नमस्कार मित्रांनो,
ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. एके दिवस मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते. नेमके काय घडले? जाणून घेऊया…
ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.
स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही, तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात. त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते. एके दिवस मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते. नेमके काय घडले? जाणून घेऊया…
अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे. तेथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केल्या नियंत्रणात येत नव्हता. माहूत आपापल्या परिने प्रयत्न करीत होते. मात्र, अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली.
एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले. तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावीत असे. अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. राजे महाराजांना म्हणाले की, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे. नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही. अनेक प्रयत्न करून थकलोत. त्याला देहान्ताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला.
राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत स्थानिक, भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की, महाराज या रस्त्याने जाऊ नका. तो हत्ती मोठमोठे दगडसारखा भिरकावीत असतो. मात्र, महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जगावर चालते. ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वत:ला सेवक म्हणत होते, ते देह-बुद्धी धरून पळून गेले. हत्तीला बांधून ठेवले होते, तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले.
महाराज कंबरेवर हात ठेऊन हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की, अरे मुर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा आभिमान सोडून दे, अशी स्वामींची आज्ञा एकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला. आपल्या पुढच्या पायाचे गुढगे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू वाहू लागले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला.
सौजन्य महाराष्ट्र टाइम्स .
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.