अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
स्वामी भक्त हो नमस्कार,
एके दिवशी विनायक काका अक्कलकोट मध्ये आले. त्या दिवशी साधारणतः नऊ वाजताच्या दरम्यान अक्कलकोट मध्ये आले. त्या दिवशी साधारणतः नऊ वाजताच्या दरम्यान स्वामी महाराज मंचकावर पहुडलेले होते. त्यादिवशी चोळप्पा नी स्वामी महाराज यांना पितांबर नेसवून अंगावर भरजरी अंगरखा घातला होता. आणि डोक्यात टोपी घातली होती. विनायक काका सुद्धा तेथे होते.
श्री रावसाहेब ढवळे हे स्वामीना चौरीने हवा घालत होते. शहाजी महाराज सुद्धा जवळच बसलेले होते. इतक्यात स्वामींनी शहाजी राजे साहेबांकडे बघितले आणि बोलले शंकर उठ! तेरेकु काम नहीं मालूम! स्वामींची अशी आज्ञा होताच राजेंनी चौरी हातात घेतली आणि हवा घालण्यास सुरूवात केली. स्वामी भक्त हो, स्वामींनी काही वेळा तर स्वामींनी एक लीला केली. स्वामी अचानक उठले आणि अंगावर घातलेला पेहराव फा डून फेकून दिला.
अचानक झालेला प्रकार पाहून सर्वांची एक धांदल उडाली. त्यावेळी स्वामींच्या डोक्यातून खळखळा पाणी सुरू झाले. पंढरीचा विठोबा वाळवंटी! पंढरीचा विठोबा वाळवंटी! पंढरीचा विठोबा वाळवंटी! बोलू लागले. स्वामी भक्त हो स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य आहेत. त्या लगेच कशा समजणार. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मंडळींना समजले नाही पण काहीतरी अनर्थ घडलेले आहे हे सर्वांच्या लक्षात आले.
कारण त्या दिवशी संपूर्ण दिवस भर स्वामी महाराज उदास होते. आणि त्यामुळे सर्व अक्कलकोट वासियांच्या चेहऱ्यावर उदासिनता होती. विनायक काका साहेबाना रजा नसल्याने ते स्वामी आज्ञा घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाले. प्रवास करताना त्या रात्री बार्शी स्टेशनवर काका साहेबाना एक बातमी समजली. ती अशी पंढरपूर मध्ये कोणा एका मुस्लिम व्यक्तीने पांडुरंगाच्या मूर्तीला दगड मा’रून मूर्तीचा पाय मोडला आहे.
काका साहेबाना ही बातमी समजताच काल अक्कलकोट मध्ये स्वामींनी पेहराव फाडत पंढरीचा विठोबा वाळवंटी असे बोलत घळा घळा रडण्याची जी लीला केली. त्याचा संपूर्ण अर्थ त्यांना उलगडला. आणि तुम्ही लोकात सुरू असलेले खेळ स्वामीना ठाऊक असतात. हा अतूट अभेद्य विश्वासा चा भाव त्यांच्यात दृढ झाला. आणि एक घोषात स्वामींचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय! आजच्या लीलेतुन स्वामी आपल्याला अनेक बोध देत आहेत.
त्यापैकी आपल्या पूर्वजांनी स्थापित केलेल्या भक्तिस्थानाचे, श्रद्धा स्थानाचे महत्व समजावून घेत त्यामागील मुळ उद्देश समजावून घेत आपला विवेक जागृत ठेवून या सर्व स्थानांचे संवर्धन आणि संगोपन करत याचे पावित्र्य आपला विवेक जागृत ठेवून, त्या सर्व स्थानांचे संवर्धन आणि संगोपन याचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचा हुकूम स्वामी आपल्याला देत आहेत. स्वामी भक्त हो आपले पूर्वज आत्मज्ञानी होते त्यांनी निर्गुण निराकार ईश्वराचे अस्तित्व अनुभवले होते.
आणि यातूनच खरे ईश्वरीय सामर्थ्य, खरी ईश्वरीय सत्ता, खरे ईश्वरीय अस्तित्व, आणि ईश्वराची खरी इच्छा काय आहे. हे सच्चा त्यांना उमगले! आणि या ईश्वरीय प्रेमापोटी, आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान, प्रत्येक मानवाला प्राप्त व्हावें. त्यांच्यात सुद्धा हा विवेक प्राप्त व्हावा. त्यांच्यातील अनन्य भक्ती अतूट प्रत्येक शब्दा प्रकट व्हावी. या उद्देशाने ईश्वरीय कार्य सुरू केले. यातून अनेक भक्तीस्थाने, श्रद्धास्थाने निर्माण झाली.
ही सर्व स्थाने म्हणजेच स्वामींची ऊर्जाकेंद्र आहेत! आणि यातील भक्तराज पुंडलिकाच्या, अनन्य भक्ती तू निर्माण झालेले श्री शेत्र पंढरपूर, आणि अक्कलकोट मध्ये लिला करत, डोळ्यातून घळाघळा पाणी आणून स्वामिनी या असलेल्या स्थानक बद्दलचे प्रेम प्रगट केले. आणि शंकर उठ तेरेको काम नही मालुंम या स्वामी वाणीतून, तुम्हा-आम्हा सर्वांना आजच्या पिढीला, या श्रद्धास्थानाचे पावित्र्य, त्याचे महात्म टिकून ठेवण्याचा हुकूम देत आहेत.
<
पण हे सर्व करत असताना, ईश्वर एकच आहे, आणि या सर्व स्थानांना निमित्त करून, आपल्याला आपल्या रूदयात असलेल्या मूळ ऊर्जा केंद्रांचे दर्शन देऊन, त्यांच्या संपर्कात राहून आपले शरीर तीर्थक्षेत्र बनवून आपले जीवनच, प्रेमामय करणे हा मूळ उद्देश मूळ समज सतत समोर ठेवायचा आहे. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करुया..!
हे गुरुराया!! तुम्ही भक्तवत्सल आहात. तुमच्या भक्तांवर तुमचे खूप प्रेम आहे.. तुमचा फक्त कसा आहे असू दे. त्याचा तुम्हाला अभिमान आहे. आणि या भक्ताच्या भक्तीचा महिमा वाढवण्याचा तुम्हाला छंदच आहे. हे स्वामी राय !! असेच प्रेम तुमच्या भक्तांवर ठेवा. आणि तुमचे नाम निरंतर मुखात ठेवा. कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही!! बोला
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज. योगीराज परब्रम्ह. श्री सचिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! धन्यवाद!!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.