नमस्कार मित्रांनो,
बुधवारी एक छोटासा तोटका, एक छोटासा उपाय नक्की करून पहा. जर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, म्हणजे पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही. आजारपण असेल किंवा कोणत्याही वायफळ गोष्टींवर नको त्या गोष्टींवर जर पैसा खर्च होत असेल, तर बुधवारी हा उपाय आपण आवर्जून करावा.
केवळ एकच बुधवार नव्हे तर 1,3,5,7 अशा विषम संख्यातील कितीही बुधवारी आपण हा उपाय रिपीट करू शकता. पुनरावृत्त करू शकता. जेणेकरून आपल्या घरात पैसा टिकू लागेल. पैशांची बचत होईल आणि घराची आपल्या वास्तूची भरभराट होईल. ज्यांचा जॉब त्यांची नोकरी सुटते, नोकरी मध्ये जॉब मध्ये अडचणी येतात. असे लोक सुद्धा हा उपाय करू शकता.
मित्रांनो हा उपाय खरंतर आपल्या कुंडलीतील शनी आणि राहू यांना मजबूत बनवतो. त्यांचे जे काही दुष्प्रभाव आहेत शनीची अंतर्दशा महादशा साडेसाती थय्या म्हणजे हाडीच्की किंवा राहूचे जे दोष आहेत त्यांना बऱ्याच अंशी हा उपाय कमी करतो जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीत शनी दोष राहू दोष असतो तेव्हा लक्ष्मी तर येते मात्र ती टिकत नाही अनेकदा जेव्हा शनी दोष मोठ्या प्रमाणात वाढतात तेव्हा लक्ष्मी येतच नाही म्हणजे पैसा येण्याचे मार्ग खुंटतात.
तर मित्रानो हा उपाय अशा सर्व लोकांसाठी आहे उपाय कसा करावा जाणून घेऊया मित्रांनो बुधवारी आपण हिरवा कापड घ्यायचं आहे हिरव्या रंगाचं शक्यतो डागरहित घ्यावं. छोटंसं कापड घ्यायचं आहे. सुती असेल तर ही चालेल आणि रेशमी म्हणजे सिल्की असेल तरी ही चालेल अश्या ह्या हिरव्या कापडावर आपण थोडीशी शेव ठेवायची आहे. शेव जी हरभरा डाळीपासून आपण की शेव बनवतो.
अगदी बाजारात सुद्धा सहजपणे मिळून जाईल. अशी शेव जी केवळ मिठापासून बनलेली आहे. तिच्यामध्ये बनवताना कोणतीही वस्तू म्हणजे तिखट पदार्थ वापरलेले नसावेत. केवळ मीठापासून बनवलेली शेव मग आपण ती आपल्या घरामध्ये पण बनवू शकता किंवा मार्केट मधून ही आणु शकता अगदी थोडीशी तुमची जेवढी क्षमता आहे जे सामर्थ्य म्हणजे पावकीलो अर्धकीलो एक किलो जितकी शक्य आहे.
तितकी त्या हिरव्या कपड्यांमध्ये ठेवायची आहे आणि घराच्या आसपास जिथेकुठे आपल्या गावाची आपल्या शहराची साफसफाई करणारे जे लोक असतात, की जे साफसफाई च काम करतात. अशा स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही शेव कपड्यासहित दान करायची आहे. आपण स्वच्छता कर्मी निवडताना शक्यतो ज्यांचा वाडवडीलांपासून हाच व्यवसाय आहे.
जे अगदी पिढ्यानपिढ्या ह्याच व्यवसायात गुंतलेले आहेत. अशा लोकांची निवड ह्या ठिकाणी करू शकता. खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. मित्रानो शक्यतो हे लोक ज्या वस्तीमध्ये राहतात. ज्या भागात राहतात. त्या ठिकाणी जाऊन आपण जर दान केलात व एकापेक्षाही जास्त लोकांना आपण दान करू शकता.
तर कुंडलीतील शनी मजबूत बनतो. राहूचे दोष बऱ्याच अंशी कमी होतात. घरात पैसा टिकू लागतो. आजारपण हे बऱ्याच अंशी कमी होत. ज्या ज्या समस्या मी तुम्हाला ह्या पूर्वी सांगितल्या त्या समस्या तून विचार मुक्ती लवकर मिळते. एकापेक्षा जास्त बुधवार नक्की करून बघा .
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.