नमस्कार मित्रांनो,
मानवी जीवनात मिठाला अत्यंत महत्व आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. अन्नात मीठ हे पाहिजेच. अगदी त्याच प्रकारे प्राचीन काळापासून मिठाचा वापर करून अनेक प्रकारचे तोटके केले जातात.
मानवी जीवन सुखी बनावे यासाठी मिठाचा वापर करुन हे उपाय केले जातात. जर कोणी काही केलेलं असेल, कोणाची आपल्यावर वाईट नजर असेल, कोणाची बाधा असेल, घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा प्रभाव कमी होतो.
आपल्या वास्तू मध्ये काही दोष असतील किंवा काही अदृश्य स्वरूपात वाईट शक्तींचा वास असेल, आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
आपल्या घरात पैसा येत नसेल, घरात सतत वाद होत असतील, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेले मिठाचे काही उपाय आपण करू शकता.
मित्रांनो आज आपण हे सर्व तोटके, उपाय कसे करायचे हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
भारतात प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की, मीठ हे नकारात्मक गोष्टींना स्वतः मध्ये अवशोषित करत. म्हणजेच शोषून घेते.
आपल्या आसपास जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, कोणाची बाधा असेल, कोणाची वाईट नजर असेल, किंवा काही अदृश्य शक्ती असतात ज्या आपल्याला त्रास देतात, तर याच सर्व वाईट शक्तींना शोषुन घेण्याची क्षमता मिठामध्ये असते.
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, महिलांनी आपल्या स्वयंपाक घरातील मीठ हे नेहमी झाकून ठेवावे. उघड्यावर असलेलं मीठ हे दूषित बनण्याची शक्यता असते.
मित्रांनो मीठ ठेवण्यासाठी प्लास्टिक चा डबा किंवा भांडी अजिबात वापरू नका. मीठ हे नेहमी काचेच्या भांड्यात, बरणी मध्ये झाकून ठेवावे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्लास्टिक च्या भांड्यात ठेवलेलं मीठ हे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम करतं असं मानलेले आहे.
आपल्याला आम्ही अगोदर सांगितलेला उपाय आठवत असेलच की घरातील लादी, फरशी पुसत असताना त्या पाण्यात एक मूठभर मोठं मीठ, खडे मीठ टाकावे. आणि त्या पाण्याने फरशी पुसावी.
असं केल्याने घरात असणारी नकारात्मक ऊर्जा, घरात असणारे वास्तू दोष हे मोठ्या प्रमाणात कमी होतात. मित्रांनो पण हा उपाय आपण गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता.
हा अत्यंत सोपा उपाय आहे पण याचे फायदे भयंकर मोठे होतात. एकदा अवश्य करून पहा.
अनेकदा आपल्या जवळच्या परिसरात, जवळ अनेक प्रकारच्या शक्ती अस्तित्वात असतात. वाईट शक्ती, अदृश्य शक्ती, नकारात्मक ऊर्जा असते. या सर्वाचा परिणाम हा आपल्यावर होत असतो. यामुळे अनेक लोक नकारात्मक भावनेने वेढले जातात.
या सर्वामुळे वास्तू दोष निर्माण होतो, अशावेळी नेमकं काय होतं हे समजत नाही. घरातील सदस्य एकमेकांशी भांडू लागतात, पती पत्नी मध्ये वाद होतात.
मित्रांनो अशा वेळी, घरावर संकटं येऊ लागली की एक छोटी गोष्ट नक्की करा.
ज्यावेळी आपल्या घरात संकटं येतील अशा वेळी एका काचेच्या वाटी मध्ये, बाऊल मध्ये एक मूठभर मीठ घ्यावं. आणि ही वाटी किंवा बाऊल आपल्या टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये ठेवा.
मित्रांनो आपण एकदा ठेवलेली वाटी किंवा बाऊल हा त्या जागेवरून पुन्हा कधीही हलवू नका. मीठ हे काचेच्या वाटी मधेच ठेवायचं आहे. ती वाटी एकाच जागेवर ठेवा. ती जागा पक्की करा.
या वाटीत ठेवलेलं मीठ हे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. मित्रांनो ज्या प्रमाणे देवघर हे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्त्रोत असतं अगदी तसंच बाथरूम, टॉयलेट आणि अंधारलेल्या जागा या नकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत असतात.
या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. त्यामुळे आपलं काम झालं की टॉयलेट किंवा बाथरूम यांचा दरवाजा बंद करत चला. हे दोन दरवाजे उघडे ठेऊ नयेत. यामुळे घरात वाद वाढतात.
मित्रांनो आपण ठेवलेलं हे वाटीतले मीठ प्रत्येक महिन्याला बदलत चला. जुने मीठ असेल ते फ्लश करून टाका. किंवा पाण्यात सोडून द्या. आणि नवीन मूठभर मीठ त्या वाटीत किंवा काचेच्या बाऊल मध्ये घ्या. आणि ती काचेची वाटी किंवा बाऊल पुन्हा त्या जागी ठेवा.
स्वयंपाक घरात काम करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट. आपण स्वयंपाकात जे मीठ वापरतो त्या मिठाच्या बरणी मध्ये 3 ते 4 लवंगा ठेवाव्यात. या लवंगा तुटलेल्या, फूट लेल्या असू नयेत. असं केल्याने ते मीठ दूषित होणार नाही.
मीठ नकारात्मक ऊर्जा शोषुन घेत, त्यामुळे असं दूषित मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मीठ दूषित होऊ नये म्हणून त्याच्यात लवंगा टाकाव्यात.
मित्रांनो उपाय सोपे आहेत नक्की करून पहा. आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा निघून जातील. वाद विवाद, भांडण होणार नाहीत, घरात आनंदाची निर्मिती होईल. पैसा यायला लागेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.