नमस्कार मित्रांनो,
अनेकदा आपल्या वास्तूला किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोणाची तरी नजर लागते किंवा कधी कधी कोणीतरी ज्याला आपली प्रगती आपल सुख पाहवत नाही. त्या व्यक्ती आपल्यावर काहीतरी नकारात्मक शक्ती पाठवतात. मित्रानो अशा वेळी आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होतात. अनेक प्रकारचे नुकसान होते. कारण ही जी निगेटिव्ह एनर्जी असते, ती कळत नकळत आपल्या पर्यंत आलेली असते किंवा आपल्या पर्यंत मुद्दाम पाठवलेली असते.
याला आपण निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह वायब्रेशन असे नाव देऊया. त्यामुळे घरात कलह निर्माण होतात. क्लेश निर्माण होतात. चालू कामे बंद पडतात. व्यवसाय उद्योग धंदा जे काही पैसा कमावण्याचे साधन आहे ही कामे ठप्प होतात. अनेकदा लोक वारंवार आजारी पडून रोगी बनतात. पैसा टिकत नाही. अशा ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहणं पसंद करत नाही. आनंद नावालाही शिल्लक राहत नाही.
अशा वेळी नक्की आपल्याला आपल्या घराला नजर तर लागलेली नाही ना? हे ओळखण्यासाठी तंत्र शास्त्रात काही प्रयोग सांगितलें आहेत. बऱ्याचदा हे प्रयोग असफल ठरतात. जर आपण पूर्ण नियमानुसार, विधिपूर्वक हे प्रयोग करून पाहिले तर आपल्या जीवनात या समस्या आहेत कदाचित बऱ्याच अंशी मदत मिळू शकते. हे तांत्रिक प्रयोग तर कराच त्यासोबत आपल्या कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची त्यांची नित्य नियमाने पुजा करत चला.
खूप मोठ्या प्रमाणात या नजर दोषांपासून, वाईट शक्ती, बाधा आहेत त्यापासून मुक्ती मिळते. प्रयोग केल्यानंतर एखाद्या व्यक्ती बद्दल तुमचं मत दूषित होऊ शकते. लक्षात घ्या जी लक्षण तुमच्या घरात आहेत. लोक एकमेकांशी भांडतात. कलह क्लेश आहे. कामधंदा ठप्प पडला आहे. घरात आजारपण आहे. पैसा टिकत नाही. घरात आनंदी कोणीच राहत नाही. तर ही लक्षणे राहू दोष केतू दोष आणि शनी दोष यांची सुद्धा हीच लक्षण आहेत.
आणि म्हणून बऱ्याचदा आपल्या घराला कुंव आपल्या घरातील लोकांना नजर लागलेली नसते. किंवा कोणी काही केलेलं ही नसतं. फक्त हे दोष उत्पन्न झालेले असतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये विशेष करून जी व्यक्ती पैसे कमावते. जी कर्ती व्यक्ती आहे स्त्री किंवा पुरुष असेल तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत जर दोष उत्पन्न झाले तर काम बंद पडतात. अशा घरात लक्ष्मी टिकत नाही.
आणि जी व्यक्ती वारंवार आजारी पडते अशा व्यक्तीची कुंडली जोटिषणाना दाखवून काही राहू शनी दोष नाहीत हे एकदा पडताळून घ्या. कधी कधी आपण उगाचच नजर दोष किंवा बाधा या गोष्टींच्या भानगडीत पडत जाऊ नका. मात्र कुंडली दाखवून सुद्धा जर हे दोष कायम असतील, तुम्ही कुंडली दाखवली कुंडलीत जर सर्व ग्रह शुभ फळ देत असतील मात्र घरात वातावरण वाईट आहे.
तर अशा वेळी छोटासा तुरटी चा तुकडा साधारणतः दीड ते दोन इंच इतका, याला हिंदी मध्ये फिटकरी म्हणतो. मराठीत तुरटी असे म्हणतात. छोटासा तुरटी चा तुकडा घ्यायचा आहे. आपल्या घरात जितके सदस्य आहेत अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्द पर्यंत, स्त्रियां पासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सात वेळा वारायच आहे.
घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याच्या उलट्या दिशेने वारायचा आहे हा वारत असताना कुठलाही मंत्र म्हणायचा नाही आहे. काही विचार करायचा नाही आहे. फक्त वारायाचा आहे. सोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर उभ राहून तिथेही आपल्या वास्तूची नजर उतरवायची आहे. या तुरटी ने, तसेच घरात काही साहित्य बंद पडलेले आहे. चांगल्या अवस्थेत होत.
<
उदा. वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल अचानक काही बिघाड झाला असेल तर अशा बाधा इलेक्ट्रॉनिक किंवा इतर सामना वर अवलंबता येतात. त्याही वस्तूची आपण नजर उतरवू शकता. दुकान असेल तर दुकानाची सुद्धा नजर उतरवू शकता. अशा प्रकारे नजर उतरल्यानंतर हा जो फितकरीचा तुकडा आहे. तो अग्नी मध्ये टाकायचा आहे. जळायचा आहे. यासाठी कोळशाचा वापर करू शकतो.
किंवा गोवरी असते अनेकजण शेण्या असे म्हणतात. गाईच्या किंवा म्हैशीच्या शेणा पासून गोवरी तयार केली जाते. कोणत्याही प्रकारे ही फिटकरी जाळायची आहे. जळल्यानंतर थोड्या वेळाने ही फिटकरी फुगू लागेल. आणि तिला विशिष्ट प्रकारचा आकार येईल. हा आकार आल्यानंतर कदाचित तुम्हाला त्या आकृती मध्ये त्यात काही न पाहता ती फिटकरी थंड झाल्यानंतर ती कोणत्याही रस्त्यावर मांडा आणि मांडल्यानंतर चपलने किंवा बुटने आपण त्या फिटकरी वर जोरजोरात मारायचे आहे.
ज्या व्यक्तीने हे सर्व काही केले आहे त्या व्यक्तीला परमेश्वर शिक्षा नक्की देणार आहे. फिटकरी थंड झाल्यानंतर ती रस्त्यावर ठेवून चपल किंवा बुटणे त्यावर मारायचे आहे अगदी ती प्रतिमा, आकृती फुटत नाही तोपर्यंत. जर ही फुटलीच नाही तर लक्षात घ्या कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. आणि ती फुटली तर कोणाचा तरी नजर दोष होता कोणाचीतरी नजर लागलेली होती.
ज्या वेळी ही आकृती फुटलेली आहे त्यावेळी हा नजर दोष संपुष्टात आलेला आहे. वारंवार जर नजर लागत आहे तर प्रत्येक आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी हा उपाय रिपीट करू शकता. मात्र राहू, केतू, शनी दोष असू शकतात. त्यांचीही लक्षण अशीच आहेत. जरी कोणी काही करत असेल तर त्या व्यक्तीला मोठ्या मनाने क्षमा करा.
अशा अनेक तंत्र विद्येचा वापर करत असताना सद्सद्विवेक बुध्दी चा वापर करा. हे करत असताना खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. कोणत्याही व्यक्तीवर विनाकारण संशय घेवू नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.