टक्कल पडलेली माणसं श्रीमंत असतात का?

नमस्कार मित्रांनो,

मनुष्याच्या चेहरा पट्टीवरून शास्त्रज्ञांनी अनेक अंदाज बांधले आहेत. कपाळ मोठं असणं, नाक तरतरीत असणं, गालावर छानसी खळी पडण इत्यादी शुभ लक्षण मानले जातात. पण याउलट इतर काही लक्षणे अशी सुद्धा आहेत जी दुर्दैवी मानली जातात.

पण असा अनुभव प्रत्येक वेळी येईलच असं नाही. लेखक अ. ल. भागवत परम सुखाचे रहस्य या पुस्तकात लिहितात की, टक्कल असलेला माणूस सामान्यतः श्रीमंत असतो असा एक प्रवाद आहे. एका हिपीने श्रीमंत टक्कल्या माणसाकडे पाहून खलवा तो निर्धनो क्वचित् अशी म्हण तयार केली.

या समजुतीत काही अर्थ नाही. अनेक टक्कल्या व्यक्ती दरिद्री अवस्थेत आढळतात. याउलट खूप केस असलेल्या व्यक्ती श्रीमंत सुद्धा असू शकतात. समुद्र शास्त्रानुसार साधारणपणे अनुमान काढले जातात. परंतु ते प्रत्येकाला तंतोतंत लागू होतीलच असे नाही.

प्रत्येकाचे ठेवण वेगळी, प्रत्येकाचे भाग्य वेगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच कर्म वेगळ म्हणूनच तर एकच विचार सगळीकडे समान लागू होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तिपरत्वे समुद्र शास्त्राचे निदान बदलते.

त्यामुळे आपण लोक समजुतींवर अवलंबून न राहता मेहनत करून श्रीमंत होण्यावर भर दिला पाहिजे. थोडक्यात शरीरावरील चिन्हांचा श्रीमंतीचा अर्थाअर्थी संबंध नाही. लक्ष्मी मातेला टक्कल पडलेली बाळ जास्त आवडतात असा कुठेही पुराणात उल्लेख नाही.

एक अनुमान मात्र काढला जाऊ शकतो. एक अनुमान काढले तर मात्र लक्षात येईल की, केसाळ माणसांपेक्षा टक्कल असलेला माणूस जास्त व्यवहार दक्ष, समंजस आणि शांत स्वभावाचा असतो.

बाकी श्रीमंतीचा आणि टकलाचा खरोखरच संबंध असता तर तरूण माणसं म्हणाली असती देवा तुझी संपत्ती नको पण आम्हाला टक्कल पडू दे आणि मित्रांनो श्रीमंती कशावर ठरते आपण कसे दिसतो या गोष्टीवर नाही तर आपण स्वभावाने कसे असतो या गोष्टीवरून श्रीमंती ठरते.

मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती. मित्रांनो समाजात अशा अनेक समजुती असतात या समजुतीबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.