद्ध ठरते आहे. कारण हे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळ ऑ क्सि ज न सोडत असते.
त्याच मुळे 24 तास ऑ क्सि ज न पुरवणाऱ्या दुर्मिळ झाडांमध्ये याची गणती होते. पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड हे श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. यामुळे आपल्याला हवे असलेले इच्छित फळ मिळते.
मित्रांनो पिंपळाच्या झाडामध्ये श्रीविष्णूचा वास तर असतोच पण पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मीचा सुद्धा वास असतो. पद्मपुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षणा केल्यास आपले आयुष्य वाढते.
जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करते अशा व्यक्तींना सर्व पापातून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात. पिंपळामध्ये सर्वतीर्थ असल्याचे सुद्धा मानले असल्याचे मानले जाते.
मित्रांनो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण मिळते आणि श्री शनिदेवाची आपल्यावर कृपा होते.
पिंपळाच्या झाडावर माता महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा वास करत असते. म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये. त्याने तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकते.
रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते. ज्या व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करतील त्या व्यक्तीला शनि दोषापासून मुक्तता मिळेल. त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होईल.
मित्रांनो फक्त रविवार सोडून पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ असते. परंतु अमावस्या व पौर्णिमा या दिवशी केलेले पूजन खूपच लाभदायक ठरते.
दर शनिवारी एक मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यावा, त्यात राईचे तेल टाकून काळ्या दोऱ्याची वात टाकावी आणि एक रुपयाचे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.
या उपायाने शनिदेवाच्या कोपापासून आपले रक्षण होते. दिवा लावताना दिव्याची वात पश्चिम दिशेला असायला हवी. कारण पश्चिम दिशेचे स्वामी श्री शनिदेव आहेत, असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. जर तुम्ही पितृदोषाने पीडित असाल किंवा जर तुमच्या पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला सर्पदोषापासून मुक्तता हवी असेल तर त्यासाठी दिव्यामध्ये वात बनवून त्यात थोडसे काळे तीळ मिसळायचे आहेत आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. मित्रांनो या दिव्याची वात कोणत्याही दिशेला नसावी सरळ मधोमध वरच्या दिशेला जाणारी असावी आणि दिवा लावल्यानंतर भगवान विष्णू यांचा मंत्र
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
ज्यांना शनी दोषापासून मुक्तता हवी आहे त्यांनी
ओम शं श्री शनेश्वराय नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
मित्रांनो पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर
ओम पितृ भ्यो नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
अशा प्रकारे तुम्ही दोषमुक्त होण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता व सुखी, आनंदी जीवन जगू शकत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.