नमस्कार मित्रांनो,
मंगळवारी रात्री हा एक छोटासा टोटका अवश्य करा. मंगळवारचा दिवस हा तांत्रि क उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो.
मित्रांनो आपल्या जीवनात खूप गरिबी असेल, दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो टिकत नसेल, घरी वारंवार आजा रपण येत असेल, वैद्य कीय मदत घेऊन सुद्धा आजा रपण हटत नसेल तर आपल्या जीवनात सुख, समृद्धी परत आणण्यासाठी आपण मंगळवारी रात्री, अगदी कोणत्याही मंगळवारी रात्री आजचा हा छोटासा उपाय अवश्य करा.
आजचा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे. आपण जी लवंग घेणार आहोत ती पूर्ण असावी, अखंड असावी, तुटलेली, फुटलेली नसावी. आणि या लवंग ला फुल सुद्धा असलं पाहिजे.
मित्रांनो तंत्र शास्त्रात लवंगचे खूप मोठे महत्व आहे. लवंग असेल किंवा विलायची असेल हे दोन्ही पदार्थ तंत्र शास्त्रात खूप मोठं महत्व बाळगतात.
मंगळवारी रात्री म्हणजे सुर्यास्ता नंतर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. आपण हा उपाय आपल्या घरातच करणार आहोत. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असलात तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
मित्रांनो यासाठी आपण एखाद्या पाटावर रामभक्त हनुमानाची तसबीर स्थापित करावी. तसबीर असेल किंवा मूर्ती असेल ती आपण एका पाटावर ठेवावी.
तसबीर स्थापित केल्यानंतर हनुमानांसमोर तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. दिव्यातील तेल हे मोहरीचे असेल तर अतिउत्तम. पण जर मोहरीचे तेल नसेल तर काहीही हरकत नाही. पण तांत्रि क उपाय आहे त्यामुळे हा सल्ला असेल की आपण मोहरीच्या तेलाचा उपयोग करावा.
मारूतीरायांपुढे मोहरीच्या तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या या दिव्यात आपण जी वात वापरणार आहोत ती सफेद न घेता लाल रंगाची वात आपल्याला घ्यायची आहे.
मित्रांनो तांत्रिक प्रयोग करताना नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. अनेक जण उपाय करतात पण म्हणतात फायदा झाला नाही. उपाय करताना झालेल्या छोट्या मोठ्या चूका सुद्धा आपल्याला त्या उपायांचा फायदा होऊ देत नाहीत.
त्यामुळे लक्षात ठेवा जे नियम आहेत ते पाळा आणि जसा उपाय सांगितला आहे तसाच करा.
आता हा लाल रंगाची वात आपल्याला बाजारात मिळून जाईल, पण जर मिळाली नाही तर एखाद्या छोट्या वाटीत कुंकू आणि पाणी एकत्र करा. आणि त्यात आपली पांढरी वात भिजत ठेवा. थोड्या वेळाने सुकवुन तुम्ही लाल झालेली वात वापरू शकता.
तर मित्रांनो लाल वात वापरून मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमंता पुढे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे.
त्यानंतर आपण घेतलेली जी लवंग आहे ती आपल्याला हनुमानांसमोर, त्यांच्या चरणी ठेवायची आहे. सोबत आपण हनुमानाच्या पूजेत गूळ, फुटाणे वापरू शकता. लाल रंगाची फुले हनुमंताला अतिशय प्रिय असतात. आपण त्यांना लाल रंगाची फुले सुद्धा वाहू शकता.
हनुमंताला जितकं प्रसन्न करता येईल तितकं प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा.
पूजे नंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती म्हणजे मंत्राचा जप. मारुतीरायांच्या चरणी ठेवलेल्या लवंग ला स्पर्श न करता आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे.
तो मंत्र आहे
ओम नमो हनुमतेय भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा.
मित्रांनो मंत्राचा उच्चार स्पष्ट करा. या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे.
मित्रांनो असं म्हटलं जातं की हनुमान हे अमर आहेत, आणि आजही त्यांचं या पृथ्वी तलावर अस्तित्व आहे. अगदी कमी प्रयत्नात प्रसन्न होणारी देवता म्हणजे हनुमान आहेत. त्यामुळे आपल्याला या मंत्राचा जप हा 108 वेळा करायचा आहे.
मित्रांनो हनुमानाच्या समोर ठेवलेल्या, त्यांच्या चरणी ठेवलेल्या लवंग मध्ये आपण केलेल्या मंत्राच्या जप मुळे अतोनात ताकत निर्माण होते. विलक्षण अशा प्रकारची शक्ती लवंग मध्ये उत्पन्न होते. एक प्रकारची दैवी शक्ती लवंग मध्ये अवतरते.
वर दिलेल्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा चा जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा पाठ करायचा आहे.
आपण 11 वेळा पाठ करावा. पण जर शक्य नसेल तर फक्त एक वेळा केलात तरी काही हरकत नाही.
हनुमान चालीसा चा पाठ करून झाल्यानंतर जय श्री राम नामाचा जप करावा. जय श्री राम या नामाचा जप आपण 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा करू शकता. जितक्या वेळा तुम्हाला जप करणं शक्य होईल तितक्या वेळा जप करा.
त्यानंतर ही लवंग आपण हातात घ्यायची आहे. आणि आपल्या जीवनात असलेल्या समस्या मारुती रायासमोर बोलून दाखवायच्या आहेत.
ही गोष्ट लक्षपूर्वक वाचा. आपल्याला आपल्या समस्या बोलायच्या आहेत. काहीजण पूर्ण न वाचता आपल्या इच्छा बोलून दाखवतात. आपण बोललेल्या समस्या या लवंगे बरोबर बाहेर जाणार आहेत. आपल्या जीवनातून दूर जाणार आहेत.
उदाहरणार्थ माझ्या जीवनात पैशाची तंगी आहे, माझ्या जीवनात आजा रपण आहे. त्या समस्या दूर होऊदेत. अशा समस्या आपण लवंगे पुढे आणि हनुमंता समोर बोलायच्या आहेत.
इच्छा व्यक्त करू नका. माझ्या जीवनात भरपूर पैसा येऊदे, मला चांगले आरोग्य लाभू दे अशा इच्छा व्यक्त करू नका.
समस्या बोलून दाखवत असताना लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातात घट्ट पकडायची आहे. समस्या बोलून झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या छतावर जा. छत नसेल तर समोर अंगणात जा.
आणि दक्षिण दिशेकडे आपल्याला ही लवंग फेकून द्यायची आहे. जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्या. फेकल्यानंतर खाली पडलेल्या लवंग कडे न पाहता आपण सरळ आपल्या घरी या. आणि हात पाय धुवून घ्या.
उपाय करताना सुद्धा आपण स्नान करून उपायाला सुरुवात केली तर मन प्रसन्न राहतं.
लवंग टाकून परत आल्यानंतर हात पाय धुवून या. पुन्हा एकदा मारुती राया समोर नतमस्तक व्हा. आपल्या जीवनात असलेल्या समस्या, अडचणी दूर कराव्यात अशी प्रार्थना करावी.
जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी रात्री आपण हा उपाय करायचा आहे. मारूतीराया तुमच्या सगळ्या अडचणी नक्की दूर करतील.
पण प्रत्येक मंगळवारी करणं शक्य नसेल तर हनुमाना समोर एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करत चला. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर सांगितलेले मंत्राचा जप करावा.
मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा, तुम्हाला खात्री पटली तरच पुन्हा करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.