।।श्री स्वामी समर्थ।।
मला नुकताच स्वामींचा आलेला एक अनुभव मी सांगत आहे, स्वामी आपल्या भक्ताचे तारक तर आहेतच पण ते आई सारखी माया देखील करतात.
मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे आणि नुकतेच गावी आम्ही घर बांधले ते जवळ जवळ स्वामी कृपेने पूर्ण होत आले आहे. घर बांधणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम, खूप कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांनाच माहित आहेच ,
पैशांचे खूप सारे व्यवहार होतात, घरचा शेवटचा टप्पा म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो , आता आमच्याकडे साठवलेले सर्व पैसे जवळ जवळ संपले होते. कारण आम्ही शून्यातून निर्माण करत आलो होतो, स्वामींच्या मदतीने सर्व ठीक चालत होत.
मला वास्तुशांती साठी थोडे पैसे लागणार होते, पण सोय कशी करावी हे समजत नव्हते कारण आधीच आम्ही आधीच सर्व साधनांच्या याआधारे पैसे जन करू ठेवले होते. पण स्वामी कशी साथ देतात याचा प्रत्यय पुढे येतो.
माझी सॅलरी हाच एक मार्ग होता पण ते हि पैसे कमी पढत होते. एक तारखेला माझी सॅलरी झाली. माझी सॅलरी नेहमी पेक्षा दुप्पट झाली होती. मला वाटलं माझे काही क्लेमस आहेत त्यांची ती अमाऊन्ट आली असेल.
माझ्या स्वामींनी आधीच माझी तजवीज करून ठेवली होती. मला वास्तुशांती ला पुरतील एवढी रक्कम माझ्या अकौंट मध्ये जमा होती. स्वामी कृपेने वास्तुशांतीचा कार्यक्रम नीट पार पढला आणि मी अक्कलकोट वरून आणलेली स्वामींची मूर्ती नवीन वस्तू मध्ये स्थापन केली.
पण मला स्वामींची कृपा आहे हे आधी समजले नव्हते कारण हि माझ्या क्लेम ची अमाऊन्ट आहे असे मी गृहित धरले होते.
पण सेकंड मंथ मध्ये माझी सॅलरी कमी अली तेव्हा मात्र सॅलरी स्लिप पहिली HR शी कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणाले माहित नाही कसे तुम्हाला सिस्टिम ने दुप्पट सॅलरी पे केली ते , म्हणून आम्ही तुमची सॅलरी रिकव्हर केली,
आणि तुम्हाला या महिन्यात कमी सॅलरी मिळाली.तेव्हा माझे मित्र ते जवळ आले आणि अचानक म्हणले हे बघ तुला गरज होताना पैश्याची स्वामींनीच तुझी हेल्प केली.
मला नवल वाटलं कारण ते स्वामींना मानतात पण त्यांना हे कस कळलं कि स्वामींनीच माझी हेल्प केली कारण स्वामींच्या आणि माझ्या मध्ये या गोष्टी होत्या. तेव्हा सर्व चित्र स्पष्ट झालं कि स्वामी आपल्या भक्ताचा योगक्षेम स्वतः चालवतात.
मला हा एकाच अनुभव नाही तर असे असंख्य अनुभव आहेत.मी स्वामींचा हृदया पासून ऋणी आहे . त्यांनी आम्हाला पमराना एवढे जवळ ठेवले आहे. तसेच स्वामींची तुमच्या सर्वांवर अशीच कृपा असुदे अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो .
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.