श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सर्व स्वामी प्रिय भक्तांना माझा नमस्कार.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताला महाराजांचा आलेला अनुभव इथे सांगणार आहे. यात त्याच्या नावाची कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नसून मात्र हा अनुभव अतिशय खरा आहे. अंगावर शहारे आणून देणारा असा हा अनुभव आहे. चला मग हा प्रसंग सांगायला इथे सुरवात करते. साधारण सहा ते सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा आणि त्याचा नातू त्याची स्वतःची कार घेऊन अमरावती येथे जात होते. जाताना कोणफळी नावाचे गाव लागते व तेथून काही अंतरावर कारंजे नावाचे गाव आहे. या दोन गावांच्या मधील रस्ता हा घाट व दरी यांच्या मधून जातो. प्रवास सुरळीतपणे सुरू होता. मात्र समोरच्या गाडीचा पुढचा टायर फुटला व्यवस्थित चालू असलेल्या प्रवासात मोठे संकट आले.
अचानक झालेल्या या घटनेमुळे ती गाडी नियंत्रणाच्या बाहेर गेली व रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पाइपला जाऊन आदळली. या अचानक झालेल्या अपघातामुळे सुनबाई व तीन वर्षाचा नातू गाडी बाहेर पडले. व त्यांचा मुलगा स्टेरिंग मध्ये अडकला होता. अपघात फार भयानक होता. स्वतःच्या वडिलांची ही अवस्था पाहुन अवघ्या तीन वर्षांचा नातू ओरडू लागला माझ्या बाबांना वाचवा.
त्यांना कुणीतरी बाहेर काढा. जिवाच्या आकांताने तो लोकांना प्रार्थना करू लागला. गाडीच्या डॅशबोर्डवर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती विराजित होती. ओरडता ओरडता त्यातील तीन वर्षाच्या मुलाने आपल्या आई वडीलाना धीर देत होता. म्हणाला तुम्हाला काही होणार नाही. स्वामी सर्व बरोबर करतील. तुम्ही रडू नका. स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत.
थोड्याच वेळाने आजूबाजूला काही लोक जमले. इतर लोकांनी आई-बाबांना बाहेर काढले. सर्वांना गाडीने उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टर देखील सांगत होते की इतका मोठा अपघात होऊन देखील तुम्ही लोक सुखरूप बाहेर आले आहात. गाडी ची परिस्थिती पाहून लोक म्हणाले. की नक्कीच दैवी शक्तीचा परिणाम असेल. एक देवाचा चमत्कारच म्हणावा लागणार की तुम्ही सुखरूप बाहेर आलात.
दुसऱ्या दिवशी अपघात स्थळी ते लोक पोहोचले व त्यांनी पहिले गाडीचे तुकडे झालेले आहेत. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली होती त्या मूर्तीचा केवळ एक पाय व गळ्यातील मुकुट शिल्लक राहिले होते. बाकी सर्व मूर्तीची तुकडे-तुकडे झाले होते. व बाजूला गणेशाची मूर्ती देखील विराजमान होती. मात्र त्या मूर्तीला काही झाले नव्हते. त्यावरून त्या ना समजले की भक्तांवर आलेले संकट महाराज स्वतःवर घेऊन भक्तांना सुरक्षित ठेवलेले आहे.
ज्या दिवशी हा अपघात झाला त्यादिवशी त्यांच्या मुलीच्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज आले होते. व ते म्हणाले की स्वप्नात त्याचा नातू स्वामींच्या गळ्यात हात टाकून खेळत होतो. त्याच्या हातावर त्यांची सुन व मुलगा दोघेही होते. अशाप्रकारे स्वामींनी दृष्टांत देऊन सांगितलं की मी तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे.
याच प्रकारे स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या अडचणींमध्ये धावून येऊन त्यांची मदत करतात. त्यांना संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी समर्थ महाराज हे भक्तांकरिता तारणहार आहेत. स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. ती सेवा स्वामीं पर्यंत पोहोचते व स्वामींची कृपा आपल्यावर लाभत असते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.