भोलेनाथ आणि हनुमान बदलतील तुमचे नशीब… उद्या शनिवारी करा हे उपाय…

नमस्कार मित्रांनो,

आज आपण असे काही उपाय बघणार आहोत ज्याने आपले भाग्य बदलणे शक्य आहे. या उपायांमुळे तुमची सर्व समस्यापासून सुटका होईल. हे छोटे-छोटे उपाय आहेत जे खूप प्रभावशाली आहेत. फक्त श्रद्धा व भक्तिपूर्वक हे उपाय तुम्हाला करायचे आहे.

यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सकारात्मक परिणाम जाणवतील. जर आपल्याला कशाचीही भीती वाटत असेल, आपल्याला धाडसी बनायचे असेल तर हनुमानाला दररोज पाच लाल फुले जरूर वहावीत.

त्याबरोबरच महादेवांची कृपा मिळवायची असेल तर सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते बेलाचे पान महादेवांना अर्पण करावे व आपली भीती नाहीशी होण्याची प्रार्थना करावी. यामुळे आपली भिती नाहिशी होईल.

देवघरात तुपाचा दिवा नक्की लावावा. तसेच कापूर व चीक आबा अष्टगंधाचा सुगंध घरात पसरवावा. प्रत्येक रविवारी व गुरुवारी शुद्ध तुप व गुळ कोळशाचे निखारे करून त्यावर टाकावे. यामुळे घरातील वातावरण सुगंधी होईल.

रोज रात्री शुद्ध तुपात बुडविलेल्या कापुराच्या दोन वड्या घरात जाळाव्यात. यामुळे मानसिक टेन्शन असेल तर ते दूर होते व शांत झोप लागते. सुगंधाचा संबंध थेट आपल्या भावनांशी असतो. घरातील वातावरण जर शुद्ध व सुगंधित असेल तर आपले मन हे शांत व आनंदी राहते.

महिन्यात दोन वेळा लोबानची धुरी नक्की करावी. यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. आजारापासून ही आपले संरक्षण होते व घरात शांतता राहते. त्यामुळे आपले डोके ही शांत राहते.

कोणत्याही शुक्रवारी कुलुपाच्या दुकानात जाऊन कोणत्याही लोखंडी किंवा स्टील चे कुलूप विकत आणावे पण ते कुलूप उघडून पाहता तसेच सील पॅ क घरी आणावे व तसेच ते आपल्या बिछान्याजवळ रात्रभर ठेवून द्यावे आणि शनिवारी सकाळी कोणत्याही मंदिरात नेऊन ते कुलूप ठेवून द्यावे व मागे न बघता तसेच आपल्या घरी परत यावे.

जेव्हा कोणी व्यक्ती येऊन ते कुलूप हातात घेऊन उघडेल त्यावेळी आपल्या भाग्याचे द्वारी आपोआप उघडले जाईल. आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील. दररोज हनुमान चालीसा वाचावा.

मंगळवार व शनिवारी हनुमानाला वस्त्र अर्पण करावे. तसेच बनारसी पानाचा विडा ही अर्पण करावा. त्यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतात. हनुमान चालीसा वाचल्यामुळे पितृदोष, राहू दोष व मंगळ दोष दूर होतात आणि घरातील ऊर्जा ही निघून जाते.

दररोज गाईला, कुत्र्याला, पक्ष्यांना, कावळ्यांना आणि मुंग्यांना त्यांचे त्यांचे भोजन दिल्यासही आपली अडचण दूर होऊन अडकलेली कामे मार्गी लागतील. गाईला दररोज भोजन दिल्यास घरात धन समृद्धी व शांततेत वाढ होते.

कुत्र्याला भोजन दिल्यास आपल्याला शत्रूंचे भय राहत नाही. शत्रु नाश होतो. कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते व असे मानले जाते की घरातील आजारी व्यक्तींवरील संकट कुत्रा स्वतःवर घेतो. पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला द्यावी.

कावळ्याला भोजन दिल्यास पितृ दोष व कालसर्प दोष नष्ट होतात. त्याबरोबरच आपल्यावरील संकटे व अडचणी दूर होऊन आपल्या शत्रूंचा नाश होतो. शनिदेवांना जर प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला भोजन जरूर द्यावे.

पक्ष्यांना दाणे टाकल्यास आपल्याला नोकरी व्यवसायात लाभ होतो. घरातील वातावरण आनंदी होते. मुंग्यांना साखर व पीठ एकत्र करून टाकल्यास आपल्या वरील कर्ज फिटते. माशांना कणकेचे गोळे टाकल्यास आपल्या समृद्धीत वाढ होते.

आपला समाजामध्ये मानसन्मान वाढावा असे वाटत असेल तर कबुतरांना तांदूळ टाकावे. शुक्रवारी बाजरी खरेदी करून शनिवारपासून पक्ष्यांना व कबुतरांना टाकायला सुरुवात करावी.

घरातील भिंतींवर आनंदी परिवाराचा फोटो लावावा किंवा नैसर्गिक फोटो लावावा. ज्याकडे पाहून आनंद वाटेल. जर तुमच्यावर एकामागून एक संकटे येत असतील जर एखाद्या प्रेत यात्रेबरोबर जाऊन येताना काही सुट्टे पैसे डोक्यावरून मागे टाकत टाकत घरी यावे.

घरी आल्यानंतर आंघोळ करून हनुमानाच्या देवळात जाऊन आपल्याकडून कळत-नकळत केलेल्या चुकांची व पापांची माफी मागावी. आपल्यावर येणारी संकटे लगेच थांबतील.

कांसाच्या वाटीत तेल घेऊन त्यात आपले तोंड बघावे व ते तेल कोणत्याही मंदिरात ठेवून यावे. पाच प्रकारची फळे घेऊन एखाद्या मंदिरात ठेवून यावे. घरातून महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असल्यास श्रीगणेशाय नमः असे म्हणून चार पावले मागे यावे व नंतर घराबाहेर पडावे. आपले काम नक्की यशस्वी होईल.

घरातून बाहेर पडताना थोडासा गुळ खाऊन त्यावर पाणी प्यावे व नंतर घराबाहेर पडावे. त्यामुळे आपल्या कामात आपल्याला सफलता मिळेल. त्याशिवाय काळी मिरीचे काही दाणे घराबाहेर टाकून त्यावर पाय ठेवून बाहेर निघावे व मागे वळून पाहू नये. आपल्या कामात अडचणी असतील तर त्या दूर होतील.

जर किती प्रयत्न केले तरीही एखादे काम होतच नसेल तर एकोणिसाव्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधावा व तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्या दिव्यात 11 उडदाचे दाणे टाकावेत. शिवाय दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडासमोर लावावा. परंतु पिंपळाच्या झाडाला शनिवारीच स्पर्श करावे.

जर घरात पैशासंबंधी अडचणी येत असतील तर आपले मौल्यवान दागिने, पैसे, महत्त्वाचे कागदपत्रे घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे व कुबेर महाराज हे धनाचे देवता आहे. या दिशेला धन आणि पैसे ठेवल्यास आपल्याला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *