श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा, उज्ज्वल, आनंदी आणि समृद्ध भविष्यासाठी स्वामींचा संदेश…

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
नमस्कार मित्रानो,

स्वामी महाराज कृपेचा सागर आहेत. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करत होते. स्वामी महाराज कल्पवृक्ष आहेत. अशी ख्याती जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये झाली, तेव्हा मागणाऱ्याच्या रांगाच रांगा लागू लागल्या. परंतु यात कधी कधी मागणारा इतका आंधळा झालेला असे की तो काय मागत आहे, याच सुद्धा त्याला भान राहत नसे.

आणि अशा लोकांना स्वामी संकेत सुद्धा देत.असाच एक भाविक आला त्याने स्वामींच्या समोर एक इच्छा व्यक्त केली. स्वामींनी त्याच्याकडे बघितले, आणि बोलले कुग्राम वस्ती.. कूलहीन सेवा.. त्यावेळेला त्याला काहीच समजले नाही. परंतु तिथल्या काही सेवेकर्‍यांनी त्याला समजावून सांगितले, की अरे तू निरर्थक मागतो आहेस याची प्राप्ती जर आली तर त्याचा तुला काहीच फायदा होणार नाही.

स्वामींचे संकेत त्याला समजले. आपली झालेली चुक त्याच्या लक्षात आली आणि उपस्थित सर्वांनी अनन्यभक्‍तीचा भावनेने स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची स्वामी वाणी म्हणजे कृपाच आहे, आजच्या स्वामी वाणीतून निरर्थक कर्माचा त्याग करून सार्थक कर्म करण्याची प्रेरणा स्वामी महाराज तुम्हा आम्हा सर्वांना देत आहेत.

बघा कुग्राम वस्ती म्हणजे असे गाव की जिथे अन्न वस्त्र निवारा अशा मुलभूत गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. अशा गावात राहणे जसे निरर्थक आहे, पण कुलहीन सेवा खरं तर यातून अनेकांना गैरसमज होऊ शकतो परंतु कुलहीन सेवा याचा खरा अर्थ समजावून घेताना कुलहीनसेवा म्हणजे अशा लोकांची सेवा की ज्यांना सेवेची गरज नाही. उदाहरणार्थ जसे कोणी करोडपती आहे आणि आपण त्याचे कल्याण व्हावे या उद्देशाने आपण त्याला दहा रुपयांचे दान देण्याची सेवा करतो.

खरतर ही निरर्थक गोष्ट आहे. अशा कर्माला कुलहीन सेवा असे म्हटले आहे. असो थोडक्यात आजच्या लीलेतून प्रेरणा घेताना आपल्याला सुद्धा निरर्थक गोष्टींचा त्याग करायचा आहे. आणि आपल्याला असे सार्थक कर्म करायचे आहे की जे आपल्या ध्येयाच्या दिशेने असतात बघा जसे कोणाला पैशाची समस्या असेल तर गप्पाटप्पा सोशल मीडिया व इतर काहीही असेल.

अशा ठिकाणी उगीच वेळ वाया घालवण्याचे निरर्थक कर्म करण्यापेक्षा स्वामींना प्रार्थना करत नवीन पार्ट टाइम इन्कम चा व्यवसाय निवडून पैसा प्राप्तीच्या दिशेने असलेले सार्थक कर्म करायचे आहे. किंवा कोणाच्या नातेसंबंधात दुरावा आलेला असेल तर एकमेकांच्या चुकांचा पाढा वाचत बसण्याचे निरर्थक कर्म करण्यापेक्षा स्वामी आपले कुटुंब प्रमुख आहेत. या विश्वासाने एकमेकांना माफ करून संबंध सुधारण्याच्या दिशेने सार्थक कर्म करायचे आहे.

थोडक्यात आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता आपल्याला अनन्य भक्तिभाव मनात ठेवून निरर्थक कर्माचा त्याग करत ध्येयाच्या दिशेने असलेले सार्थक कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करायचे आहे. बघा निश्चितच आपले भविष्य उज्वल असेल आनंदी असेल चला तर मग आपण स्वामींना प्रार्थना करूया

हे स्वामी राया!! आज तुम्ही बोध सांगितले की,’बाळा!! निरर्थक कर्माचा त्याग कर आणि सार्थक कर्म.. ध्येयाच्या दिशेने असलेले कर्म.. माझी सेवा म्हणून कर.. तुला यश निश्चित आहे..’ हे आई !! आज तुम्ही ही प्रेरणा दिली तुम्हाला धन्यवाद! असेच मार्गदर्शन करा.. प्रेरणा द्या.. भक्ती द्या..आणि तुम्हाला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घ्या!!

<
बोला
अनंत कोटी ब्रम्हांडनायक..राजाधीराज योगीराज परब्रम्ह
श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.