नमस्कार मित्रांनो,
पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या होय. या दिवशी सर्व लोक आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध घालतात.
श्रद्धया क्रियेत तं श्राध्य : अर्थात श्रद्धेने केलेले कार्य म्हणजे श्राद्ध असा होय. यावर्षीची सर्वपित्री अमावस्या ही रविवार 25 सप्टेंबर रोजी आली आहे.
मित्रांनो 25 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या संपन्न होत आहे. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या अमावस्येला महालय अमावस्या देखील म्हटले जाते. जी पितरे पौर्णिमेच्या तिथीला, चतुर्थीला तसेच अमावस्येला मरण पावले असतील अशा तिनही तिथींचे श्राद्ध हे सर्वपित्री अमावस्येला घातले जाते.
त्याच बरोबर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पितरांचे श्राद्ध त्या त्या तिथीला करायला जमत नसेल तेव्हा मृतात्मे यांच्या शांतीसाठी सर्व पितरांचे श्राद्ध हे सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी केले जाते. बऱ्याच वेळा मृत तिथी माहित नसते तर अशावेळी सुद्धा हे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते.
आणि म्हणूनच की काय या अमावास्येला सर्वपित्री अमावस्या अर्थात मोक्ष अमावस्या म्हटले जाते. या पितृपक्षात निधन पावलेले आपले पूर्वज म्हणजेच पितर यमलोकातून पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळेच या काळात श्राद्धविधी केल्या जातात.
मित्रांनो या श्राद्ध कर्मातून आपल्या पितरांबद्दल आदर दर्शविला जातो. त्यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. या काळात शुभ कार्य वर्ज्य असतात. आपल्याला पित्रांचे आशीर्वाद लागतात आणि पितृदोषातून मुक्ती मिळते.
सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी सकाळी तयार केल्या जाणाऱ्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांचे प्रिय पदार्थ आहेत त्यांचा समावेश करावा. यासोबतच या पदार्थांमध्ये खीर व पुरी चा प्रसाद अवश्य करायचा आहे. कारण खीरपुरी ही सर्वच पितरांना अतिप्रिय असते.
त्याच बरोबर विधिवत पूजा करावयाची आहे आणि गाय कुत्रा, कावळा यांना केळीच्या पानावर नैवेद्य दाखवायचा आहे. सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी आपण दानधर्म ही करावे. या अमावस्येच्या निमित्ताने संध्याकाळी आलेले पूर्वज आपल्या वाटेने निघून जातात.
मित्रांनो या दिवशी पितर म्हणून आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला जेवण कपडे रुमाल टोपी चपला देऊन त्यांचे आदरातिथ्य करायचे आहे. आणि त्यांना प्रेमपूर्वक निरोप द्यायचा आहे.
सायंकाळी पुन्हा एकदा ताजा स्वयंपाक करून घराच्या उंबरा, पायरीवर अगरबत्ती धूप प्रज्वलीत करून आपल्या पूर्वजांचे नाव व गोत्र घेऊन प्रार्थना करावी की, आमच्या घरी सुख शांती राहू दे, आमच्या मुला-बाळांना सुख शांती लाभू दे. अशी प्रार्थना करून त्यांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे.
मित्रांनो या दिवशी श्राद्ध कर्म करताना काही महत्त्वाचे नियम पाहायचे आहेत. दुसऱ्याच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये. या दिवशी दान धर्म करावे. या दिवशी रात्रीच्या वेळी श्राद्ध कर्म करायचे नाही श्राद्ध कर्म हे दुपारच्या वेळेस केले जाते.
श्राद्ध कर्म करताना सुरुवातीला अग्नीला नैवेद्य अर्पण करावा लागतो. आता या सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी आपल्याला नेमके काय कार्य करायचे आहे ज्यातून पितरांचे आशीर्वाद मिळतील व शुभ फळाची प्राप्ती होईल.
या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. त्या झाला मध्ये आपल्याला काळे ते मिश्रित करायचे आहेत. तसेच थोडे दूध टाकून ते जल पिंपळाला अर्पण करायचे आहे. सोबत ॐ नमो वासुदेवाय नमः म्हणत सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
मित्रांनो या दिवशी जमेल तसे पशु पक्षांना अन्न द्यायचे आहे. मुंग्यांना सुद्धा अन्न घालावे. या दिवशी हनुमानाच्या फोटो पुढे दिवा पेटवून हनुमान चालीसा चे पठण करायचे आहे. हनुमान चालीसा चा पाठ करून झाल्यावर तो दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे.
या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही गोष्टी वर्ज्य करायचे आहेत. काही कामे आपल्याला टाळायचे आहेत तर त्या कोणत्या पाहू या. या दिवशी घरी आलेल्या कोणालाही उपाशी पाठवायचे नाही. कारण आपले पित्र कोणत्या रूपात आपल्या घरी येतील हे सांगता येत नाही. आम्ही घरी कोणीही आलं तर त्यांना रिकाम्या हाती रिकाम्यापोटी पाठवू नका. यथाशक्ती दानधर्म करावे. यांनी पितरांचे आशीर्वाद लागतो पितृदोष कमी होतो.
मास मच्छी नशा दारू ह्या दिवशी वर्ज्य आहे. यादिवशी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे आहे. या दिवशी क्रोध करू नये घरात शांतता राखावी. खास करून घरातील वृद्धांना दुखावू नये.
अशाप्रकारे मित्रांनो 25 सप्टेंबर रविवार रोजी येणारी जी सर्वपित्री अमावस्या आहे यादिवशी विधीपूर्वक विनम्रता पूर्वक पितरांचे स्मरण व श्रद्धेने श्राद्ध कार्य केले तर आपली पत्रे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत नेहमीच राहतो. आपल्या कुंडलीतील पितृदोषाचे निवारण होते. तुमच्या पितरांची तुमच्यावर कृपा राहो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.