नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ आज आपण या माहितीमध्ये स्वामी समर्थ महाराजांची अशी लीला ऐकणार आहोत, ज्यामध्ये स्वामीनी, समाधी घेतल्यानंतर सुद्धा, भक्तांना दर्शन दिले होते. श्री स्वामी समर्थ! तर कोल्हापूरचे वामनराव कोलटकर हे स्वामींचे अनन्य भक्त होते, स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती.
पण स्वामींचे वय प्रकृती बघता ते स्वामींना कधीचं काही बोलले नाही. याउलट स्वामी त्यांना हसत म्हणाले काय रे वामन्या घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलस नाही. त्यावेळी वामनराव म्हणाले, की स्वामी महाराज हे सगळं तुमचंच आहे. तुम्ही कधीही यावं. त्यावर स्वामिनी सांगितले! असं म्हणतोस तर गुरुवारी नक्की येतो. भाकरी करून ठेव. ठेचा देखील करून ठेव.
यानंतर वामनराव अगदी आनंदात घरी परतले. ठरल्या प्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी केली, भाकऱ्या ठेचा वांग्याच भरीत या सगळ्याचा बेत आखला! ते दांपत्य स्वामींची वाट बघत होते.स्वामी आले पण ते एकटेच होते. त्यांच्यासोबत त्यांचा भक्तपरिवार नव्हता. वामनरावांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. आणि स्वामींना विचारले, स्वामी तुम्ही एकटेच आलात.
कोणाला बरोबर का नाही आणल, त्यावेळी स्वामी म्हणाले! तुला कशाला हव्यात रे नुसत्या चांभार चौकश्या, भूक लागली आम्हाला लवकर वाढ आणि स्वामिनी मनसोक्त भोजन केल! वामनराव यांना भरून पावल, स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. पण स्वामी एकटेच का आले, हा विचार त्यांना शांत बसू देईना! म्हणून त्याबद्दल विचारणा करण्यासाठी, एका माणसाला अक्कलकोट मध्ये पाठवलं.
तो माणूस अक्कलकोटला जाऊन आला आणि त्या माणसाने परतल्यावर असं सांगितलं की स्वामिनी मंगळवारीच आपला देह ठेवला! त्यांचे हे शब्द ऐकताच, वामनराव यांना रडू कोसळले. अश्रू धारा वाहू लागल्या आणि त्यांना खूप भरून आले. त्यांना समजून चुकले की, स्वामींनी आपला शब्द पाळला..! आणि समाधीनंतर सुद्धा आपल्याला दर्शन दिले.
मित्रांनो देह त्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागिरदार यांना अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ यांनी एकदा शनिवारी घरी येऊन असेच वचन दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी अनेक लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ महाराज नीलेगावच्या वेशीवर प्रगट झाले. या लीलेचे वैशिष्ट म्हणजे स्वामी एकटेच नव्हते. तर स्वामींचा संपूर्ण लवाजमा, सेवेकरी यांच्यासोबत ते प्रगट झाले.
गावातील सर्व लोकांना दर्शन दिल्यावर, अचानक कुठेतरी निघून गेले त्यानंतर गावातील लोकांनी स्वामींना खूप शोधले.शेवटी दुसऱ्यादिवशी रविवारी त्यांनी खर काय तो खुलासा करण्यासाठी अक्कलकोट मध्ये एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. स्वामी जहागीरदाराच्या वाड्यात एकटेच प्रकटले! पूजा स्वीकारली, पण स्वामी मौन बाळगून होते.
भाऊसाहेबाना दर्शन दिल्यावर, ते साक्षात परब्रम्ह तेथून अदृश्य झाले. तर दुसरीकडे तो माणूस अक्कलकोट वरुण स्वामींचा मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला..! समाधीनंतर सुद्धा स्वामींनी आपला शब्द पाळला ! आणि सर्वांना दर्शन दिले. निलेगावच्या सर्व भक्तांना स्वामीच्या या लिलेचे आश्चर्य वाटले. आणि स्वामी प्रेमाने त्यांचे हृदय भरून आले.
<
मित्रानो अक्कलकोट स्वामी आणि श्रीरामकृष्ण जांभेकर महाराज, त्यांच्यामध्ये अन्य भक्तांनपेक्षा भिन्न असे नाते होते. एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते, तिच्यावर प्रेम करते, तीच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांबेकर महाराजांचे होते. त्यानी स्वामी समर्थांना सिद्धिविनायकला वैभव प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद मागितले होते.
आणि स्वामींच्या आशीर्वादाने जांभेकर महाराज यांनी सिद्धिविनायकाला मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त देखील झाले. जांभेकर महाराजांचा दादर मुंबई येथे आश्रम आहे. त्यावेळी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. एखादा जादूगर जसे खेळ दाखवतो, तसे ते चमत्कार दाखवत असत. अक्कलकोट मध्ये स्वामींनी देह ठेवल्यानंतर, काही वर्षांनी जांबेकर महाराज अक्कलकोटला गेले.
त्यावेळी त्यांच्याभोवती त्यांनी तयार केलेल्या काळया चिंध्यच्या तीनशे-चारशे बावल्या हवेत नाचत होत्या, ते अक्कलकोट मध्ये आल्याचे कळताच त्यांना पाहायला, पूर्ण अक्कलकोट ची रहिवाशी जमा झाले. त्यांच्या उडणाऱ्या बाहुल्या पाहायला..! लोक आश्चर्यचकित होऊन नमस्कार करू लागले. आणि गर्दी वाढू लागली. असा सगळा गोतावळा जमा करून जांभेकर महाराज अक्कलकोट स्वामींच्या समाधी पाशी गेले.
स्वामींच्या समाधीचे दर्शन करतेवेळी नमस्कार करत असताना, त्यांनी मानखाली असता त्यांच्या कानात स्वामींचा गंभीर आवाज ऐकू आला, हम गया नही जिंदा है ! हे शब्द कानावरती पडताच. त्यांच्याभोवती क्षणात हवेत नाचणाऱ्या बाहुल्या खाली जमिनीवर पडायला लागल्या. आंबेडकरांची स्तब्ध समाधी लागली. त्यांना काही सुचेनासे झाले. स्वामींचा असा हा चमत्कार पाहून जांबेकर स्वामीना शरण गेले.
त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांनी आापल्या किमायांचा त्याग केला. आणि ते स्वामी भक्तीमध्ये रममाण झाले. श्री स्वामी समर्थ म्हणून मित्रांनो आजही आपले स्वामी महाराज, त्याच पावन देहाने प्रत्यक्ष अवतरत आहेत. आपल्या भक्तांचा सर्वोत्तमपणे सांभाळ करत आहेत. आणि पुढेही करतील. स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच.
स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात.गरज आहे ती फक्त एक हाक मारण्याची, मनापासून हाक मारली की स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि आपल्यावर आलेले संकट दूर करतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.