पैसे बुडवणारा घरी येऊन पैसे देईल फक्त हे करा. उधार पैसे परत मिळत नसतील तर हा उपाय एकदा करून पहा.

नमस्कार मित्रांनो,

समोरची व्यक्ती पैसे परत करत नसेल तर अशा वेळी आपले उधार दिलेले पैसे किंवा उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा तांत्रिक टोटका आपण करू शकतात. काळजी करू नका हा टोटका केल्याने समोरच्या व्यक्तीला कोणतीही इजा किंवा नुकसान पोहोचत नाही.

हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. शक्यतो रात्री केला तर अति उत्तम. यासाठी आपण काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत थोडेसे जास्त घ्या आणि या कापराच्या वड्या जाळून ज्यातून जो धूर बाहेर पडेल त्या धुरावरती एखादं पात्र आपण धरायचं आहे.

कापूर जळायच आहे आणि त्यावरती एक पात्र आपण धरायचं आहे. हे पात्र धरल्यानंतर जी काजळी त्या पात्रामध्ये जमा होईल या काजळीमध्ये तुपाचे किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत. मोहरीच्या तेलाला हिंदीमध्ये सरसों का तेल असे म्हणतात.

त्यापासून हे तेल आणि ती काजळी एकत्र करून त्यापासून काजळ बनवायचा आहे. या काजळाने तुमच्या शत्रूच फक्त पहिलं नाव लिहायचं आहे. त्याच्या वडिलांचे नाव किंवा त्याचं आडनाव लिहण्याची गरज नाही. मित्रांनो हा टोटका पूर्ण विश्वासाने करा, पूर्ण श्रद्धेने करा.

तुमचे पैसे जो बुडवू इच्छित आहे, तुमचे पैसे जो बुडवणार आहे किंवा बुडवलेले आहेत तो व्यक्ती स्वतः घरी येऊन तुमचे पैसे तुम्हाला परत करेल. फक्त पूर्ण श्रद्धा मात्र असायला हवी. हे काजळ बनवल्यानंतर आपल्या शत्रूचं नाव लिहायचा आहे भूर्जपत्रावर.

या भूर्जपत्राला भोजपत्र असही म्हणतात. तुमच्या आसपास मिळते का पाहा किंवा तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरून त्याची खरेदी करू शकता. भूर्जपत्र किंवा भोजपत्र असे म्हणतात.

जर ते उपलब्ध झाले नाहीच तर एखाद्या साध्या कागदावर ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा कोऱ्या कागदावर सुद्धा आपण आपल्या शत्रूचं नाव लिहु शकता. हे नाव लिहिल्यानंतर हा कागद आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा एखाद्या अशा बंदिस्त जागी ठेवायचा आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता.

लक्षात घ्या जर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये तुमचे पैसे साठवत आहात त्या डब्यांमध्ये हा कागद ठेवायच आहे आणि त्या कागदावरती जिथे नाव लिहलं आहेत तिथे काहीतरी जड वस्तू ठेवून द्या. कोणतीही जड वस्तू जेणेकरून ते नाव खाली दबल जाईल. त्यावरती प्रचंड दाब पडेल अशी वस्तू ठेवा.

तीन-चार दिवस फक्त वाट पहा तुमच्या शत्रू तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत करेल. मित्रांनो हा टोटका करताना त्याची वाच्यता कुठेही करू नका म्हणजे तुम्ही हा तोडगा करणार आहात, करत आहात किंवा केलेला आहे हे कृपया कोणालाही सांगू नका अन्यथा या टोटक्याचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो अवश्य करून पाहा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *