स्वामींची कृपा होण्यास वेळ लागणार नाही! स्वामींचे सतत आपल्यावर लक्ष्य असते.

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय
स्वामी भक्त हो नमस्कार,

स्वामी महाराज परब्रम्ह आहेत. अक्कलकोटनगरीत स्वामीनी असंख्य लीला केल्यात, स्वामीनी अनेकांना अनुभव दिले. अनेकांच्या समस्या अगदी सहज सुटून जात, साहजिकच त्या भक्ताचे मन स्वामीचरणी अधिकच दृढ होई! प्रपंच करताकरता चित्त स्वामी चरणी असे, कधी एकदा अक्कलकोटला जातो आणि स्वामींचे दर्शन घेतो असे त्याला होई. स्वामी भक्त हो जेव्हा आपण स्वामीकडे एक पाऊल टाकतो, तेव्हा आपल्याकडे ते दहा पाऊले टाकत येतात.

स्वामींचा महिमा आहे आणि या स्वामी महिम्याचा अनुभव अजून अनेक भक्तांना येत होता. यातील असाच एक भक्त त्याला कुष्ट रोग झालेला होता, काही दिवसांनी तो स्वामी कृपेने तो बरा सुद्धा झाला.! त्यांची स्वामी चरणी अनन्य भक्ती जडली होती, त्याच्या मनाला स्वामी चरणाची ओढ लागली होती, त्यामुळे तो सत्य भावनेने स्वामीच्या दर्शनासाठी सह कुटुंब अक्कलकोट येथे दरवर्षी येत.

असेच एकवेळ सह कुटुंब अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी आला. आणि अजानु बाहू स्वामींची मूर्ती पाहून तो काही काळ समाधी परमंदाच्या अनुभवातच गेला. स्वामींना त्यांचा भक्ती भाव आवडला, स्वामीनी सुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघितले. आणि प्रेमाने बघत बोलले! अरे बाळा..तुझ्या परसात औदुंबर वृक्ष रुजला आहे. त्याच्या खाली पादुका स्थापन कर!!

स्वामी भक्त हो अशी स्वामी वाणी होताच त्याला आश्चर्य वाटले. कारण त्याच्या मागील बाजूच्या अंगणात औदुंबराचे रोपटे काही बघण्यात नव्हते. परंतु तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर बघतो, तर खरोखरच त्याच्या अंगणात नूतन औदुंबरचे झाड उगलेले होते. आणि या औदुंबराखाली स्थापित केलेल्या पादुकांना निमित्त करून प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे आगमन आपल्या अंगणात झाले आहे.

या भक्तीची भावना त्याच्या हृदयात दाटून येते. आणि या परमानंदात तो नाचू लागतो. आणि पुढे स्वामी हुकुमाप्रमाणे तिथे मंदिर बांधून त्याच पादुकांची स्थापना करून सेवा करू लागतो. आणि पुढे स्वामी महाराज त्याच्या प्रपंचाची जबाबदारी स्वतः घेतात. बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय!! आजच्या लीलेतून आपल्याला असंख्य बोध मिळत आहेत.

आजच्या लिलेत आज आपल्याला आजच्या पिढीला भक्ती चे महत्व, आणि भक्तीची शक्ती किती मोठी आहे, की ज्या भक्तीच्या शक्तीने स्वतः ईश्वर आपल्या भेटीला येऊ शकतो. याची समज मिळत आहे. या लिलेत वर्णन केल्यानुसार, बघा! या लीलेत वर्णन केल्यानुसार ज्या प्रमाणे त्या भक्ताचा कुष्ट रोग बरा झाला, त्यानंतर त्याची भक्ती वाढू लागली. आणि ती इतकी वाढली की स्वामी त्याच्या घरी आले.

खरतर औदुंबर आणि त्याखाली स्थापित केलेल्या पादुकांच्या स्थापना करण्याच्या कारणाने स्वामिनी मी तुझ्या सतत पाठीशी आहे, माझा वास तुझ्याच सभोवताली आहे ही प्रेरणा दिली. स्वामी भक्त हो आज ही आपल्या बाबतीत काही असेच घडते आहे. जसे या लीलेेत तो भक्त, कुष्ठ रोगाचे निमित्त करून स्वामींकडे आला, अगदी तसेच आपण सुद्धा वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांच निमित्त करून स्वामींच्या सेवेत आलो.

जशी त्या भक्ताला स्वामी भक्तीची गोडी लागली, अगदी तशीच आपल्यालासुद्धा स्वामी भक्तीची गोडी लागलेली आहे. आणि पुढे ज्याप्रमाणे स्वामींनी औदुंबराखाली पादुका स्थापन करून, त्याला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. माझा नित्यवास तुझ्या सभोवताली आहे. माझी संरक्षण कवच तुझ्या सभोवताली आहे, हे अभिवचन दिले!!

<
त्याला प्रेरणा दिली, अगदी तसेच आजही आपल्याला सुद्धा, स्वामी महाराज विविध माध्यमातून अशीच प्रेरणा देत आहेत. अर्थात ही प्रेरणा देण्यासाठी, स्वामिनी आपल्यासाठी काय माध्यम निवडले आहे. हे प्रत्येकाने स्वतः आत्मचिंतन करून शोधायचे आहे, कारण हे काहीही असू शकते..! उदाहरणार्थ कदाचित काही लोकांच्या जीवनात अशी काही लोक आली असतील.

त्यांच्याद्वारे स्वामी प्रेरणा देत असतील. व काही लोकांच्या जीवनात काही प्रेरणादायी पुस्तक ग्रंथ आलेले असेल. ज्यातून स्वामिभक्ती वाढते आहे. स्वामी सतत आपल्यासोबत आहेत, याची प्रेरणा मिळते आहे. थोडक्यात ते काहीही असू शकते. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. असो चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करुया;

हे माऊली!! जशी आम्हाला तुमची गोडी आहे. तशीच तुम्हाला सुद्धा तुमच्या भक्तांची. तुमच्या बाळांची गोडी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भक्तां शिवाय राहू शकत नाही. आज आम्हा बालकांना ही समज दिली तुम्हाला धन्यवाद !! हे स्वामी आई !! असेच आमच्या पाठीशी उभे रहा. आम्हाला प्रेरणा द्या. कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही!! बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक.. राजाधिराज योगीराज परब्रह्.. श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी.. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *