सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग, स्वामींनी दिला ‘असा’ बोध

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थाच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अमुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते.

श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात-“जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे ! लक्ष केंद्रित करावं लागतं.”खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच.

चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात,निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते.

स्वामी मान्य करतात. पण समझ पण देतात. “पारायण करताना खेळाचा आवाज ऐकु तरी कसा येतो ? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेतांना तर ती उच्च पातळीची हवी.”

चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामन बुवा स्वामींना पहातच राहतात. एका मुलाला भूख लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात.

नैवेद्याचे अन्न आणताना ,चोळप्पाची सासू विरोध करते. पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात:”पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा.

अंधश्रद्धा, सोवळं-ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही.

तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालुन-पाडुन बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामी कडे जातात.

घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना,आपल्या गुरु स्वामीसमर्थां बद्दल सांगतात.


घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वाद विवाद होतो. जाता-जाता वामन बुवा सांगून जातात की, माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला.

तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामी कडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अश्या अटीवर घोलपस्वामी,आपले प्रयत्न सुरु करतात.

पण काय,काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही, त्यांना वाटतं कि वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे,म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात.

पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणी उलट तेच स्वत: पडून त्याच धोंड्या खाली चिरडले जातात.

धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते,ते मनो-मन स्वामींना आपले रक्षण केल्या बद्दल धन्यवाद देतात. काही वेळानी घोलप जागे होतात, त्यांना स्वामींच्या सामर्थाची प्रचीती येते.

ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात: “घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे आपले सामर्थ आणी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणा करता करावा.”

सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *