नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. उधळा गुलाल,वाजवा रे नगाडे. त्रेलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसया चा तूच दत्त, सुमती चा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी.
अशक्य ही तू सारे करितो शक्य एका क्षणात.” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दीन ची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले? कोठून आले? ते कोण होते? याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.
पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कळेलच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत चला आपण पाहूया.
शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तीनापुर पासून एक बारा कोस म्हणजे जवळपास २४ किलोमीटर अंतरावर चेली खेडा नावाचं एक गाव होत. त्याठिकाणी एक विजयसिंह नावाचा मुलगा आपल्या भाऊ आणि भाउजय बरोबर राहायचा.तो कोणाच्यातही मिसळायचं नाही. तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अश्या जागेवर मोठा वटवृक्ष होता.
त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक गणपतीची छोटीशी मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप खिश्यात गोट्ट्या घेऊन जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचंही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा असेच काही दिवस जात होते. आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवन्याची गरज वाटू लागली. त्याने विजयसिंह ला करणं बनवून आपला आविष्कार दाखवला.
तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने गणपती बरोबर खेळायला गेला. पण अचानक त्याच्या लक्षात आले की आपणच खेळतोय. आज याने पण खेळायचे सर्व गोट्टया मूर्तीसमोर टाकल्या आणि म्हणाला की बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो आज नाही. बस इतकेच शब्द त्याच्या तोंडातून निघाले. तेव्हा धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमुन अंधार होऊ लागला.
वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची एक तेजस्वी बालमुर्ती होती प्रकटले. तेच दुसरे तिसरे कोणी नसुन प्रत्यक्ष श्री परब्रह्म स्वामी समर्थ महाराज होते.
विजयसिंह गोटया खेळताना तेव्हा हरला तेव्हा बालरुप स्वामींनी त्याला गोट्यl उधार दिल्या होत्या. परत भेटण्याचे वचन देऊन गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस जवळ जवळ २४ किलोमीटर अंतरावर झैली खेडा गावाच्या जवळ वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता ही शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला.
<
कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामिसुत अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्ती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि स्वामींनी त्यांना जवळ बोलावले. मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सुत झालास.सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी तू माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरीभाऊ ना रडू कोसळले.
ते ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं. स्वामी त्यांना म्हणाले की रडतो का आहेस? माझे पोट बघ. किती मोठं आहे.त्याच्यावरून हात फिरव आणि ज्यावेळी हरीभाऊ नी तसे केले. त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना सगळे जन्म आठी लागले.आणि त्यातलाच त्यांना एक आपलाच जन्म आठवला.
विजयसिंह म्हणजे दुसर तीसर कोणी नसुन तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. की ते पुढील प्रमाणे म्हणतात.प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुतानी च सुरू केला.ज्यावेळी हा उत्सव स्वामी सुत अक्कलकोटला करत होते.तेव्हा भुजंगासन सारख्या भक्तांनी त्यांना प्रश्न विचारला.
स्वामी सुत काय करत आहेत. त्यावर स्वामींचे उत्तर असे होते. माझा बाळ मी ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकट दिनाचा उत्सव साजरा करत आहे. नाना रेखे नावाचे स्वामी भक्त होते जे स्वामी सूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगळा जोतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की कुंडली बनव.
तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच. कुंडली बनली. त्यातून स्वामी प्रकट होण्याचं मजकूर हा तुम्हाला सांगितला त्याप्रमाणेच होता.तर ते कुंडली घेऊन स्वामिंपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यावेळी कुंडली आणण्याची आज्ञा केली.
तेव्हा कुंडलिक हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, तुळस घालून सर्व देवतांनी पूजा केलीआणि आजही ही कुंडली अहमदनगर मध्ये स्वामींच्या मठात आहे. तर अश्या प्रकारे ही स्वामींच्या प्रकटलीलेची ही कथा सांगितलेली आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.