विश्वातील प्रत्येक समस्यांचे उत्तर स्वामींकडे आहे.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो नमस्कार,

स्वामी महाराज कोनळी गावाच्या रानातून चालल होते. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतच होते. दिवसभर चालणे सुरू असताना स्वामीनी स्वतः काही खाल्ले नाही आणि इरताना काही खाऊ दिले नाही. दिवसभराच्या उपवासाने सर्व लोक अक्षरशः व्याकूळ झाले काट्याकुट्यातून सरळ रस्ता काढत पुढे चालले होते. आता भुकेची व्याकुळता श्रीपाद भटाना सहन झाली नाही आणि ते अक्षाशहा रस्त्यात आडवे झाले.

आणि स्वामींना विनंती करून बोलू लागले की स्वामी आम्ही भुकेने तडफडतो आहे. आता कृपा करून एखाद्या झाडाजवळ आपण थोडावेळ थांबावे. त्यानंतर मग वाटेल तिकडे न्यावे.त्यावर श्रीपादभटांनी असे बोलताच स्वामी हसले. आणि एका झाडाच्या आश्रयाखाली सर्वजण थांबले. आता श्रीपादभट सभोवताली पाण्याचा शोध घेण्यासाठी निघाले जवळ जवळ अर्ध्याकोसावर त्यांना पाणी मिळाले.

तेव्हा तोंडीबा, मालाबा, खेमदास, काशीकर बुवा आणि गोविंद पुराणिक यासर्व मंडळींना सोबत घेऊन त्यांनी पाणी आणले. पाणी आणल्यानंतर श्रीपादभटांनी स्वामींना फलाहार करण्याबाबत विनंती केली. तेव्हा स्वामी त्यांना बोलले तुम्ही सर्वलोक भोजन करून घ्या.त्यानंतर आम्ही खाऊ असे सांगितले तेव्हा श्रीपादभट ऊतरले महाराज ह्यावेळी लोकांना भोजन कुठून मिळणार.

तेव्हा स्वामीनी पलीकडे असलेल्या शेतात एका आंब्याच्या झाडाकडे बोट दाखऊन त्या झाडाकडे जाण्याचा इशारा केला तेव्हा त्या झाडाकडे काय वाढून ठेवले असेल असा तेथील लोकानी विचार केला आणि जाण्याचे टाळले. परंतु श्रीपाद भटांचा स्वामिंवर पूर्ण विश्वास होता. आणि वाचनावर विश्वास ठेऊन परशुराम सह अजून काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन झाडाकडे आला.

तेव्हा तेथे आश्चर्य बघायला मिळाले. त्याठिकाणी एक जास्त वयाची सुहासिन उभी होती. तेव्हा श्रीपाद भटांनी त्यांना नमस्कार केला.आणि बोलले माऊली आपण कोण आहात? येथे एकट्या कशा? येथे जवळपास अन्नाची सोय आहे का? येथे या शेतात आंब्याच्या झाडाखाली आमची काही लोकं जेवायला येणार होती.त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवला होता.

परंतु आता किती वाट बघू? खरं तर इतक्या अन्नाचे काय करू असा प्रश्न पडलेला होता? बरे झाले. आता तुम्ही आलात. हे अन्न तुम्हीच घेऊन जा! येथे पाणी शुद्ध आहे.त्या स्त्रीने असे बोलताच श्रीपादभट आणि सोबतची मंडळींना खूप आनंद झाला. त्यांनी भात आमटी वरण भाज्या पोळ्या भाकरी चटण्या कोशिंबीर दूध तूप यांची भांडी आणि टोपल्या उचल्या आणि स्वामींकडे निघाले.

तेव्हा या सर्वांनी आपण सुद्धा स्वामींकडे चलावे. गुरु प्रसाद घ्यावा ही विनंती केली. तेव्हा ती माऊली बोलली तुम्ही खूप भूक केलेले आहात. तुम्ही पुढे चला. मी येते मागाहून..!! आणि त्यानंतर सर्व मंडळी स्वामींकडे आली. संध्याकाळ झाली होती मशाल दिवे पेटवले सर्वांनी जेवण केली परंतु स्वामींनी काही नीट खाल्ले नाही.

सर्वांची जेवणं झाली काही लोकांनी स्वामींना त्या स्त्रीबद्दल विचारले असता? अरे ती अन्नपूर्णा होती..!! असे स्वामिनी सांगितले स्वामीभक्त हो सर्वांना आश्चर्य वाटले. आणि कारण यात कुठेही खाण्या-पिण्याची सोय नसताना स्वामिनी प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेच्या हातून जेवणं खायला घातले. ही कृतज्ञतेची भावना सर्वांमध्ये जागृत झाली. आणि सर्वजण झोपी गेले.

<
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कालच्या भांड्यानचे काय करायचे असा प्रश्न पडला. ही सर्व भांडी तुमचीच आहे. बरोबर घ्या..!! ही प्रासादिक भांडी घेऊन सर्व सेवेकरी स्वामींचा जयजयकार करत निघाले बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची लीला तर खूपच मार्गदर्शक आहे. आजच्या लीलेतू न असंख्य बोध मिळत आहेत.

आज आपल्याला आजच्या पिढीसाठी बोध घेता हीच समज मिळत आहे की जीवनाच्या वाटेवरून चालत असताना स्वामी गुरूंचे अधिष्ठान ठेवायचे आहे. हृदयातील स्वामी दर्शनाचे मार्गदर्शन घेत निडर होऊन प्रवास करायचा आहे. हा प्रवास करताना संकट आली समस्या आल्या. तर अजिबात घाबरून जायचे नाही विश्वातील अनेक समस्यांचे उत्तर स्वामींकडे आहे.

किंबहुना स्वामी महाराज च प्रत्येक समस्यांचे उत्तर आहेत. बघा आजच्या सेवेत भुकेने व्याकुळ झालेल्या सेवेक ऱ्यांची भूक भागवण्यासाठी स्वतः अन्नपूर्णा माता आल्या. इथे अन्नपूर्णा माता म्हणजे त्या एकाच परम चैतन्याचा असा मोठा आयाम की जो समस्त जीवा ना सतत अन्नपाण्याचा पुरवठा करत असतो. स्वामींचे असे अनेक आयाम आहेत.

जसं माता लक्ष्मी माता सरस्वती जीवनात कितीही समस्या आल्या तर त्या सर्व गरजांचा पुरवठा करणारा स्त्रोत मीच आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असा आधार स्वामी आपल्याला देत आहेत. चला तर मग आज आपण स्वामी ना प्रार्थना करूया.

“हे समर्था या जीवनाचा चालक, मालक, पालक तुम्हीच आहात. या जीवनात कितीही समस्या येऊ दे व संकट येऊ दे. पण आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण माझ्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे. जिथे तुमचे अधिष्ठान तिथे तुमचे समस्या नाही. आणि समस्या आल्या तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे. कारण त्या समस्येचे उत्तर तुम्हीच आहात. तुम्ही समाधान आहात. तुम्ही आनंद आहात.”

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *