श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.
आज आपण श्री स्वामी महाराजांचे पत्र ऐकणार आहोत. स्वामी महाराज अशा प्रकारे पत्र लिहितात माझा प्रिय भक्त सकाळी जेव्हा तू उठलास तेव्हा मी तुझ्या अंथरूण पाशीच उभा होतो.
वाटलं होतं की काहीतरी बोलशील. तुझ्या जीवनात ज्या चांगल्या घटना झाल्या त्याबद्दल बोलशील. पण तू ऊठलास तुझ सर्व आवरलास. कसातरी चहा प्यायलास.
पेपर वाचालास कशीतरी अंघोळ केलीस. आणि कपडे घालून डब्बा घेऊन गेलास. माझ्याकडे पाहिलं सुध्दा नाहीस. मला वाटलं अंघोळ केल्यावर तर माझ्याकडे पाहशील.
पण अस काही झालं नाही. ऑफिसला जाताना ट्रेन पकडली. म्हटलं आतातरी बोलशील. पेपर वाचून मोबाईल वर गेम खेळत होतास मी मात्र तिथेच उभा होतो तुझ्याजवळ.
मी तुला सांगणार होतो की काही वेळ तरी माझ्या सोबत घालावं. तुझी काम अजून चांगली कशी होतील ते मी पाहीन पण तू बोलत नाहीस.
ऑफिस मध्ये एक क्षण आला होता तू खुर्चीवर बसला होता स पण त्यावेळी सुध्दा तुला माझी आठवण नाही आली. दुपारच्या जेवणनंतर अजू बाजूला पाहत होतास म्हटलं तेव्हा तरी माझी आठवण होईल.
दिवसात खूप वेळ वाचला होता. त्या वेळेत तरी बोलशील अस वाटलं. घरी आलास जेवण झालं पण नाही टीव्ही लावून बसलास मग तू बायका मुलांना शुभ रात्री म्हणालास.
मी उभाच होतो तुझ्या बाजूला. झोपी गेलास. धकाधकीच्या जीवनात बोलूया काही ऐकावं. काही माझ्याकडून सांगावं. काही मार्गदर्शन करावं तू या भूमीवर का आहेस? पण तुला वेळच नाही मिळाला.
<
मी खूप प्रेम आहे तुझ्यावर रोज वाटत मला तू कधी तरी माझ्याशी बोलशील. तुझ्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटना बद्दल धन्यवाद म्हणशील.
मना प्रमाणे सर्व मिळाले की सर्व तू विसरून जातो. मला पूर्ण पने विसरून जातो. मला विश्वास आहे. आज नाही तर उद्या आठवण काढशील. तुझेच स्वामी.
तर मित्रांनो या पत्राद्वारे असे समजले असेल की स्वामी भक्ती भावाचे भुकेले आहेत. एक निष्ठेने जे लोक माझी उपासना करतात.
मी अप्राप्ता वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूचे रक्षण स्वतः करत असतो. म्हणून स्वामींचे नित्य स्मरण करा. श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.