नमस्कार मित्रांनो,
आपण पाहिले असेल अनेक त्यांच्या पायात काळा धागा बांधतात. यापाठीमागे नेमके काय कारण असावे? अनेकजण फॅशन म्हणून पायाला काळा धागा बांधणे पसंद करतात तर काहीजण गळ्यात तर काही जण हातात बांधतात. काही जण धार्मिक प्रवृत्तीने हा धागा बांधत असतात.
मित्रांनो अशा प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोण कोणते फायदे असतात? स्त्रियांनी तो धागा कोणत्या पायात बांधावा? पुरुषांनी तो धागा कोणत्या पायात बांधावा? या पाठीमागे कोणती वैज्ञानिक कारण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपलं शरीर हे पंचमहा भूतांपासून बनलेले आहे. ज्यांना आपण पंचतत्त्व असेही म्हणतो. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंच तत्त्वांपासून आपले शरीर निर्माण झालेले आहे.
आपल्या शरीराला संचलित करण्याचं काम, शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम हि 5 पंच महाभूते करत असतात. मात्र एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते किंवा एखाद्या व्यक्तीची आपल्याला नजर लागते त्यावेळी मात्र या पंच महाभूतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये अडथळे येतात.
त्यामुळे आपले शरीर व्यवस्थित कार्य करत नाही आपण आजारी पडतो, आपलं होणार काम अडवलं जात. कामामध्ये अडथळे येऊ लागतात, यश प्राप्ती होत नाही. खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही. घरात पैशाची तंगी निर्माण होते. आणि यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्वाची मदत करतो.
मित्रांनो जर तुम्ही गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर नजर लागण्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकत. या गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखादे लॉकेट सुद्धा लावू शकता. त्यामध्ये कोणत्याही देवी देवतांची तस्वीर तुम्ही लावू शकता.
अगदी प्राचीन काळापासू काळ्या रंगाचा वापर हा नजरेपासून वाचवण्यासाठी, दृष्ट लागू नये म्हणून करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहिले असेल छोट्या मुलांना कपाळावर असेल, गालावर असेल किंवा पायाच्या तळव्याच्या मध्यभागी असेल तिथे काळा टिळा लावला जातो.
हाच टिळा लहान मुलांना नजर लागण्यापासून संरक्षण करतो. लहान मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना टिळा लावणे खूप महत्वाचं असत. जर तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या नाभी ज्यावेळी सरकते तेव्हा पोट दुखी निर्माण होते.
जर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांना काळा धागा बांधलात तर तुमचा पोट दुखीचा त्रास सुद्धा या छोट्या उपायाने बंद होतो. हा धागा कोणी बांधावा आणि कसा बांधावा? स्त्रियांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पायात काळा धागा नक्की बांधावा.
असे केल्याने त्यांचे नजर लागण्यापासून संरक्षण तर होतच मात्र त्याच बरोबरीने अनेक फायदे सुद्धा होतात. जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील. या पाय दुखी पासून तुम्हाला सुटका हवी असेल तर महिलांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पायात हा काळा धागा बांधावा.
पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो वास्तू आणि ज्योतिष शास्त्र असं मानत कि मंगळवारचा दिवस पायामध्ये काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो.
मंगळवारीच का? कारण मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीचा वार मानला जातो. मित्रांनो धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासत नाही.
पुरुषांनी उजव्या तर महिलांनी डाव्या पायात धागा धारण करावा. लक्षात असुद्या मंगळवारी हा धागा तुम्हाला पायात घालायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्तीत वाढ होते. पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात. कोणत्याही कारणाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो.
मित्रांनो अजून एक फायदा असा कि ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना वारंवार शनी दोष निर्माण होतो अशा लोकांसाठी सुद्धा हा काळा धागा अत्यंत महत्वाचं काम करतो. प्रत्येक शनिदोषापासून वाचवण्याचं काम हा काळा दोरा करत असतो.
तर मित्रांनो नजर लागण्यापासून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं तसेच आपले शरीर जे पंच महाभूतांपासून बनले आहे या शरीराचं संचलन व्यवस्थित चालावं यासाठी प्रत्येकाने काळा धागा पायामध्ये किंवा गळ्यामध्ये नक्की धारण करावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.