स्वामी समर्थांनी दिलेली एक शिकवण : भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात

नमस्कार मित्रांनो,

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।, ही गीतेची शिकवण लक्षात ठेऊन मार्गक्रमण करत राहावे. भगवंतांच्या शाश्वत शुभाशिर्वादासाठी निस्सीम भक्ती, उपासना, नामस्मरण, आराधना महत्त्वाची असते.

जो निस्सीम भक्त असतो, जो प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून ईश्वरभक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभाशिर्वाद मिळतातच. जे दिखाऊपणा करतात, अभिमान बाळगतात, त्यांनाही भगवंताची कृपा लाभते. मात्र, दोन्हीमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंतांचा आशीर्वाद शाश्वत असतो. दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच, असे नाही.

त्यामुळे केवळ ईश्वरभक्ती, उपासना, नामस्मरण करत राहते सोईस्कर ठरते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।, ही गीतेची शिकवण लक्षात ठेऊन मार्गक्रमण करत राहावे. अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली. नेमके काय घडले? जाणून घेऊया…

जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या गडी म्हणून राबत होता. जोशी बुवांकडून त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, ते फेडू शकत नव्हते. दोन वेळेचे अन्न मिळण्याचीही भ्रांत होती. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नेवैद्य ग्रहण करायला या, असे आमंत्रण देतात. परंतु, स्वामी त्याला म्हणतात की, पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही! जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवा माघारी फिरतात. पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन, असे आश्वासन देतात.

सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करते. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात. तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळते, तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे, असे सांगतो. त्यासाठी काही पैसे मागतो. अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलावणार, असा डाफरतो. तात्या निराश होतो.

दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात. यथासांग आदरातिथ्य करतात. स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना, अशी शंका त्यांच्या मनात येते. स्वामी क्रोधित होतात. नैवेद्य ग्रहण न करताच परततात. जोशीबुवा क्षमा मागतात. अरे ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलीन झाले आहे. अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार?, असा सवाल करत निघून जातात.

इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो. तो ती मुर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की, स्वामी असताना, मूर्तीचा विचार कशाला करायचा. देवघर बाजूला उचलून ठेवतो, असे म्हणून ते बाजूला करणार इतक्यात तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते. तो एकदम स्तिमित होतो. स्वामींचे आदरातीथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू, असा विचार तो करतो.

तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय! खुद्द स्वामी बाळप्पासोबत त्याच्या घरी येतात. तो पत्नीसह स्वामीचरणी नतमस्तक होतो. तात्या स्वामींचे यथासांग आदरातीथ्य करतो. स्वामी म्हणतात की, अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते, ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हांला काही द्यायचे असेल, तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदानी खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात की, अरे युग कोणतेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात…

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *