नमस्कार मित्रांनो,
रात्री आपण गाढ झोपेत असताना, जर आपल्या स्वप्नात साप दिसला तर आपण खुप घाबरतो. आणि आपल्याला असे वाटू लागते की हे काही वाईट गोष्टीचे संकेत तर नाही ना?
स्वप्नात साप दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. कधी ते शुभ असतात तर कधी अशुभ. श्रीकृष्णाने सांगितलेले आहे के स्वप्नात आले तर त्याचा काय अर्थ होतो.
चला तर बघूया सापाचे कोणते स्वप्न काय फळ देते ते. जर स्वप्नात आपल्याला साप चावला असे दिसले तर भविष्यात येणाऱ्या संकटांची ही सूचना आहे.
ज्याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही. आता तुम्हाला सत र्क व्हावे लागेल. कारण भविष्यात कोणत्याही रूपात तुमच्यावर खूप मोठे संकट येणार आहे. ते तब्येती च्या स्वरूपात असतील किंवा व्यापारात नुकसान होऊ शकते. किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची असू शकते.
स्वप्नात सापाच्या पिल्लाला बघितले. स्वप्नात सापाच्या पिल्लाला बघण्याचा अर्थ तुमच्यावर येणार्या संकटाची तुम्हाला तुम्हाला चाहूल लागणार आहे. तुमच्यावर येणारे संकट तुम्हाला लवकरच माहित पडेल. एकतर ते तुम्हाला कोणीतरी येऊन सांगेल किंवा इतर प्रकारे तुम्हाला सूचना मिळेल.
स्वप्नात एखाद्या मोठ्या सापाला आपण स्वतः मारणे. जर स्वप्नात तुम्ही एखाद्या मोठ्या सापाला मारले. असे दिसल्यास भविष्यात येणारा तुमचा मृ त्यू टळेल. तुमच्यावर काही धोका असेल तर तो दूर होईल. याचा एक अर्थ असाही होतो की तुमच्या शत्रूवर तुम्ही मात करून तुमचा विजय झाला आहे.
स्वप्नात साप पकडणे. याचा अर्थ खूप चांगला समजला जातो. असे स्वप्न पडल्यास तुम्हाला खूप धनसंपत्ती मिळेल. व तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील.
सापाने तुमच्यावर हल्ला करणे. जर स्वप्नात तुमच्यावर एखाद्या सापाने हल्ला केला असे दिसल्यास याचा अर्थ तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी खूप कठीण आहे.
तुमच्या जीवनात खूप चढ-उतार येतील. व त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे. जर तुम्ही स्वप्नात सापाला तुमच्या सोबत लढताना बघितले तर याचा अर्थ तुमच्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असेल, तरी त्यातून तुम्ही सफलतापूर्वक मार्ग काढाल.
तसेच आपल्या स्थितीत बदल कराल. स्वप्नात साप आणि मुंगूस भांड ताना दिसल्यास तुम्हाला कोर्टकचेरीचे काम मागे पडेल. कोर्टाच्या चकरा माराव्या लागत.
सापाला बिळात जातांना बघणे. सापाला बिळात जाताना बघण्याचा अर्थ, तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. तुम्हाला अजिबात अंदाज नसताना अचानक कुठून तरी धनप्राप्ती होईल.
स्वप्नात सापाचे दात दिसतील. तुम्हाला सापाचे दात दिसल्यास कोणीतरी तुमच्या विश्वासातील व्यक्ती तुम्हाला धोका देईल किंवा धोका देत आहे. या स्वप्नांमुळे तुम्हाला सावध व्हायचे आहे.
जर तुम्ही स्वप्नात महादेवांच्या पिंडीला वेळखा घातलेला पाहणे. तर याचा अर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हा तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळालेला आहे.
तर मित्रांनो हे आहेत या सर्व स्वप्नांचे अर्थ. जे श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितले आहे.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.