नमस्कार मित्रांनो,
व्यवहारात काही चुकीच्या गोष्टी कळत नकळत घडतात ज्यामुळे तुमचं जीवन विस्कळीत होऊ शकत. पण याची कारणे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा सहज कळत नाहीत, त्यामुळे चुका घडतच राहतात. तसेच या गोष्टींमुळे आपला व्यवहार होऊन देखील समाधानासारखा फायदा मिळत नाही.
मित्रांनो कष्ट करून देखील मोबदला मिळत नाही. अशा वेळी तुम्ही या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून तुमचा धन संचय वाढेल. नेहमी आपल्या खिश्यामध्ये एक नाणे आवश्य ठेवत चला. ते खर्च होणार नाही याची देखील काळजी घ्या. मित्रांनो हा उपाय आपल्या खिश्यातील पैशांना खर्च होऊ देत नाही.
आपण उजव्या व डाव्या दोन्ही हातांनी पैशाची देवाण घेवाण करत असतो. हिंदू धर्म शास्त्रात आपण शिव पार्वती, शिव शक्ती पाहू शकता भगवान शिव शंकराच स्थान, हे नेहमी उजव्या बाजूचे आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते.
मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे सामर्थ्य, सामना करणारी ही बाजू असते. याउलट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्यक्ष शक्ती स्वरूप आहेत ही बाजू नवनिर्मितीची बाजू मानली जाते. याठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य ठिकाणी वापर करू शकलो तर, नवनिर्मिती साध्य करता येते. जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते.
अगदी याच मंत्राचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो. आपण एखाद्या व्यक्तीस पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका. त्या नोटेची घडी करायची आहे. ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या.
मित्रांनो शास्त्र असे मानते की उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत, किंवा या पैशांचा दूरउपयोग होत नाही. आपण पैसे घेताना जी आपली नवनिर्मितीची बाजू आहे, शक्तीची बाजू आहे म्हणजेच डाव्या हाताने पैसे घेत चला.
हे नियम करून पहा नक्कीच तुमच्याजवळ पैसा टिकून राहील. तुमचे पैसे विनाकारण खर्च होणार नाहीत. पैशांची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही. व्यवहारामध्ये स्वतःच्या खिश्यातून कोणत्याही प्रकारचे नाणे पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका.
ज्या ज्या वेळी आपण आपल्या पहिल्या व्यवहारात नाणे खर्च करतो त्या त्या वेळी आपल्या पैशात ऱ्हास नक्की होतो. म्हणजेच आपले पैसे कमी होऊ लागतात. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून पहा.
या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर अंमलात आणल्या तर नक्कीच तुमचे पैसे विनाकारण वाया नाही जाणार. त्यामुळे पैसा टिकून राहील व धन येण्याचे मार्ग देखील सुलभ होतील. असे काही जे उपाय आहेत ते तुम्ही रोजच्या व्यवहारात वापरून पहा. त्याचे नक्कीच चांगले परिणाम भेटतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.