स्वामी कश्या प्रकारे आपल्या जीवनात चमत्कार करतात! नक्की बघा

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय
स्वामी भक्त हो नमस्कार,

मोघल प्रांती जोगाई च्या आंब्या नजिक केज म्हणून गाव आहे. त्या गावात महारुद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण रहात. हे खूप श्रीमंत होते. पण त्यांचे उत्पन्न निजाम सरकारने जप्त केले होते. उत्पन्न सुटण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच वेळी बीड मध्ये कोणी एक साधू आलेला आहे असे कळले. आणि ते त्या साधूच्या दर्शनासाठी गेले.

साधू चे दर्शन घेऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांची सर्व व्यथा ऐकल्यानंतर साधू त्यांना बोलले की तुम्ही अक्कलकोट येथे जा. तेथे परमहंस स्वामी आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचे कार्य होईल असे वाटते. त्या साधूने विश्वास दिल्याने श्री देशपांडे यांना आशेचा किरण दिसू लागला. आणि ते तात्काळ अक्कलकोट पुण्य पावन नगरीत आले.

स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अक्कलकोट नगरीत येताच देशपांडे यांना खूप बरे वाटले. स्वामींसाठी श्रीफळ आदी पूजा सामग्री घेवून स्वामींच्या दरबारात ते येतात. स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहतात. इतक्यात स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि बोलतात. चार मनोरे आहेत. तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडून देवू.

खरतर श्री देशपांडे यांनी आपली व्यथा कोणालाच सांगितली नव्हती. स्वामींचे हे बोलणे ऐकून श्री देशपांडे भारावून गेले. त्यांना आश्चर्य वाटले. आणि स्वामींची आज्ञा घेवून ते लगेच हैद्राबाद येथे आले. स्वामी भक्त हो स्वामी वाणी होती ती ज्या दिवशी श्री देशपांडे हैद्राबाद येथे आले. त्याच दिवशी सरकरातून हुकूम आला. आणि श्री देशपांडे यांचे जप्त झालेले उत्पन्न सोडून दिले.

ही बातमी ऐकताच श्री महारुद्रा राव देशपांडे आनंदाने नाचुच लागले म्हणा. त्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट ला आले. स्वामींचा आलेला अनुभव त्यांनी प्रेमाने सर्वांना सांगितला. सर्वांना आश्चर्य वाटले. त्यानंतर महारुद्रा राव देशपांडे यांना अनेक अनुभव येत गेले. एकदा ते पंढरपुरास गेले असता पांडुरंगाचे दर्शन घेत असताना विठ्ठलाच्या ठिकाणी स्वामींचे दर्शन झाले.

जसे जसे त्यांना अनुभव येत होते तशी तशी त्यांची स्वामी भक्ती दृढ होत होती. पुढे ते पंढरपूर येथील अक्कलकोट येथे आले. तेथे त्यांनी स्वामी हुकूम प्रमाणे हजार लोकांचे अन्नदान केले. त्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना पुरलेले द्रव्याचे हांडे सापडले. थोडक्यात त्यांचा उत्तरोत्तर विकासच होत होता. स्वामी भक्त हो या जीवनाच्या सागरात सुख दुःखाची भरती ओहोटी सुरूच असते.

आणि महारुद्रा राव देशपांडे यांच्या बाबतीत सुद्धा असेच घडले. त्यांना एकदम वायू प्रकोप होऊन तापाने त्यांची तब्बेत बिघडली. त्यांची तब्बेट इतकी खराब झाली की सगळ्यांनी त्यांच्या जगण्याची आशाच सोडून दिली. आता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रघुत्तम राव घाबरले. आणि तळमळीने प्रार्थना करत अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे आल्यानंतर स्वामींच्या येथे हात जोडून उभे राहिले.

आणि प्रार्थना करत बोलू लागले की स्वामी आमचे वडील तापाने भयंकर अत्यवस्थ आहेत. त्यांच्याशिवाय आमच्या प्रपंचाला काहीच अर्थ नाही. तरी कृपया करून त्यांना वाचवा. स्वामी कृपा करून त्यांना वाचवा! स्वामी भक्त हो स्वामी आई आहेत आईचे आपल्या बाळावर खूप प्रेम आहे. स्वामींनी रघुत्तम राव यांच्या कडे बघितले आणि बोलले. अरे काळजी नको करू घरी जावून स्वस्थ राहा.

<
तुझ्या पित्याला नक्कीच आराम पडेल. स्वामींची ही वाणी ऐकल्यानंतर रघुत्तम रावना खूप बरे वाटले. त्यांना खूप आधार आला. आणि स्वामी चरणाचे तीर्थ घेऊन ते घरी आले. घरी आल्यावर श्रध्देने हे स्वामी चरणाचे तीर्थ आपल्या वडिलांना पाजले. त्यानंतर आश्चर्य घडू लागले. महारुद्रा राव यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आणि चमत्कार असा की आठच दिवसात महारुद्रा राव ठणठणीत बरे झाले.

स्वामींचा हा चमत्कार बघता सर्वांना आश्चर्य वाटले. आणि सर्वांनी एकघोषात स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी महाराज असंख्य बोध देत आहेत. पैकी स्वामी सेवा करत असताना जीवनात कितीही सुख दुःखाचे पडाव येवू दे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. हा बोध दृढ होतो आहे बघा जसे महारुद्रा राव देशपांडे यांच्या बाबतीत घडले.

अगदी तसेच आपल्या बाबतीत सुद्धा होत असते. जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो. तेव्हा आपल्याला असंख्य अनुभव यायला सुरुवात होते.जीवनात चमत्कार व्हायला सुद्धा सुरुवात होते. आणि जेव्हा अचानक एखादे संकट येते. तेव्हा आपले मन खचून जाते. हा संकटांचा काळच आपल्या अनन्य भक्ती च्या परीक्षेचा काळ असतो.

या काळातच आपला खरा विकास होत असतो. बघा.. महारुद्रराव यांचे चिरंजीव स्वामींकडे आले. म्हणजे त्यांना हा विश्वास होता. मरणाच्या दारातून आपल्या पित्याला आता फक्त स्वामीच तारून नेऊ शकतात. आणि पुढे त्याना त्यांच्या अतूट अभेद्य श्रद्धेचा अनुभव आला. स्वामींनी त्यांना अभय वचन दिले. काळजी नको करू स्वस्त राहा. आणि महारुद्रराव आठच दिवसात बरे झाले.

म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी आजच्या लिलेतून बोध घेता ही समज दृढ करायची आहे. की आता आपण स्वामी चरण पकडले आहे ना! तर या स्वामी वाणीत सांगितल्या प्रमाणे आज आपल्या जीवनात कितीही मोठे संकट असू द्या..काळजी नको करू स्वस्त राहा. या आजच्या स्वामी वाणीचे नित्य स्मरण करत राहायचे आहे.

प्रत्येक श्वासाला आपले सर्व चित्त स्वामी चरणांवर स्थिर करून आपले संकट दूर होणारच या दृढ विश्वासाने आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे आहे. बघा.. जसे मरणाच्या दारात असलेल्या महारुद्रराव यांना पुन्हा नवीन जीवन लाभले. अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा नक्कीच चमत्कार घडतील. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करुया.

हे परमपिता काळजी नको करू स्वस्त राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. आज पुन्हा आम्हा बालकांना या अभयवचनाची समज दिली. तुम्हाला धन्यवाद..!! जेव्हा हे अभय वचन कानी पडते. तेव्हा शरीर मनात एक ऊर्जेचा संचार होतो. आणि पर्वत एवढी वाटणारी संकटे क्षणात चन्याफुटाण्या सारखी वाटू लागतात. हे आई!! हा सर्व तुमच्या नामाचा महिमा आहे.

आमचे खरोखर भाग्य आहे की, आमच्या मुखात तुमचे नाम आहे. हे दत्तात्रेय!! आम्हा बालकांचे तुमच्याकडे इतकेच मागणे आहे की, तुमचे नाम असेच आमच्या मुखी ठेवा..आणि करवून घ्या!! कारण तुम्ही आमचे गुरू आहात. तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कुणीच नाही. आम्हाला प्रेरणा द्या. आम्हाला मार्गदर्शन करा..!!

बोला.. अनंतकोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय!! धन्यवाद…!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *