स्वामींच्या सेवेत मांसाहार का करू नये?

श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी,

आपल्या मराठी टाईमपास पेज वर मिळतात स्वामी सेवे बरोबर अनेक प्रश्नांची उत्तरे. सध्या स्वामी सेवे संधर्भात माणसांच्या मनात एकच प्रश्न असतो. की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा कशी करावी किंवा करू शकतो की नाही. आपल्याला स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा करायच्या असतात.

पण मांसाहार नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात शंकांचं वादळ निर्माण होत. “आम्ही मांसाहार करतो मग सेवा कशी करायची?”, “मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी काय करायचं?” “मांसाहार केलेल्या दिवशी सेवा कशी करायची”, अश्या प्रकारचे खूप प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अशुद्ध मनाने सेवेत लक्ष लागण थोड कठीणच असतं.

आजच्या लेखामध्ये या महत्त्वाच्या प्रश्नच उत्तर शोधायच्या प्रयत्न करूया. या प्रश्नावर ठाम उत्तर द्यावं इतका माझा अधिकार नाही. पण मला जे मनापासून वाटत ते आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

मला खात्री आहे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत. पण आजपर्यंत आपण त्या प्रश्नापासून दूर पळत आहोत.

आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा तर करायची असतेच पण मांसाहार या शब्दामुळेच आपली बर्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्याला मनापासून वाटत सेवा करावी आणि दुसरीकडे हा अ शुद्ध भाव नको येऊ वाटत. जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका कुशंका नसतात. पण जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या इश्ठ देवतेची आपल्या स्वामींची सेवा कारण भक्ती करणं अयोग्यच असतं. जेव्हा घरात मांसाहार केला असतो तेव्हा घरातील वातावरण बदललेल असतं ते तुम्हाला जाणवेल, घरात अशांतता वाटेल, वाद ही होतील म्हणूनच मांसाहार हा सेवेतील अडथळाच आहे.

मग आता काय करायचं?

तर तुम्ही जेव्हा मांसाहार केला असेल तेव्हा सेवा न केलेलीच बरी आणि तस कोणी सेवा करणारही नाही. पण गोष्टलक्षात ठेवावी, तो दिवस आपल्या स्वामी सेवेविना वाया गेला असं समजावं.

कारण श्री गुरू चरित्र ग्रंथात लिहिलंय “ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ”

<
म्हणजेच काय ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असं समजावं. पण त्या यमाला करुणा नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते.

मग या मांसाहारामुळे तो आपला एक दिवस वाया जातो येवढं मात्र नक्की. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचं की मी स्वामींची सेवा करतो स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला? याच उत्तर तुम्ही स्वतःच शोधाल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *