नमस्कार मित्रांनो,
आपले स्वामी बोलता काय रे तुला किती धन हवे आहे आणि ते घेऊन तू काय करशील. हैदराबादमध्ये विठ्ठल जमादार हे सात्विकवृत्तीचे गृहस्थ राहत होते.
ते हैदराबाद मधील प्रसिद्ध चंदूलाल यांचे नातू नरेन्द्र बहादुर यांच्याकडे कामाला होती. विठ्ठलरावांची मिळकत अगदी जेमतेम होती. कसेबसे ते आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत चाले होते. एकेदिवशी एक साधू त्यांना भेटतो आणि त्या साधूला आपल्या ह्या कर्म दशेबद्दल विचारतात.
तेव्हा त्या साधूने त्यास सल्ला दिला की, अक्कलकोटमध्ये एक अवतारी विभूती आहे. त्यांच्या मात्र दर्शनाने तुमची प्रारध्य दशा विलीन होऊन तुमचे खूप छान दिवस सुरू होतील तुमचे कल्याण होईल. हे ऐकताच विठ्ठलराव यांच्या हृदयात एक आशेचा किरण जागृत झाला. आणि ते अतिशय विश्वासाने श्रद्धेने अक्कलकोटमध्ये आले. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारीत उभे राहिले.
असंख्य भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या स्वामी माऊलींसमोर हार श्रीफळ वाहून हात जोडून उभे राहिले. इतक्यात स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले काय रे तुला किती धन हवे आहे आणि ते घेऊन तू काय करशील स्वामींची ही वाणी होताच श्री विठ्ठलराव अतिशय नम्रपणे बोलले.
महाराज आपल्या कृपेने जितके मिळेल त्याचा चिरकाल हेतूने दानधर्म करणे आणि त्यानंतर त्यांनी अतिशय आनंदाने स्वामींचे पूजन केले आणि हैदराबादमध्ये परत आले.
हैदराबादमध्ये आल्यानंतर मालक नरेंद्र बहादूर यास स्वामींचा प्रसाद दिला आणि स्वामींनी दिलेले आ शी र्वा द सुद्धा सांगितला. नरेंद्र बहादूर यास विठ्ठल जमादार यांचे वागणे खूपच भावले आणि त्यांनी त्यास अजून काही महत्त्वाची कामे दिली
आणि विठ्ठलरावांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे ती काम तडीस नेली. स्वामी कृपा झाली. त्यांना लक्षावधी द्रव्यांची प्राप्ती झाली. पुढे ते स्वामींना दिलेल्या वचनाप्रमाणे यथोचित दानधर्म सुद्धा करत.
आणि स्वामी आज्ञाप्रमाणे आचरण केल्याने त्यांचा भरपूर नावलौकिक झाला. पुढे त्यास जहागिरी आणि सरकारी वेतन सुद्धा प्राप्त झाले. ते आता रा रा विठ्ठलराव जमादार म्हणून प्रसिद्ध आहेत. बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजचे स्वामी वाणीतून स्वामी आपणास खूप छान बोध देत आहेत. आपली स्वामी कृपेचा सागर आहे ते आपल्याला सतत देत आहेत. परंतु हे सर्व घेत असताना आपणास आ ध्या त्मि क जीवन आणि प्रापंचिक जीवन यात समतोल साधायचा आहे. प्रपंच म्हटला की, पैसा हा गरजेचा आहे. परंतु त्या बद्दलचे अज्ञान व आसक्ती यामुळे आपली आ ध्या त्मि क प्रगती खुंटण्याची शक्यता असते.
म्हणून आजच्या स्वामीवाणीतून बोध घेता आपणास स्वामींकडे मागण्याची कला शिकायची आहे. जेव्हा आपण स्वामींकडे काही मागतो त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण आजपर्यंत आपण जे मागत आलो ते मात्र अज्ञानात आणि
बेहोशीत मागत आलो. जसे जसे अमुक अमुकने गाडी घेतली म्हणून मला पण द्यायची व त्याचा अमुक अमुक लाखाचा बंगला आहे म्हणून मलापण घ्यायचा व त्याचा अमुक अमुक लाखांचा बंगला आहे म्हणुन मलापण घ्यायचा.
अशा पद्धतीने मागणी केल्याने आपल्यात मात्र अहंकार वाढत जातो. पर्यायाने भरपूर धन असून सुद्धा आपण दुःखाला आमंत्रण देत असतो. आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लिलेचा संदर्भ घेता स्वामींनी विठ्ठलरावास विचारलेला प्रश्न सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे.
तू या धनाचे काय करशील किंवा दुसर्या भाषेत स्वामी असे विचारत आहेत की, तु माझ्याकडे जे मागतो आहे ते का मागतो आहेस? त्यामागील उद्देश काय आहे?
स्वामी भक्तहो सततचा प्रश्न शक्तिशाली प्रार्थनेचे रूप घेईल. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रामाणिक उत्तर देऊ तेव्हा आपल्या अंतर्मनात दडून बसलेल्या चुकीच्या वृत्ती समोर येतील आणि आपले मन शुद्ध होत जाईल. आणि प्रपंच करता करता अंतरंगातून अव्यक्तिगत काम करण्याच्या घोषणा येऊ लागतील. आणि स्वामींना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल. चला तर मग आज आपण प्रार्थना करूया.
हे स्वामी तू कृपेचा सागर आहेस. मी जे जे काही मागतो ते तू मला लगेचच देतोस. पण हे समर्था जेव्हा माझे मन मायेत जाते तेव्हा अज्ञान वा बेहोशीत मायेच्या गोष्टींना भुलून काहीही मागू शकते. पण हे आई त्या वेळेला तू माझी प्रार्थना ऐकू नकोस.
मला सजग कर मला जागृत कर. तू जे जे मला शिकवले त्याचे स्मरण दे आणि त्यानंतर माझ्याकडून अशीच प्रार्थना करून घे की, ज्याने तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल. हे दत्तात्रेया तू माझा गुरु आहेस मला मार्गदर्शन करा मला प्रेरणा आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.