नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रानो सगळ्या स्वामी भक्तांना आणि सेवेकरांना सारखा मनात एक प्रश्न येतं असतो तो म्हणजे स्वामी समर्थाना कोण कोणते पदार्थ आवडतात
आणि कोणता कसा नैवेद्य करावा जेणे करून स्वामी महाराज प्रसन्न होतील तसे तर प्रत्येक देवाचे, गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात.
स्वामींचे सुद्धा आहेत जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींचे अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थां मध्ये कांदा भाजी आणि कट पोळी.
आता तुम्हाला स्वामीं ना नेवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी खीर, पुरणपोळी आमरस, कांदा भाजी, आमटी भात पापड असा पुरेपूर तुम्ही नेवेद्य दाखवू शकतात.
हे तर झाले स्वामींचे आवडीचे पदार्थ, परंतु स्वामी हे कधीच बघत नाही कि तुम्ही ताटात काय दिलंय फक्त भक्तांचा खरा भाव बघतात. तुम्ही किती आनंदाने किती प्रेमाने तो जेवणाचा बेत तुम्ही स्वामीं ना कसा देता ते महत्वाचे आहे.
ते काही असेल दही भात, दूध भात, पोहे, भाजी चपाती, भाजी भाकर, डाळ भात जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही स्वामीं ना नेवेद्य म्हणून दाखवा आणि काहीच केले नसेल तर दूध भात, दूध चपाती दाखवा.
भाव महत्त्वाचा असतो. आदर, प्रेम महत्त्वाचे असते. स्वामींना सगळे आवडते. तुम्ही जे द्याल ते स्वामींचे आवडते पदार्थ बनतील. असे नाही कि तुम्ही पुरणपोळी, बेसानाचे लाडूच स्वामींना दाखवायला हवे. जर कोणता खास दिवस आहे, सणवार आहे.
पारायणाचे उद्यापन आहे. तेव्हा तुम्ही स्वामींना गोड धोड नैवेद्य दाखवा. शक्य असतील बेसनाचे लाडू करून दाखवा. कांदा भाजी करून दाखवा. पण हे करणे म्हणजे नियम नाही स्वामी दूध भात खाऊन पण भक्तांच्या इच्छया पूर्ण करतात.
त्यांच्यावर कृपा करतात. जे तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा ते स्वामींना आवडेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.