नमस्कार मित्रानो,
शौचालय म्हणजेच टॉयलेट. हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र आहे. या टॉयलेट आणि बाथरूम मधून सातत्याने निगेटिव्ह एनर्जी आपल्या संपूर्ण घरात पसरत असते. लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही टॉयलेट चा बाथरूम चा वापर कराल. तेव्हा त्याचा दरवाजा तात्काळ बंद करत चला. बाथरूम किंवा टॉयलेट चा दरवाजा विनाकारण उघडा ठेवू नका. त्यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते.
आज आपण या टॉयलेट आणि बाथरूम बद्दल महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. या दोन ठिकाण मधून नकारात्मक ऊर्जा का निर्माण होते. सर्व प्रकारची घाण आपण त्या ठिकाणी विसर्जित करतो. अनेक जणांच्या बेडरूम ला बाथरूम किंवा टॉयलेट attach असते त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी किंवा काही वर्षांपूर्वी असे व्हायचं की घरापासून दूर मलमुत्र विसर्जित करत असत.
मात्र आता आपल्या घरातच हे टॉयलेट आणि बाथरूम निर्माण झालेले आहेत. मित्रानो वास्तू शास्त्रानुसार या दोन्ही ठिकाणी बाथरूम किंवा टॉयलेट चा रंग चुकूनही पिवळा किंवा हिरवा ठेवू नका. पिवळा हिरवा हे रंग धन दायक आहेत. धन प्राप्तीचे रंग आहेत. ज्या घरात टॉयलेटला किंवा बाथरूमला पिवळा किंवा हिरवा रंग असतो त्या घरात पैसा प्राप्तीचे मार्ग खुंटतात. पैसा येणे बंद होते. आणि आलेला पैसा विनाकारण वायफळ गोष्टींवर खर्च होऊ लागतो.
पैसा टिकत नाही. टॉयलेट आणि बाथरूम साठी व्हाइट कलर किंवा लाईट कलर आहेत. ते अती उत्तम आहेत. त्यातल्या त्यात जर डार्क निळा रंग, गडद निळा रंग दिला तर अत्यंत शुभ मानला जातो. हे असं तर हा जो गडद निळा रंग आहे राहूच प्रतिनिधीत्व करतो. या दोन्ही जागा राहुचेच प्रतिनिधीत्व करणारे असतात. आणि म्हणूनच गडद निळा रंग अत्यंत शुभ आहे.
सोबतच जी तपकिरी रंग आहे. डार्क ब्राऊन गडद तपकिरी रंग हासुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. अनेक जणांच्या बाथरूम किंवा टॉयलेट ला गुलाबी रंग दिलेला असतो. तर गुलाबी रंग आपण देऊ शकता पण या ठिकाणी कपडे धुऊ नये. असे जोतिष शास्त्रात नमूद आहे. गुलाबी रंग तुम्ही देऊ शकता कारण तो फिकट असा रंग आहे.
शक्यतो तुम्ही नवविवाहित असाल तर पती पत्नी मधील प्रेम वाढीस लागण्यासाठी हा रंग अती उत्तम आहे. अशा बाथरूम मध्ये कपडे धुऊ नयेत. त्यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. अनेकजण काळा रंग देतात. काळा रंग चुकूनही देऊ नका. अन्यथा घरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम आपल्याला दिसून येईल. आरोग्य खालावतो सतत आजारपण अशा घरात आपल्याला उद्भावताना दिसून येईल.
बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये कोणत्याही परिस्थितीत डाग पडणार नाहीत. ज्या भिंती असतील किंवा टाईलस आहेत, दरवाजा आहे तर ते डाग विरहित असावेत. खूप मोठ्या प्रमाणात डाग असतील तर राहूचा प्रकोप होतो. राहू चा दूषप्रभव होतो आणि अशा घरात शक्यतो ज्या वयस्कर व्यक्ती आहेत. ज्या ज्येष्ठ वयाने मोठ्या आहेत. अशा व्यक्तींना अकस्मात एखादा रोग एखादा आजार ग्रासित करतो.
एखाद्या मोठ्या आजाराने अशा व्यक्ती त्रस्त होतात. या ठिकाणची वरचेवर आपण साफसफाई करायला हवी. राहूची जी दिशा आहे ती नैऋत्य आहे. नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि पश्चिम या मधील दिशा आपल्या टॉयलेट किंवा बाथरूम मधून दुर्गंध येत असेल आपण साफ सफाई करत नसाल तर कुंडलीतील बुध ग्रह खराब होतो. याचा सर्वात मोठा प्रभाव हा घरातील महिला व लहान मुलांवर होतो.
<
शक्यतो ज्या विवाहित महिला आहेत, तरुण मुली आहेत त्यांना म्हणजे स्त्रियांच्या ज्या समस्या असतात. स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित ज्या समस्या उद्भवतात. त्यासाठी दुर्गंध पसरणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. एक छोटासा नियम तुम्ही करा बाथरूम किंवा टॉयलेट वापरण्यापूर्वी ते फ्लश करावं आणि वापरून झाल्यानंतर सुद्धा फ्लश करावं. फ्लश करायला विसरू नका.
दुर्गंध पसरू नये म्हणून चांगली गोष्ट टॉयलेट किंवा बाथरूम मध्ये काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीत फिटकरी चा तुकडा ठेवा. फिटकरी म्हणजे तुरटी चा खडा ठेवा. शक्य असल्यास दररोज हा तुकडा धुऊन काढा. दुर्गंध किंवा नकारात्मकता जी आहे ते शोषून घेण्याचे काम तुरटी करते खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ही त्या ठिकाणी शोषली जाते.
ज्यांना दररोज करणे शक्य नाही. त्यांनी आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. त्यासोबत एअरपुरी फायर म्हणजे ओडोनील सारखे हवा शुद्ध करतात. दुर्गंध पसरू देत नाहीत. याचाही वापर करू शकता. त्याहूनही उत्तम उपाय म्हणजे बाजारात जे खडे मीठ मिळते. म्हणजे मोठे मीठ वाटी मध्ये ठेवू शकता. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून बदला. वाहत्या पाण्यात फेकून द्या.
त्याने देखील मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आहे शोषली जाते. आणि फ्लश केल्यावर आपल्या घरातून निघून जाते. अत्यंत प्रभावशाली उपाय जो आता पर्यंत आपण ऐकलेला नसेल. काही वृक्षांची पाने आहेत जी आपण या बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये वापरली किंवा जाळली तर ही पाने जाळल्याने सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मकता नाश होतो. तर ही पाने आहेत निलगिरीची पाने.
नीलीगिरीचे झाड माहीत असेल जे उंचच उंच वाढते. निलगिरी ची वाळलेली पाने घ्यायची आहेत. ओली नाही. आणि आठवड्यातून एक किंवा दोन दिवस तुम्हाला जसे शक्य असेल तर एक तीन चार पाने घेऊनती जाळा. जाळण्यासाठी कापराचा वापर करू शकता. तर ही पाने आपल्या बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये जाळा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या, संकट या सर्व राहू ग्रहाशी संबंधित आहेत. ते बऱ्याच अंशी कमी होतात. नक्की करून बघा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.