तोंडाचा वास दोन दिवसात गायब, या चुकांमुळे तोंडाला वास येतो, अत्यंत सोपे घरगुती ३ उपाय.

नमस्कार मित्रांनो,

तोंडाचा वास येऊ नये म्हणून आपल्याला काही घरगुती उपचार करायला पाहिजे. मित्रांनो, अनेक वेळेस आपल्या तोंडाचा वास येत असतो आणि बऱ्याच वेळेस तो वास आपल्याला जाणवतो.

काही व्यक्तीच्या तोंडाचा वास येवढ्या प्रमाणात येतो की आपल्या बरोबर ती व्यक्ती बोलत असताना सुद्धा तो वास जाणवतो. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, जर आपल्या तोंडाला जर बोलताना वास येत असेल तर बरेचसे व्यक्ती आपल्यापासून लांब जातात. आपल्यासोबत बोलण्याचा त्यांना कसलाही इंटरेस्ट राहत नाही.

एका प्रकारे आपल्या परिणाम होत असतो. ह्या कारणाने आपण आपल्या तोंडाची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. मित्रांनो, चला मग पाहूया तोंडाला वास येण्याची कारणे आणि त्यावर उपाय. असे अनेकजण आहेत, आपल्या असतील की ते दररोज ब्रश करत नाहीत.

जनरली असे सांगितले जाते की दिवसातून निदान दोन वेळा तरी ब्रश करणे गरजेचे आहे. परंतु बरेच व्यक्ती दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश करत नाहीत. जर आपण दररोज व्यवस्थित ब्रश केले असता, आपल्या तोंडाचा वास येत नाही. आपण जर व्यवस्थित ब्रश केले नाही तर दांतावर प्लाक म्हणजे पिवळा कलर येतो.

तसेच त्याच्यावर र्बॅक्टरिया जमा होत असतात आणि त्या र्बॅक्टरियामुळे आपल्या तोंडाला वास येतो. त्यानंतर पुढील कारण आहे आपण जे अन्न खातो ते आपल्या दातामध्ये अडकणे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या दातामध्ये खालेले पदार्थ, अन्न अडकते आणि ते बरेचजण एखाद्या धारदार वस्तूने पोखरून काढण्याचा प्रयत्न करतात.

आपल्याला ही चूक अजिबात करायला नाही पाहिजे. जरी आपल्या दातामध्ये काही अडकले असेल तर आपल्याला अगोदर चुळ भरायला पाहिजे. धारदार वस्तुने आपल्याला दातामध्ये पोखरायला नाही पाहिजे. यामुळे आपल्या दांताचे नुकसान होते. तसेच अजून एक कारण आहे दांताना कीड लागणे, दांताना इन्फेक्शन होणे.

मित्रांनो, दांताना कीड लागणे आणि इन्फेक्शन होणे म्हणजे दांतामध्ये बॅक्टरियाची ग्रोथ होत असते. तर या कारणांमुळेसुद्धा आपल्या तोंडाला वास येत असतो. जर आपल्या दांताना कीड लागली असेल आणि इन्फेक्शन झाले असेल तर यावर कोणताही घरगुती उपाय करू नये. प्रथम डेंटिस्टकडे जाणे.

आपणास डेंटिस्टकडे जाऊनच दांताची कीड भरून घेणे गरजेचे आहे. कारण घरगुती उपायाने जी दांताची झीज झाली आहे ती कधीच भरून येत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला कळेल दांताना किड लागलेली असेल तर सर्वात प्रथम डेंटिस्टकडे जाऊन व्यवस्थित ट्रिटमेंट घेणे गरजेचे आहे.

<
तसेच पुढचे कारण आहे व्यवस्थित अन्न पचन न होणे. तोंडाचा वास आणि अन्न पचन यांचा भरपूर प्रमाणात संबंध आहे. ज्या व्यक्तींना समस्या आहे, बद्धकोष्टतेची समस्या म्हणजे पोट साफ न होणे अशा व्यक्तीच्यासुद्धा तोंडाचा वास येत असतो. म्हणून आपले पचन व्यवस्थित होते की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काहीवेळा विशिष्ट पदार्थ खाल्याने जसे की कांदा, यांच्या सेवनाने आपल्या तोंडाला वास येत असतो. तो वास आपल्यालादेखील जाणवतो आणि आपल्याबरोबर बोलत असलेल्या व्यक्तीलासुद्धा वास येतो. येवढ्या प्रमाणात या पदार्थाचा वास उग्र असतो. पुढील कारण आहे. आपले तोंड नेहमी कोरडे पडणे. तोंड का कोरडे पडते.

सर्वात पहिले कारण व्यवस्थित पाणी न पिणे. दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे जर पाणी पित नसाल तर या कारणांमुळेसुद्धा आपले तोंड कोरडे पडत असते. तसेच काही प्रकारचे मेडीकेशनस आहेत. जर काही गोळ्या घेत असाल तर या गोळ्याच्या साईड इफेक्ट्समुळे तोंड कोरडे पडण्याची शक्यता असते.

जर यामुळे तोंड कोरडे पडत असेल तर जास्तीजास्त प्रमाणात पाणी पिण्याचे गरजेच आहे. तसेच काही आजारामुळे जसे की मधुमेह या पेशंटच्यादेखील तोंडाला वास येत असतो. कारण तोंड कोरडे पडते. मित्रांनो, अशी अनेक कारणे आहेत आता याच्यावर उपाय काय आहेत तर सर्वात प्रथम तोंडाची योग्य स्वच्छता ठेवायची आहे.

कोणत्याही परिस्थितीत आपल्याला दिवसातून निदान दोन वेळा ब्रश करायचे आहे. ब्रश करताना खूप दांताना घासायचे नसते. यामुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी होते दात स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यानंतर जेवल्यानंतर माऊथवॉश वापरायचा आहे. आपल्याला सहज उपलब्ध असतो. या माऊथवॉशने गुळण्या करायला पाहिजे.

हा जर उपाय केला तर तुमच्या तोंडाचा वास पूर्णपणे कमी होऊन जाईल. घरगुती उपाय करायचा असेल तर एक ग्लास पूर्ण पाणी घ्या त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि त्या पाण्याने गुळण्या करा. गुळण्या करू शकता किंवा ते पाणी तुम्ही पिऊदेखील शकता. आणि ते पाणी तुम्ही तोंडामध्ये फिरवू शकता आणि मग गिळू शकता त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही.

यामुळे तोंडाचा वास एक ते दोन दिवसात कमी होईल. हा अगदी साधा व सोपा उपाय आहे. त्यानंतर आहे दालचिनी. दालचिनीची पावडर एक ग्लास गरम पाण्यात मिक्स करून उकळून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर गाळून ते पाणी प्यायचे आहे. ह्या उपयानेदेखील तोंडाची दुर्गंधी जाण्यास मदत होते. त्यानंतर आहे तुळशीची पाने ही अत्यंत फायदेशीर आहे.

सकाळी उपाशीपोटी चार ते पाच तुळशीची पाने खावीत. मित्रांनो, हा जर उपाय साधारपणे आठवडाभर केला तर तुमच्या तोंडाला वास येणार नाही. तर असे काही साधेसोपे घरगुती उपाय नक्की करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *