नमस्कार मित्रांनो,
मित्रानो जेव्हा ग्रहनक्षत्राची साथ मिळते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा मानवीय जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
कोणत्याही कामात यश प्राप्ती साठी ग्रहनक्षत्राची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा यश प्राप्तीला वेळ लागत नाही. दिनांक 23 जुलै पासून अशाच काहीशा सकारात्मक काळाची सुरवात तूळ राशीच्या जीवनात होणार आहे.
यांच्या नशिबाला आता कलाटणी प्राप्त होणार असून आपले भाग्य उदयास येणार आहे. आपल्या जीवनातील अशुभ काळ आता समाप्त होणार आहे. मित्रानो दिनांक 23 जुलै रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशीपरिवर्तन करणार आहेत.
मंगळ हे साहस, ऊर्जा, भूमी, शक्ती, शौर्य आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार दिनांक 23 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. शुक्र या आधीच सिंह राशीत विराजमान आहेत.
शुक्र आणि मंगळ हे एकाच राशीत राहणार असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. त्यातल्या त्यात या दिवशी शयनी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून अनेक दिवसानंतर असा दुर्मिळ योग जमून येत आहे.
या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे नशीब चमकणार आहे. नशिबाची भरपूर साथ आपल्याला या काळात लाभणार आहे. मंगळाचे होणारे हे राशीपरिवर्तन तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात आपली आर्थिक बाजू मजबून बनणार आहे.
जीवनात मान सन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे चालून खूप मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ ठरणार आहे.
जीवनात सुख समृद्धी मध्ये वाढ होणार असून कुटुंबातील सदस्यांशी आपले जाते मजबूत बनेल. करियर मध्ये सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. नवीन सुरु केलेले उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहतील. तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग बनत आहेत. पण प्रेम जीवनात काही चढउतार पहावयास मिळू शकतात.
योजलेल्या योजना वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. या काळात वाद विवादापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक असून रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या मनाला लागेल असे बोलू नका.
कोणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे सावध राहून निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे.
धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली आपली कामे या काळात पुन्हा सुरु होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत.
मित्रांनो तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्या साठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.